असदुद्दीन ओवेसी (फोटो- सोशल मीडिया)
राज्यात एमआयएमने जिंकल्या 125 जागा
पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित यश मिळाले नाही
भाजप, इंडिया आघाडीवर केले भाष्य
Asaduddin Owaisi: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठीचा निकाल जाहीर झाला आहे. 29 पैकी जवळपास 25 महापालिकेवर महायुतीची सत्ता आली आहे. मुंबईत देखील ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता गेली. महायुतीने मुंबईत मोठा विजय प्राप्त केला आहे. दरम्यान असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएम पक्षाने देखील चांगली कामगिरी केली आहे. एआयएमआयएम पक्षाने तब्बल 125 जागा महाराष्ट्रात जिंकल्या आहेत. दरम्यान या विजयावर त्यांनी भाष्य केले आहे.
एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वात त्यांच्या पक्षाने 125 जागा जिंकल्या आहेत. दरम्यान यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील दिली आहे. 125 जागा जिंकल्यावर असदुद्दीन ओवेसी कोणाला पाठिंबा देणार? कोणसोबत जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, त्यावर अखेर त्यांनी आपली व पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.
‘राज्यातील 13 महानगरपालिकेत 125 नगरसेवक निवडून येणे ही ऐतिहासिक बाब आहे. दरम्यान भाजपसोबत किंवा इंडिया आघाडीसोबत जाण्याचा आमचा कोणताही हेतु नाही. आम्ही लढाई सत्तेसाठी नसून आम्हाला जनादेश देणाऱ्या लोकांसाठी आहे. ‘ छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे 33, मुंबई महापालिकेत 8 तर सोलापूरमध्ये देखील एमआयएमने चांगले यश प्राप्त केले आहे.
एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्यावर बी-टीम म्हणून आरोप केला जातो. त्यावर बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले, ‘अशा आरोपांना माझ्याकडे उत्तर नाहीये. आम्हाला बी टीम म्हणणारे लोक, आम्हाला मतदान करणाऱ्या लाखों मतदारांचा अपमान करत आहेत. ‘आम्हाला पश्चिम महाराष्ट्रात अपेक्षित असे यश प्राप्त झाले नाही. मी त्या भागात अधिक लक्ष देऊ शकलो नाही. अधिक लक्ष दिले असते तर परिणाम चांगले आले असते.
भाजपसोबतची युती AIMIM ला सुद्धा नाही मान्य; इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली नाराजी
देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
मुंबई महापौर निवडणुकीत शिंदे सेनेची भूमिका महत्त्वाची बनली आहे. याचपार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप महापौरपद अडीच-अडीच वर्षे वाटून घेणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, आम्ही बसून हे ठरवणार आहोत, महापौर कोण? महापौर किती वर्ष? हे सर्व मी आणि शिंदे आणि दोन्ही कडचे नेतेमंडळी आम्ही ते बसून ठरवू. काही त्यामध्ये वाद होणार नाही. दोन्ही पक्ष मुंबई चालवून दाखवू, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.






