Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकण बाजार समिती बाहेर वाहतूक कोंडी, अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा; नागरिक संतप्त

चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटच्या बाहेर रोज सकाळी मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री सुरू ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 10, 2025 | 05:03 PM
चाकण बाजार समिती बाहेर वाहतूक कोंडी, अतिक्रमणांचा वाहतुकीला अडथळा; नागरिक संतप्त
Follow Us
Follow Us:

चाकण : चाकण येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेटच्या बाहेर रोज सकाळी मोठया प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. फळ विक्रेते व शेतीमाल विकणाऱ्या व्यावसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमण करून विक्री सुरू ठेवल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. कोंडीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बस रांगेत अडकतात. परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचण्यास उशीर होऊन नुकसान होत आहे. गर्दीच्या वेळी वादविवाद, भांडणे, तसेच मोबाईल आणि वाहन चोरीच्या घटनांमध्येही वाढ झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

कारवाई करण्याची मागणी

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातच फळे व शेतीमालाची किरकोळ विक्री सुरू असल्याने खरेदीसाठी आलेले नागरिक आपली वाहने रस्त्यावर उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. अतिक्रमण करणाऱ्या फळ विक्रेत्यांवर आणि रस्त्यावर विक्री करणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

हे सुद्धा वाचा : Ganesh Utsav 2025 : शाडूच्या गणेश मूर्तींना मागणी वाढली, किंमतीत ३० टक्के वाढ

वाहनांसाठी पार्किंग, विक्रीची ठराविक जागा निश्चित करावी

दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समितीने आणि नगरपरिषदेने वाहतुकीसाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, तसेच शेतीमाल आणणाऱ्या व्यापारी व नागरिकांच्या वाहनांसाठी पार्किंग व विक्रीची ठराविक जागा निश्चित करावी, अशी मागणी स्थानिकांनी प्रशासनाकडे केली आहे. प्रशासनाने वेळेवर पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.

नगरपरिषदेने रस्त्याच्या बाजूला बांधलेल्या फूटपाथवर फलविक्रेते आणि शेतमाल विकणाऱ्यांनी अतिक्रमण करून हातगाडी तसेच फूटपाथवर बसून व्यवसाय करतात. त्यामुळे सकाळच्या वेळी मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होते. कृषी उत्पन्न बाजार समितीने वेळोवेळी नगरपरिषदेला व पोलीस प्रशासनाला याबाबत पत्र व्यवहार केला आहे. यावर कुठल्याही प्रकारची ठोस कारवाई होत नाही. शेतीमाल ने -आन करणाऱ्या वाहनांसाठी पार्किंगची जागा बाजार समितीने जागा उपलब्ध केलेली आहे. प्रशासनाने ह्या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घातले तर, वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवणार नाही. – महेंद्र गोरे, संचालक, कृषी उत्पन्न बाजार समिती, चाकण रोज सकाळी बाजार समिती समोरील रोडवर वाहतूक कोंडी होत असते. मुलांना शाळेत घेऊन जाणारी बस यायला उशीर होतो त्यामुळे मुलांना शाळेत जायला उशीर होतो. पर्यायाने यात मुलांना आणि पालकांना याचा रोज त्रास सहन करावा लागत आहे. -विजय खळदकर, स्थानिक नागरिक

Web Title: Citizens are angry due to traffic congestion outside chakan bazar samiti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2025 | 05:02 PM

Topics:  

  • Chakan News
  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Traffic Police

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती
1

Maharashtra Breaking News Today 2026: नागपुरच्या गोधनी जलशुद्धीकरण प्रकल्पात वायूगळती

चाकण नगरपरिषदेचा निष्काळजीपणा? सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर; कारवाई अन् जनजागृतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
2

चाकण नगरपरिषदेचा निष्काळजीपणा? सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर; कारवाई अन् जनजागृतीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

सासवडमधील महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार; नगरपालिकेत कचऱ्याच्या बादल्या घेऊन जोरदार निषेध  
3

सासवडमधील महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार; नगरपालिकेत कचऱ्याच्या बादल्या घेऊन जोरदार निषेध  

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष
4

पुरंदरमधील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट वाटाणा; पंचायत समितीमध्ये तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.