Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांकडून गडचिरोली प्रशासनाचे कौतुक; म्हणाले, “जलसंधारण क्षेत्रात…”

गडचिरोली जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये जलसाठे उभारले गेले असून २०२५-२६ या वर्षात ६४.५ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली. यामुळे हजारो नागरिकांसाठी पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 30, 2025 | 09:53 PM
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांकडून गडचिरोली प्रशासनाचे कौतुक; म्हणाले, “जलसंधारण क्षेत्रात…”
Follow Us
Follow Us:

मुंबई: गडचिरोली जिल्ह्यात गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत जलसंधारण क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती झाली आहे. अल्प कालावधीत विक्रमी जलसाठा निर्माण करत गडचिरोलीने संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. यावर्षी पावसाळा २० दिवस आधी सुरू झाल्याने कामाचा कालावधी कमी झाला, तरीही जिल्हा प्रशासनाच्या प्रभावी समन्वय आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे मोठे यश मिळाले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीचे कौतुक करत म्हटले की, गडचिरोली जिल्ह्याने जलसंधारण क्षेत्रात जे यश मिळवले आहे, ते संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर ग्रामीण भागातील जलसुरक्षेच्या दिशेने टाकलेले एक भक्कम पाऊल आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ९७ गावांमध्ये जलसाठे उभारले गेले असून २०२५-२६ या वर्षात ६४.५ कोटी लिटर पाणी साठवण क्षमता निर्माण करण्यात आली. यामुळे हजारो नागरिकांसाठी पाण्याची उपलब्धता निश्चित झाली आहे. विशेष बाब म्हणजे याच वर्षात तब्बल ६,४४,६०१ घनमीटर गाळ काढून टाकण्यात आला, जो मागील दोन वर्षांच्या एकत्रित कामगिरीपेक्षा आठपट अधिक आहे. या कामांमध्ये विविध सामाजिक संस्था, संघटना यांचेही महत्त्वाचे योगदान आहेत.

Women’s Chess World Champion: महाराष्ट्र सरकार दिव्याला सन्मानित करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या कामगिरीत जिल्हा प्रशासन अर्थात गडचिरोली जिल्हाधिकारी यांचा मोठा सहभाग आहे. या वरुन असे लक्षात येते की, जिल्हा प्रशासन, ग्रामपंचायती, स्थानिक यंत्रणा आणि जनतेने एकत्रितपणे काम केल्यास कोणतेही ध्येय गाठणे अशक्य नाही. गडचिरोली जिल्ह्याने दाखवून दिले आहे की, नियोजनबद्ध पद्धतीने आणि तांत्रिक मार्गदर्शनाने जलसुरक्षेसाठी मोठी झेप घेता येते. या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करून संपूर्ण राज्यात अशा उपक्रमांची अंमलबजावणी केली जाईल. जलसंधारणाच्या माध्यमातून शेती, जनजीवन आणि पर्यावरण यांना स्थैर्य मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र सरकार दिव्याला सन्मानित करणार

महिला विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्याच प्रयत्नात दिव्या यांनी भारतीय विक्रम नोंदवला आहे. महिला कॅन्डिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरणाऱ्या पहिल्या किशोरवयीन बुद्धिबळपटू ठरल्या आहेत. यासोबतच आता त्या भारताची चौथ्या महिला ग्रँडमास्टर ठरल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी FIDE विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यामुळे दिव्या देशमुखचे अभिनंदन केले आहे. फडणवीस यांनी फोनवरून दिव्या देशमुखचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. ‘हा क्षण आणि नागपूरसाठी आणि आपल्या राज्यासाठी गर्वाचा आहे. महाराष्ट्र सरकार १९ वर्षीय ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा सत्कार करेल’, असे फडणवीस म्हणाले.

 

Web Title: Cm devendra fadnavis gadchiroli development silt free dam work

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 09:53 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Gadchiroli
  • Gadchiroli Rain

संबंधित बातम्या

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस
1

गडचिरोली जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; देसाईगंजमध्ये सर्वाधिक 145 मिमी पाऊस

‘माय मरो पण मावशी जगो!’; फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला
2

‘माय मरो पण मावशी जगो!’; फडणवीसांच्या ‘मराठी आई, हिंदी मावशी’ विधानावर अंबादास दानवेंचा खोचक टोला

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल
3

‘महाराष्ट्र आहे का तालिबान? मंत्र्यांचे कुटुंब सुरक्षित नसेल तर सामान्य जनतेचं काय?’ हर्षवर्धन सपकाळांचा फडणवीसांवर हल्लाबोल

MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार
4

MPSC विद्यार्थ्यांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय! ‘सगळ्या मागण्या मान्य’, 8 दिवसांत कारवाईचं आश्वासन; परीक्षेचं रिचेकिंग होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.