Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis: “संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी…”; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

आपण जे काही साध्य करतो, ते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते. शाळा, संस्था, शासनव्यवस्था, उद्योग हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 05, 2025 | 04:58 PM
Devendra Fadnavis: "संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी..."; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: "संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी..."; मुख्यमंत्री फडणवीस यांचे प्रतिपादन

Follow Us
Close
Follow Us:

मुख्यमंत्र्यांनी अनाथ युवक युवतींशी वर्षा निवासस्थानी साधला संवाद
अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय मनाला गहिवर आणणारा- फडणवीस 
आज मलाही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन वर्ष – फडणवीस

मुंबई: अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय हा माझ्या जीवनातील सर्वात समाधान देणारा निर्णय आहे. संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar ) यांनी मांडलेल्या ‘संधीची समानता’ या तत्त्वाच्या प्रेरणेने राज्य शासनाने 1 टक्का अनाथ आरक्षणाचा निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे 862 अनाथ युवक-युवती स्वावलंबी होऊन समाजासाठी कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो, शासनाच्या वर्षपूर्तीची सुरुवात सुंदर कार्यक्रमाने झाली असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, आज मलाही मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन वर्ष झाले. या वर्षपूर्तीची सुरुवातप्रसंगी अतिशय सुंदर कार्यक्रमाने झाली. निःशब्द भाव खूप बोलणारा असतो, तसा भाव आज माझ्या मनात आहे. शासनात अनेक निर्णय घेतले जातात, अनेक कामे केली जातात, पण काही निर्णय मनाला गहिवर देतात. तसाच अनाथ मुलांना आरक्षण देण्याचा निर्णय आहे.

संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘संधीची समानता’ हे तत्व आपल्या संविधानात समाविष्ट केले. पण ही समानता केवळ सामाजिक आरक्षणातून मर्यादित राहता कामा नये. अनाथ, दिव्यांग आणि इतर वंचित घटकांनाही संधी मिळायला हवी. त्या विचारातूनच 1 टक्के अनाथ आरक्षणाचा निर्णय झाला. या निर्णयामुळे अनेकांच्या आयुष्यात खरा बदल घडला आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

आरक्षणाच्या लाभार्थ्यांशी नव्हे परिवर्तनाच्या सारथ्यांशी संवाद… अनाथ आरक्षणाचा लाभ घेऊन आपल्या स्वप्नांना आकार देणाऱ्या महत्त्वाकांक्षी तरुणांशी आज संवाद साधताना निःशब्द झालो. 2018 मध्ये जेव्हा नोकरी आणि शिक्षणात 1% अनाथ आरक्षणाचा निर्णय घेतला, तेव्हा फक्त एक चांगले कार्य… https://t.co/PvvcLRuEGP pic.twitter.com/YbE0HuDLj3 — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 5, 2025

संघर्षातून पुढे आलेल्या युवकांनी समाजाचे ‘रोल मॉडेल’ व्हावे

आपण जे काही साध्य करतो, ते समाजाने निर्माण केलेल्या व्यवस्थेमुळे शक्य होते. शाळा, संस्था, शासनव्यवस्था, उद्योग हे सर्व समाजाच्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे. त्यामुळे या समाजाला परत काहीतरी देणे, हा प्रत्येकाचा धर्म आहे. संघर्षातून पुढे आलेले हे युवक समाजात ‘रोल मॉडेल’ बनावेत, अशी अपेक्षाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. जिथे पोहोचलात तिथे थांबू नका. संघर्षातून मिळवलेले यश हे पुढे समाजासाठी अविरत कार्य करण्याची प्रेरणा ठरावी. स्थैर्य मिळाल्यानंतरही समाजासाठी काहीतरी देण्याची भावना मनात कायम ठेवावी,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

माणसाचे कार्यच त्याला अमरत्व देतं. कार्यातूनच माणूस जिवंत राहतो. म्हणून तुमचं कार्यच तुमची ओळख बनवा, असे सांगून कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व अनाथ युवकांचा गौरव केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात महायुतीतील दुरावा वाढला? BJP ने पुन्हा एकनाथ शिंदेंकडे केला काणाडोळा, इशाराही टाळला

या कार्यक्रमात विनायक विश्वकर्मा या युवकाने मुख्यमंत्री यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत एक भावस्पर्शी कविता सादर केली.

आज घ्यायला नाही सर, काही द्यायला आलोय,

तुम्ही आरक्षण दिलं, दारिद्र्यातून बाहेर आलोय

तुम्ही मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, पण आम्ही तुम्हाला ‘देवा भाऊच’ म्हणणार

या ओळींनी भावनिक वातावरण निर्माण झाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्या युवकाचे कौतुक करतांना सांगितले की, या कवितेतून उमटणारी कृतज्ञता हीच या निर्णयाची खरी पावती आहे. समाजासाठी देण्याची भावना जर प्रत्येकामध्ये निर्माण झाली, तर तेच खरे परिवर्तन आहे. या संवादात उपस्थित युवकांनीही आपल्या अनुभवांची मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, या आरक्षणामुळे त्यांना शिक्षण, रोजगार आणि सन्मानाने जगण्याची संधी मिळाली आहे. आज आम्ही इतर अनाथ मुलांसाठी प्रेरणा आहोत.

Web Title: Cm devendra fadnavis said decision to provide reservation to orphans is the greatest satisfaction of my life

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 05, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • DCM Devendra Fadnavis
  • dr babasaheb amdekar
  • Maharashtra Government

संबंधित बातम्या

रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…
1

रत्नागिरी जिल्ह्यातील 2 हजारांपेक्षा बालिकांना ‘लेक लाडकी’ योजनेचा लाभ; तब्बल 1 कोटी 44 लाख…

“महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश
2

“महापरिनिर्वाण दिनासाठी सुरक्षेसह…”; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे स्पष्ट निर्देश

फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांत ‘लाडक्या बहिणी’; सरकारवर वाढतोय आर्थिक बोजा
3

फक्त महाराष्ट्रातच नाही तर देशातील अनेक राज्यांत ‘लाडक्या बहिणी’; सरकारवर वाढतोय आर्थिक बोजा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.