Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे नवीन संकेतस्थळ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अनावरण

राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या  नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथील विधानभवन अनावरण करण्यात आले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 18, 2024 | 09:38 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि. 17 डिसेंबर 2024 रोजी नागपूर येथील विधानभवनातील समिती सभागृहामध्ये अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली आहे.

‘या’ माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम

राज्यात 1 कोटी 39 लाख गोवंश असून त्यामध्ये 13 लाख देशी गायी असल्याची माहिती अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिली. ‘गो टेन’ अंतर्गत गो संगोपन, गो संवर्धन, गो संरक्षण, गोमय मुल्यवर्धन, गोशाळा, गोरक्षक, गोपालक, गो आधारीत शेती, गो साक्षरता आणि गो पर्यटन या माध्यमातून गायींच्या संवर्धनाचे काम करण्यात येत आहे. राज्यात देशी गायींसाठी विशेष दुग्धशाळा (डेअरी) निर्माण करण्यात येतील, असेही  मुंदडा यांनी सांगितले.

संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आलेली माहिती

आयोगामार्फत देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करणे व त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण केले जात आहे. गोशाळा, गोसदन, पांजरपोळ व गोवंश संस्थांची नोंदणी,  गोवर्धन गोवंश सेवा केन्द्र योजना व इतर योजना अंतर्भुत करणे व त्याची अंमलबजावणी करणे,  पशुआरोग्य सेवांचे प्रचालन करणे, दुर्बल, वयस्क व रोगग्रस्त पशुंचे व्यवस्थापन, काळजी व उपचार यांची सुनिश्चिती, पशुंची काळजी घेणाऱ्या व्यक्तींचे प्रशिक्षण आणि जनजागृती केली जात असून त्याबाबतची माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून सार्वजनिक करण्यात आली आहे.  सर्वसामान्य जनता आणि गोवंश संवर्धन करणाऱ्या संस्थांसाठी या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका क्लिकवर माहिती उपलब्ध करून दिली आहे.

संकेतस्थळाच्या अनावरण प्रसंगी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, गोसेवा आयोगाचे सदस्य सर्वश्री संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय, उद्धव नेरकर, सुनील सूर्यवंशी, सनत कुमार गुप्ता, दीपक भगत आदी उपस्थित होते.

गोमाता राज्यमाता  

मागील राज्य सरकारकडून सप्टेबंरमध्ये गायीला राज्यमाता म्हणून घोषित केले होते.  या निर्णयासंबंधी राज्य सरकारने अधिकृत आदेशही काढला आहे.  गायीला राज्यमाता म्हणून घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील दुसरे राज्य ठरले आहे. त्या अगोदर उत्तराखंड राज्याने गायीला राज्यमाता घोषित केले होते.  सरकारकडून म्हटले गेले होते की, देशी गायींचे भारतीय संस्कृतीमध्ये वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या दुधाची मानवी आहारामधील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा पध्दती, पंचगव्य उपचार पध्दती तसेच देशी गायींच्या शेण व गोमुत्राचे सेंद्रिय शेती पध्दतीमध्ये असलेले महत्वपूर्ण स्थान विचारात घेऊन देशी गायींना यापुढे “राज्यमाता- गोमाता” म्हणून घोषीत करण्यास मान्यता देण्यात आली.

 

Web Title: Chief minister devendra fadnavis unveiled the new website of maharashtra goseva aayog

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2024 | 09:38 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Nagpur

संबंधित बातम्या

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत
1

Nurses Protest: नर्सेसच्या बदल्यांवरून वाद; ‘हा फक्त नियमांचा नव्हे तर मानवी… ’; बदल्यांवर अधिकाऱ्यांचे मत

Crime News: पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात
2

Crime News: पिसे बंधूंच्या मटकाबुकीवर निर्भया पथकाची धाड, माजी नगराध्यक्षांच्या मुलासह सहाजण ताब्यात

Shivsena News : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त
3

Shivsena News : मतदार यादी पुनरीक्षणासाठी शिवसेनेची मोठी तयारी; राज्यात सव्वा लाखांहून अधिक BLA नियुक्त

Maharashtra tourism : घोडेवाले, फोटोग्राफर, विक्रेत्यांना ड्रेस कोड बंधनकारक, पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी पाचगणीत नवा नियम
4

Maharashtra tourism : घोडेवाले, फोटोग्राफर, विक्रेत्यांना ड्रेस कोड बंधनकारक, पर्यटकांची फसवणूक रोखण्यासाठी पाचगणीत नवा नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.