सिंधुदुर्ग जिल्हा परिषद (फोटो- सोशल मिडिया)
उमेदवारीसाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू
आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण जाहीर
इच्छुक उमेदवारांची रस्सीखेच अन घालमेल
सिंधुदर्गनगरी: अखेर गेली चार वर्ष प्रतीक्षेतअसलेली जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीकडे डोळे लागून राहिलेल्या राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची एकच लगीनघाई सुरू झाली आहे. राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांची उमेदवारीसाठी रस्सीखेच तर दुसरीकडे पक्ष उमेदवारी देईल की नाही अशा द्विधावस्थेत घालमेल सुरु झाली आहे. यासाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू झाले आहे. जिल्हा परिषद ५०व १०० पंचायत समिती मतदार संघ आहेत. यापैकी महायुती झाल्याने या आरक्षण प्रक्रियेत इच्छुक उमेदवारांची मोर्चे बांधणी सुरू झाली आहेजिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका भाजपा व शिंदे शिवसेनामहायुतीने लढणार हे निश्चित झाले तरी उद्धव ठाकरे शिवसेना महाविकास आघाडीने लढणार की स्वतंत्र याबाबत चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या आरक्षण सोडतीमध्ये ५० गटांचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर सुकळवाड आणि शिरगाव जा नवली हे तीन मतदारसंथ अनुसुचित जातीसाठी निश्चित करण्यात आले होते तर या आरक्षणामुळे बांदा पिंगुळी, नाटळ, उभादांडा हे तीन मतदारसंघ बऱ्याच वर्षांनी खुले झाले आहेतत्यामुळे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक असणार आहे जिल्हा परिषद सर्वसाधारण प्रवर्गासाठी १८ जागा निश्चित झाले असून प६जागांवर सर्वस्राधारण महिला साठी राखीव आहेततर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १३ पैकी सात जागा महिलांसाठी आहेत.
Kolhapur ZP Election: 23 लाख कोल्हापूरकर ठरवणार उमेदवारांचे भविष्य; जिल्हा परिषद अन्…
जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असल्यामुळे सर्व साधारण प्रवर्गातील मतदार संघासाठी भाजपा आणि शिदे यांची शिवसेना या पक्षात रस्सीखेच वाढली आहे. भाजपाने जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवणार तर शिंदे शिवसेनेने शिवसेनेचा झेंडा फडकवणार असे जाहीर केले होते त्यामुळे १८ जिल्हा परिषद सर्वसाधारण उमेदवारासाठी कोणा कोणाची वर्णी लागते हे स्पष्ट होणार आहे.
Maharashtra Politics: ‘एआयएमआयएम’ भाजप की ‘इंडिया’ आघाडीशी युती करणार? ओवेसींनी स्पष्टच सांगितलं…
तर सर्वसाधारण महिलांसाठी १६ मतदारसंघात कळसुली, पडेल, मसूरे मर्डे, म्हापण, बापार्डे, साटेली, भेडशी, तेंडोली, आंबोली, किंजवडे, वायरी, अडवली मालडी, ओरास बुद्रुक आचराया मतदारसंघांचा समावेश आहेतसेच नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी १३ जागा आरक्षित करण्यात आल्या होत्या त्यातील सात जागा महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या आहेत त्यात कासाडे, नेरुर देऊळवाडा, कुणकेश्वर, घावनळे, माणगाव, फोडाघाट आधी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






