शेंदूरवादा येथील महा-ई-सेवा केंद्र पूर्णपणे ठप्प (Photo Credit - X)
ग्रामपंचायतीकडे ई-सेवा केंद्र मंजूर असूनही ते प्रत्यक्षात अविकसित आणि बंदच असल्याचे चित्र आहे. नियुक्त ऑपरेटर साखर कारखान्यातील कामात व्यस्त असल्याने केंद्राचा कारभार पूर्णपणे ढाकता पडला आहे. ग्रामपंचायतीकडून या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये संताप वाढला आहे.
शेतकरी वर्गाने ताशेरे ओढले आहेत की, केंद्र गावात असताना बंद ठेवणे म्हणजे शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा थेट अपमान शेतकऱ्यांचा आणि नागरिकांचा थेट अपमान आहे. शासकीय सेवा मिळवण्यासाठी दिवस-रात्र धावपळ करावी लागते. जन्म-मृत्यू दाखले, सातबारा, नकाशे, जाती-निवासी प्रमाणपत्रासह सर्व आवश्यक सरकारी कामांसाठी नागरिकांना बाहेरची वारी करावी लागत असल्याने ई-सेवा केंद्र असून अडचण नसून खोळंबा असे आहे.
पर्यायी ऑपरेटर का नाही?
गावातील डिजिटल सुविधा कागदावर असून प्रत्यक्षात शून्य आहे, अशी जनतेची तक्रार आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला थेट जबाबदार धरत केंद्राचा पर्यायी ऑपरेटर का ठेवला नाही? गावातील सेवा बंद ठेवण्याचा अधिकार कोण दिला? असा सवाल उपस्थित केला आहे.
केंद्र तातडीने सुरू न केल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
ग्रामस्थांच्या मते, जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे हा ऑपरेटर प्रत्यक्ष केंद्रावर न देता एका ठराविक दुकानदारास व्हॉट्सअॅपद्वारे पाठवतो.
दोघे मिळून नागरिकांकडून अतिरिक्त पैसे घेऊन संगनमताने व्यवहार करतात.
यामुळे नागरिकांची आर्थिक लूट होत असून ग्रामपंचायतीचा अधिकृत महसूल मोठ्या प्रमाणावर बडवला जात आहे.






