Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chiplun Flood News : अचानक वाढलेल्या वशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग

कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्यानंतर वाशिष्ठी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने चिपळूणमधील एनरॉन पुल परिसरात एक कुटुंब अडकले. नगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या धाडसी प्रयत्नांमुळे सर्व सदस्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने प्रशासनाच्या तत्परतेचे कौतुक होत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 09, 2026 | 11:32 AM
अचानक वाढलेल्या वाशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग

अचानक वाढलेल्या वाशिष्ठीच्या पाण्यात अडकले कुटुंब , एनरॉन परिसरातील थरार प्रसंग

Follow Us
Follow Us:
  • नगराध्यक्ष उमेश सकपाळ, नगरपालिका टीमचे धाडसी बचावकार्य
  • वशिष्ठी नदीच्या वाढत्या पाण्यात कुटुंब अडकले
  • चिपळूणमध्ये थरारक रेस्क्यू, मोठी दुर्घटना टळली
चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात बुधवारी सायंकाळी वाशिष्ठी नदीच्या वाढत्या पाणीपातळीमुळे पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली. कोळकेवाडी धरणातून वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात आल्यानंतर नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आणि एनरॉन पुल परिसरातील एका कुटुंबाच्या घराभोवती पाणी साचल्याने ते अक्षरशः संकटात अडकले. मात्र, प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे या कुटुंबाची सुखरूप सुटका करण्यात आली.

घराभोवती वाढले पाणी, कुटुंब अडकले

बुधवारी सायंकाळी पावसाचा जोर तुलनेने कमी असतानाही कोळकेवाडी धरणातून पाणी सोडल्याने वशिष्ठी नदीची पातळी वेगाने वाढू लागली. काही वेळातच एनरॉन पुलाजवळील एका घराभोवती पाणी साचले. बाहेर अंधार आणि पाण्याचा वाढता वेग यामुळे कुटुंबातील सदस्य घाबरून गेले. घराबाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद झाल्याने त्यांनी मदतीची प्रतीक्षा सुरू केली.

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले

नगरसेवकांकडून प्रशासनाला माहिती

परिसरातील नागरिकांनी ही बाब नगरसेवक प्रमोद बुरटे यांच्या निदर्शनास आणून दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तात्काळ नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच नगराध्यक्षांनी वेळ न दवडता आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी समन्वय साधत नगरपालिका पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

धाडसी रेस्क्यू ऑपरेशन

पाण्याचा वेग प्रचंड असल्याने बचावकार्य मोठे आव्हानात्मक ठरत होते. मात्र, दोरी, सुरक्षासाहित्य आणि स्थानिकांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन पथकाने नियोजनबद्ध पद्धतीने बचाव मोहीम राबवली. अडकलेल्या कुटुंबातील सदस्यांना एकामागोमाग एक सुरक्षित बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. या यशस्वी बचाव मोहिमेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

नागरिकांकडून पथकाचे कौतुक

कुटुंबाची सुखरूप सुटका झाल्यानंतर उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात नगराध्यक्ष उमेश सकपाळ, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बचावकार्यात सहभागी सर्वांचे स्वागत केले. वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे एका कुटुंबाला नवजीवन मिळाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

अनेकांचा बचाव मोहिमेत सहभाग

या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नगराध्यक्ष उमेश सकपाळ, बांधकाम सभापती कपिल शिर्के, उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे, मंगेश पेढाम्बकर, नगरसेवक प्रमोद बुरटे, उद्यान विभाग प्रमुख बापू साडविलकर, माजी नगरसेवक रतन पवार, सुयोग चव्हाण, दयानंद जुवळे, निलेश किंजळकर, अजय कासारे, गोट्या मोहिते, इकबाल इरफान, सिद्धेश रेडीज, निखिल शेट्टी तसेच स्थानिक नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

या घटनेनंतर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा वाढता जोर आणि नदीच्या पाणीपातळीत होणारी वाढ लक्षात घेता नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या घटनेमुळे नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासन, लोकप्रतिनिधी, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक नागरिक यांच्यातील समन्वय व तत्परता किती महत्त्वाची असते, याची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Web Title: Chiplun vashishti river flood family rescue enron bridge kolkewadi dam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • Chiplun
  • Monsoon Update
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले
1

Ratnagiri Heavy Rain : खेड शहरावर पुन्हा पुराचे सावट; जगबुडी नदी ७.७० मीटरवर, बाजारपेठेत पाणी शिरले

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर
2

Satara Heavy Rain : १६ गावांचा संपर्क तुटला, दरडी, पूल खचले,नेटवर्क बंद…; साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू
3

Konkan Rain : रत्नागिरीत दरड दुर्घटनांची मालिका सुरूच; दहिवलीत चार घरे ढिगाऱ्याखाली, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

Krishna River Overflows: राजापूर बंधाऱ्यातून ७७ हजार क्युसेक पाणी कर्नाटकात!
4

Krishna River Overflows: राजापूर बंधाऱ्यातून ७७ हजार क्युसेक पाणी कर्नाटकात!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.