Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! शहराचे पाणीपुरवठा वेळापत्रक पुन्हा बिघडले; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी

Chhatrapati Sambhajinagar Water Shortage: छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! महापालिकेच्या २७४० कोटींच्या पाणी योजनेतील जोडण्या प्रलंबित असल्याने पाणीपुरवठा वेळापत्रक पुन्हा बिघडले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 28, 2025 | 02:57 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! (Photo Credit- X)

छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणीटंचाई तीव्र! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • जोडण्या अपूर्ण; पाणीपुरवठा विस्कळीत !
  • १२ दिवसांपासून शटडाऊन
  • पाचव्या दिवशी मिळणारे पाणी आता नवव्या दिवसावर
छत्रपती संभाजीनगर (श.प्र.): संभाजीनगर महापालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील मुख्य जलवाहिनीच्या महत्त्वाच्या जोडण्या पूर्ण न झाल्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. ९०० मि.मी. व्यासाच्या जुन्या जलवाहिनीवर गेल्या १२ दिवसांपासून सुरू असलेल्या शटडाऊनमुळे, सप्टेंबरपासून पाचव्या दिवशी मिळणारे पाणी आता शहरातील अनेक भागांत आठव्या व नवव्या दिवसावर गेले आहे. वाढत्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

२७४० कोटींच्या योजनेला खीळ

  • प्रकल्प: केंद्र सरकारच्या अमृत-२ योजनेतून तब्बल ₹२७४० कोटी रुपयांचा नवा पाणीपुरवठा प्रकल्प राबवला जात आहे.
  • मुख्य जलवाहिनी: या प्रकल्पाअंतर्गत जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३९ किमी अंतरावर २५०० मि.मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी (पाईपलाईन) टाकण्यात आली आहे.
  • प्रलंबित जोडण्या: या लाईनच्या हायड्रॉलिक चाचणी, व्हॉल्व्ह बसवणी आणि इतर तांत्रिक प्रक्रियांसाठी अनेक ठिकाणी ‘गॅप’ ठेवण्यात आले होते. बहुतांश गॅप्स जोडले गेले असले तरी, महत्त्वाच्या ८ जोडण्या अद्याप प्रलंबित आहेत.
  • शटडाऊनचे कारण: याच प्रलंबित कामांमुळे ९०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीवर शटडाऊन घेण्याची वेळ आली, परिणामी सप्टेंबरपासून सुधारलेला पाणीपुरवठा पुन्हा बिघडला आहे.

हे देखील वाचा: Maha E Seva Kendra News: शेंदूरवादा येथील महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे ठप्प; शेतकरी, नागरिकांची मोठी गैरसोय

३५ एमएलडी पाणी वाढूनही स्थिती बिकट

फारोळा येथे नव्या जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण ऑगस्टमध्ये झाले होते. त्यानंतर सप्टेंबरपासून ९०० मि.मी. लाईनमधून वाढीव ३५ एमएलडी (मिलियन लिटर प्रतिदिन) पाणी शहरासाठी सोडण्यात आले होते. याचा थेट फायदा म्हणून शहराचा पुरवठा आठव्या दिवसावरून पाचव्या दिवशी आला होता. मात्र, सध्या सुरू असलेले शटडाऊन चक्र लांबत चालल्याने पाणीपुरवठ्याचा कालावधी पुन्हा आठ-नऊ दिवसांवर गेला आहे, ज्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

जलकुंभांनुसार सध्याची पाणीपुरवठ्याची स्थिती:

जलकुंभ (Water Tank) सध्या पाणी मिळण्याचा कालावधी
क्रांतीचौक ७ वा दिवस
कोटला कॉलनी ७ वा दिवस
विद्यापीठ ८ वा दिवस
जुबली पार्क ८ वा दिवस
एन-५ (आर-२) ८ वा दिवस
शिवाजीनगर ७ वा दिवस
एन-५ (आर-१) ६ वा दिवस
जय विश्वभारती ११ वा दिवस

हे देखील वाचा: Chhatrapati Sambhajinagar Crime: बेदम मारहाण आणि चाकू हल्ला! व्यापाऱ्याला अडवून अडीच लाखांची रोकड आणि दुचाकी लंपास; अन्…

Web Title: Water shortage in chhatrapati sambhajinagar is severe the citys water supply schedule has been disrupted again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 02:57 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • water
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar News: अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी! पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा, वाहनधारकांत संताप
1

Chhatrapati Sambhajinagar News: अफवेचे ‘बॉम्ब’ अन् पंपावर गर्दी! पेट्रोल भरण्यासाठी लागल्या लांबच लांब रांगा, वाहनधारकांत संताप

Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद
2

Nanded News : नायगावच्या गावकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले! पाणीपट्टी थकबाकीमुळे नगरपंचायतीने पुरवठा केला बंद

Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली
3

Iran Israel युद्धाचा मराठवाड्याला तडाखा! १११ नागरिक आखाती देशांत अडकले; छत्रपती संभाजीनगरमधील १० जणांच्या सुटकेसाठी हालचाली

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ९० लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त; आंतरराज्यीय टोळी गजाआड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.