
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रासाठी सिडकोची घरे अनेकांसाठी मोठा पर्याय मानली जातात. पण गेल्या काही वर्षात बांधकामाचा वाढता खर्च आणि तर कारणांमुळे सिडकोच्या घरांच्या किमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळे या किमती कमी करण्याची मागणीही केली जात होती. या पार्श्वभूमीवर सिडको घरांच्या दरात कपात करण्याबाबत सरकार आज महत्त्वाची बैठक घेणार आहे. राज्य सरकारकडून याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
Mansar DC Division: मनसर डीसी विभाजनाचा मार्ग मोकळा; ‘या’ ठिकाणी होणार नवा डिसी, फडणवीसांचे आदेश
आजच्या बैठकीत नगरविकास विभागाच्या नेतृत्त्वात सिडकोच्या घरांच्या किंमती आणि प्रलंबित प्रकल्पांशी संबंधित विविध मुद्द्यावर चर्चा होईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी या बैठकीला उपस्थित राहतील. विशेष म्हणजे, अनेक प्रकल्पांच्या सोडतींमध्ये काही घरे न सुटल्याने त्या घरांचे दरदेखील पुन्हा तपासले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय काही प्रकल्पांमध्ये काम पूर्ण झाले असतााही घरांच्या उच्च किंमतींमुळे अनेकांना घरे घेणे कठीण जात आहे. या सर्व विषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
सिडकोच्या घरांचे दर कमी करण्यासाठी अंतिम निर्णय या बैठकीत घेतला जाऊ शकतो. जर घरांच्या दरात कपात झाली तर मध्यमवर्गींय आणि विविध उत्पन्न गटातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. परवडणाऱ्या घरांचा प्रश्न अनेक वर्षांपासून गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे आज होणारा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आशादायक ठरणार आहे.
Sindhudurg crime: कणकवलीत धक्कादायक प्रकार! युवक-युवतीने धरणात उडी घेऊन उचलले टोकाचे पाऊल
सिडकोच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांवर या निर्णयाचा थेट परिणाम दिसून येऊ शकतो. दरकपात झाल्यास रिक्त घरे विक्रीची प्रक्रिया वेगाने पूर्ण होईल आणि नव्या प्रकल्पांना गती मिळेल. त्यामुळे एकूणच गृहनिर्माण क्षेत्रावर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.Urban Development Department
आजच्या बैठकीत एकनाथ शिंदे कोणती भूमिका मांडतील आणि कोणता निर्णय जाहीर करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागरिकांना योग्य दरात घरे उपलब्ध करून देणे हा सरकारचा मुख्य उद्देश असल्याने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. घरांच्या दरात कपात करण्याबाबत सरकारकडून सकारात्मक निर्णय झाल्यास हजारो नागरिकांच्या घराच्या स्वप्नाला नवी उभारी मिळू शकते.