Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News: सांगलीच्या विश्रामबागेतील कथित बलात्कार प्रकरणानंतर शहरातील कॅफेंवर संताप; श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक

सांगलीच्या विश्रामबाग येथील 'बिलेनियर' कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अश्लील व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपी समर्थ देवकुळेला अटक करण्यात आली असून 'शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान' संघटनेने कॅफेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 19, 2026 | 04:30 PM
Sangli News: सांगलीच्या विश्रामबागेतील कथित बलात्कार प्रकरणानंतर शहरातील कॅफेंवर संताप; श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक
Follow Us
Follow Us:
  • सांगलीच्या विश्रामबागेतील कथित बलात्कार प्रकरणानंतर शहरातील कॅफेंवर संताप
  • श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक
  • वाचा संपूर्ण बातमी…
सांगली: विश्रामबाग परिसरातील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर कथित बलात्कार झाल्याच्या प्रकरणामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. कॅफेच्या नावाखाली शहरातील काही ठिकाणी कंपार्टमेंट तयार करून अनैतिक प्रकारांना खतपाणी घातले जात असल्याचा आरोप करत श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी विविध कॅफेंमध्ये धडक तपासणी मोहीम राबविली. या कारवाईदरम्यान काही कॅफे परिसरात वापरलेले कंडोम, गर्भनिरोधक गोळ्यांची रिकामी पाकिटे आणि संशयास्पद साहित्य आढळल्याचा दावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

शहरातील विश्रामबाग परिसरातील ‘बिलेनियर’ कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणामुळे शहरातील कॅफे संस्कृती, त्याठिकाणी अल्पवयीन मुलांना मिळणारा प्रवेश आणि संबंधित यंत्रणांच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने शहरातील विविध कॅफेंवर पाहणी करण्यात आली. कॅफेच्या नावाखाली बंदिस्त कंपार्टमेंट तयार करून त्यांचा गैरवापर होत असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. अल्पवयीन मुला-मुलींना सहज प्रवेश मिळत असल्याने हा प्रकार अधिक गंभीर असल्याचेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संघटनेच्या मते, गेल्या काही वर्षांत शहरातील काही कॅफेंबाबत सातत्याने तक्रारी होत आहेत. यापूर्वीही अशाच घटनांनंतर काही कॅफेंविरोधात आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला.

Rohini Paradhye Case : ‘रिल स्टार’ रोहिणी पाराध्ये प्रकरणी मोठा ट्विस्ट; पतीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल

नेमके काय घडले?

विश्रामबाग परिसरातील ‘बिलेनियर’ कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधित संशयित समर्थ अनिल देवकुळे (रा. रविवार पेठ, माधवनगर) अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. पीडित मुलीची ओळख झाल्यानंतर आरोपीने जानेवारी २०२६ मध्ये त्याने या कॅफेमध्ये तिला भेटायला बोलावले. कॅफेमध्ये कोणी नसल्याचे पाहून त्याने दरवाजा बंद करून पीडितेशी लगट केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, जबरदस्तीने अश्लील चित्रफीत बनविल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर शहरातील कॅफेंच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

धाडीत काय आढळल्याचा दावा?

काही कॅफेंमध्ये बंदिस्त कंपार्टमेंटची व्यवस्था, परिसरात वापरलेले कंडोम आढळल्याचा दावा, गर्भनिरोधक गोळ्यांची रिकामी पाकिटे, अल्पवयीन मुला-मुलींची वर्दळ, संशयास्पद हालचालींबाबत स्थानिकांकडून तक्रारी असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानी यांनी केला आहे.

प्रशासनाने तातडीने कारवाई करावी

“कॅफेच्या नावाखाली काही ठिकाणी सुरू असलेल्या प्रकारांबाबत आम्ही अनेक वेळा आवाज उठविला आहे. अल्पवयीन मुलांना अशा ठिकाणी सहज प्रवेश मिळत असेल तर ते अत्यंत गंभीर आहे. पोलिस प्रशासन, महानगरपालिका आणि संबंधित विभागांनी संयुक्त मोहीम राबवून अशा कॅफेंची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. अन्यथा नागरिकांच्या भावना तीव्र आहेत आणि आंदोलनाची दिशा अधिक तीव्र होऊ शकते.” नितीन चौगुले, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

चाकणमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई, तब्बल 83 किलो गांजा पकडला; स्कॉर्पिओही जप्त

Web Title: Minor girl raped at billionaire cafe in sangli vishrambag rebel protest by shivpratishthan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • crime news
  • Rape Case
  • sangli news

संबंधित बातम्या

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार
1

तोतया इंजिनीअरचा तरुणीवर अत्याचार, लग्नासाठी एक अट घातली अन्…; वसईतील संतापजनक प्रकार

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न
2

लोणीतील खुनाच्या प्रयत्नाचा लावला छडा, मुख्य आरोपी जेरबंद! सात साथीदार निष्पन्न

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल
3

महावितरणच्या कर्मचाऱ्याला बुक्क्यांनी मारहाण, परतूर येथील घटनेनं खळबळ; तिघांविरोधात गुन्हा दाखल

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?
4

दिल्ली हादरली! ५० वर्षीय महिलेकडे २०० कोटींची खंडणी; परदेशात बसलेल्या गुंडांना टार्गेटची माहिती मिळते तरी कशी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.