Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारकरांना यंदाही करवाढीतून सुटका; प्रशासकीय सभेत 489 कोटी 35 लाखांचा अर्थसंकल्प सादर

सातारा शहरासह हद्दवाढ भागातील भरीव विकासकामांचा समावेश असलेला ४८९ कोटी ३५ लाखांचा अर्थसंकल्प बुधवारी सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आला. कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला असून, पर्यावरणपूरक निकषांची पूर्तता करणाऱ्या मिळकतदारांना करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 29, 2024 | 11:12 AM
सातारकरांना यंदाही करवाढीतून सुटका; प्रशासकीय सभेत 489 कोटी 35 लाखांचा अर्थसंकल्प सादर
Follow Us
Follow Us:

सातारा : सातारा शहरासह हद्दवाढ भागातील भरीव विकासकामांचा समावेश असलेला ४८९ कोटी ३५ लाखांचा अर्थसंकल्प बुधवारी सातारा पालिकेच्या प्रशासकीय सभेत मंजूर करण्यात आला. कोणतीही करवाढ, दरवाढ नसलेल्या या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला असून, पर्यावरणपूरक निकषांची पूर्तता करणाऱ्या मिळकतदारांना करात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सातारा पालिकेच्या कमिटी हॉलमध्ये बुधवारी दुपारी चार वाजता प्रशासक तथा मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत २०२४-२५ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. लेखा विभाग लिपिक भालचंद्र डोंबे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केले. यानंतर मुख्याधिकारी अभिजित बापट यांनी भाषण केले. ते म्हणाले, नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमातील तरतुदीनुसार हद्दवाढ भागाला पहिल्या वर्षासाठी एकूण मालमत्ता कराच्या २० टक्के तर दुसऱ्या वर्षासाठी ४० टक्के प्रमाणे कर मागणी देयके देण्यात आली आहेत. हद्दवाढ भागातील सुमारे ५० टक्के नागरिकांनी कर भरणा केला असून, यंदादेखील पर्यावरणपूरक निकषांची पूर्तता करणाऱ्या मिळकतदारांना घरपट्टीत सवलत दिली जाईल.

पालिकेने नुकतेच स्वत:चे संकेतस्थळ व मोबाइल ॲप विकसित केले असून, नागरिकांना मालमत्तांचे स्वयंमूल्यांकन, कर भरणे, कर विषयक सेवा, तक्रारी, अभिप्राय अशा सेवा या ॲपच्या माध्यमातून मिळणार आहेत. पालिकेने प्रशासकीय इमारत, उड्डाणपूल सुशोभीकरण, पोवई नाका शिवतीर्थ सुशोभीकरण आदी कामे हाती घेतली असून अजंठा चौक उड्डाण पूल सुशोभीकरण, किल्ले अजिंक्यतारा रस्ता सुधारणा, शहीद कर्नल संतोष महाडिक स्मारक अशी कामे पूर्णत्वास आली आहेत.

नवीन वर्षात नगरोत्थान योजना, नागरी दलित्तेतर योजना, अमृत २.०, हद्दवाढ क्षेत्र विकास कार्यक्रम व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. शहर कार्बनमुक्त करून वीज निर्मितीत स्वयंपूर्ण बनविण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात पालिकेच्या तिजोरीत २ लाख २७ हजार ३३० रुपयांची शिल्लक दाखविण्यात आली असून, उत्पन्नवाढीच्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. या सभेला नगरअभियंता दिलीप चिद्रे यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते. अर्थसंकल्प अंतिम मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार आहे.

Web Title: Citizen of satara get relief from tax increase this year too nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 29, 2024 | 11:07 AM

Topics:  

  • maharashtra
  • Satara Municipality
  • Satara News

संबंधित बातम्या

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
2

Illegal Liquor Transport: परराज्यातील अवैध मद्य वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा दणका! एकास अटक, १.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
3

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत
4

Mhaswad Accident News: म्हसवड–शिंगणापूर मार्गावर अपघाताचा थरार! दोन कारची समोरासमोर धडक, सहा जखमी; धोकादायक वळण पुन्हा चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.