
धक्कादायक घटना! बहिणीच्या कॉलेज प्रवेशासाठी गेलेल्या तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला (Photo Credit- X)
मुझाईद वाहीद कुरेशी (२४, रा. इस्ला हाऊसिंग सोसायटी, हसुल सावंगी) याने फिर्याद दिली. त्यानुसार, फिर्यादी हा त्याची बहीण रश्मीन फातेमा कुरेशी (१९) हिच्यासोबत बी.ए. प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी आजाद कॉलेजमध्ये गेला होता. प्रवेश विभागातील कर्मचाऱ्यांची जेवणाची वेळ सुरू असल्याने त्यांना काही वेळ थांबण्यास सांगण्यात आले. त्यामुळे दोघे ज्युनियर कॉलेजच्या
गार्डनमध्ये बसले होते.
गार्डनमध्ये बसलेल्या भावंडांजवळ दोन युवक आले. तुम्ही कोण आहात आणि येथे का बसला आहात ? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर मुझाईदने आपण बहिण-भाऊ असल्याचे सांगितले. तुम्ही कोण आहात अशी विचारणा केली, त्यातील एकाने आपले नाव सुफियान पठाण सांगितले. तेंव्हा फिर्यादीने, त्याला आपका हमारे पास क्या काम है, अशी विचारणा केली. त्यामुळे संतापलेल्या सुफियान पठाण याने फिर्यादीला रुक तेरे को बतात असे म्हणून त्याने कोणाला तरी फोन लावला व फिर्यादी व त्याच्या बहिणीला शिवीगाळ करु लागला. शिवीगाळ केल्याचा मुझाईदने त्याला जाब विचारताच त्याने चाकूने थेट छातीवर वार केला.
सुफियानच्या साथीदाराने मुझाईदला पाठीमागून पकडून ठेवले. त्यानंतर त्याने धारदार वस्तूने पाठीवर वार करुन गंभीर जखमी केले. तेव्हा मुझाईदला पकडलेल्या साथीदारोन त्याच्या गळ्यावर वार कर असे म्हणाला. त्यानासर सुफियान याने मुझाईदच्या गळ्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुझाईदने मान खाली घेतल्याने वार दाढीच्या भागावर लागला आणि मोठा अनर्थ टळला. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपींनी रश्मीनला धक्का देत तेथून पळ काढला. चहिणीसमोर घडलेल्या या प्रकारामुळे ती ही घाबरून गेली.
हल्ल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या मुझाईदला तेथील दोन युवकांनी मदत केली. त्यांनी त्याला एका खासगी रुग्णालयात नेले. मात्र त्यांनी त्याला दाखल करून घेतले नाही. तेव्हा मुझाईदला त्याच्या भावांनी घाटीत दाखल केले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पसार संशयितांचा शोध सुरू आहे. पुढील तपास उपनिरीक्षक संतोष खरात करत आहेत.
Mira-Bhayandar: अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण रॅकेटचा पर्दाफाश; ८ आरोपी अटकेत, मुख्य सूत्रधार जेरबंद