
चिपळूणमध्ये काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात
अजित पवार गट पक्ष ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत
जनतेने नवख्या उमेदवारांना निवडून पाठवले
चिपळूण: चिपळूण राज्यात नगरपरिषद, नगरपंचायत व आता महापालिकांमध्ये भाजप-शिवसेनेने यश संपादन केले असल्याने चिपळूणमधील शिवसेना भाजप पदाधिकारी व कार्यकत्यांचा काही दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी विश्वास दुणावला आहे. यामुळे शिवसेना- भाजप युती जि. प., पं. स. निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाने देखील आपले उमेदवार निश्चित केले आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार रमेश कदम यांनी आपल्या पदासह सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याने चिपळूणमध्ये हा पक्ष नेतृत्वहीन झाला आहे.
नुकत्याच झालेल्या चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत महायुती न होता शिवसेना-भाजप युती एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेली. तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरले होते. या निवडणुकी दरम्यान झालेल्या नाटधमय राजकीय घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट ) पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी स्वबळाची घोषणा केली. याचाच आधार घेत शिवसेना-भाजप युतीने देखील त्या दृष्टीने पावले टाकली आहेत आणि युतीचे जागा वाटप देखील निश्चित झाले असल्याची माहिती मिळत आहे. शिवसेना-भाजप युती व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट) पक्षाने आपापले उमेदवार निश्चित केले असून उमेदवार देखील अंतर्गत प्रचाराला लागले आहेत.
ZP Election: तळकोकणात निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई! आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण…
जनतेने नवख्या उमेदवारांना निवडून पाठवले
तर काँग्रेसकडून अद्याप या निवडणुकीसाठी कोणतीही तयारी नसल्याचे समजते. गेल्या महिनाभरापूर्वी झालेल्या चिपळूण नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) युतीने नगराध्यक्ष पदासह १६ जागांवर विजय संपादन केला, शिवसेना (शिदे गट) ९ तर भाजपने ७ जागांवर यश संपादन केले. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन दोन, शिवसेना उबाठा ५. काँग्रेसचे ३ उमेदवार विजयी झाले. विशेष म्हणजे चिपळूण मधील जनतेने नवख्या उमेदवारांना चिपळूण नगरपरिषदेवर निवडून पाठवले आहे. या निवडणुका संपताच महाराष्ट्रात २९ महापालिकांच्या नुकत्याच निवडणुका झाल्या. या निवडणुकीत देखील शिवसेना-भाजप युतीने दमदार यश मिळवले आहे.
Maharashtra Politics: ‘एआयएमआयएम’ भाजप की ‘इंडिया’ आघाडीशी युती करणार? ओवेसींनी स्पष्टच सांगितलं…
निवडणुकीसाठी इच्छुकांची लगीनघाई
अखेर गेली चार वर्ष प्रतीक्षेतअसलेली जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीकडे डोळे लागून राहिलेल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकच लगीनघाई सुरू झाली आहे. राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची उमेदवारीसाठी रस्सीखेच तर दुसरीकडे पक्ष उमेदवारी देईल की नाही अशा द्विधावस्थेत घालमेल सुरु झाली आहे. यासाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू झाले आहे. जिल्हा परिषद ५०व १०० पंचायत समिती मतदार संघ आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.