Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन दिवाळीत मंगळवेढ्यात दूध भेसळ जाेमात; म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध

मंगळवेढा शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची दूधाची मागणी वाढल्याने म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध भेसळ करुन ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार घडत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 20, 2025 | 12:52 PM
ऐन दिवाळीत मंगळवेढ्यात दूध भेसळ जाेमात; म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध

ऐन दिवाळीत मंगळवेढ्यात दूध भेसळ जाेमात; म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध

Follow Us
Follow Us:
  • मंगळवेढ्यात भेसळ दूधाची विक्री
  • म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध मिसळल्याचा आरोप
  • अन्न औषध प्रशासनाकडे कारवाईची मागणी
मंगळवेढा/शिवाजी पुजारी : मंगळवेढा शहरात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची दूधाची मागणी वाढल्याने म्हशीच्या दूधात जर्शी गायीचे दूध भेसळ करुन ग्राहकांच्या माथी मारले जात असल्याचा प्रकार घडत आहे. याकडे अन्न औषध प्रशासनाचे कर्मचारी दुर्लक्ष करत गांधारीच्या भूमिका घेत असल्यामुळे तेरी भी चूप, मेरी भी चूप अशा प्रतिक्रीया नागरिकामधून व्यक्त होत आहे.

दीपावलीत दूधाची मागणी घरोघरी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर जर्शी गायीचे दूध भेसळ करण्याचा प्रकारही वाढत आहे. भेसळीचे दूध घरी नेहून तापवल्यानंतर पिवळी साय येवून चवीलाही बेचव लागत असल्याचे अनेकांनी सांगीतले. जर्शी गायीचे दूध स्वस्त दरात विकले जाते, तर म्हशीचे दूध महाग दरात विकले जाते. याचा फायदा घेण्यासाठी जर्शी गायीचे दूध म्हशीच्या दूधात भेसळ करून दूधवाले मालामाल होत आहेत. मंगळेवढ्यासाठी नेमलले अन्न भेसळचे अधिकारी मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहेत. भेसळ करणाऱ्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

डोंगर पोखरुन उंदीर काढला

दुसरीकडे शहरात पानटपऱ्यावरुन मोठ्या प्रमाणात गुटखा, मावा खुलेआम सुरु असतानाही कारवाई केली जात नाही. विधानसभेत गुटख्याविरुध्द विरोधकांनी आवाज उठविल्यावर अन्न भेसळ प्रशासन खडबडून जागे झाले व मंगळवेढ्यात केवळ एकावर कारवाई केली. मात्र हा डोंगर पोखरुन उंदीर काढल्याचा प्रकार म्हणावा लागेल. अधिकारी केवळ हात ‘ओले’ करीत असल्याची खमंग चर्चा शहरात सर्वत्र सुरु आहे.

पदार्थाचे नमुने घेण्याचा केवळ बहाणा

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दामाजी चौकातील एका चहा टपरीमधून विविध पदार्थाचे नमुने घेण्याचा केवळ बहाणा केला. त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केली नाही. नुसते नमुने नेले जातात, पुढे पुण्याला पाठविले जातात, असे वारंवार सांगितले जाते. मात्र कारवाई शुन्य आहे. या निष्क्रीय अधिकाऱ्याला येथून बदलून सक्षम अधिकारी नेमण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त होत आहे.

Web Title: Citizens have alleged that adulterated milk is being sold in mangalvedha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 12:52 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Mangalvedha
  • milk
  • Solapur News

संबंधित बातम्या

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ
1

डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने मुक्या जीवांची घुसमट; प्राण्यांमध्ये कानाच्या विकारांत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! MPSC मध्ये पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय समिती गठित; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
2

विद्यार्थ्यांच्या संघर्षाला यश! MPSC मध्ये पारदर्शकतेसाठी उच्चस्तरीय समिती गठित; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश
3

Solapur News: गोकुळला तहसीलदारांचा दणका! अडीच कोटी थकीत; एफआरपी तत्काळ देण्याचे निर्देश

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय
4

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.