Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकारकडून दखल; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ ग्वाही

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात दिलेले आश्वासनाची पूर्तता होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यामध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 19, 2026 | 02:04 PM
कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची सरकारकडून दखल; CM देवेंद्र फडणवीसांनी दिली ‘ही’ ग्वाही
Follow Us
Follow Us:

आंबा-काजू उत्पादकांना भरपाई देऊ : फडणवीस
कोकणातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
वातावरणामुळे बागायतदारांना मोठा फटका

सिंधुदुर्गनगरी: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात झालेल्या मोठ्या नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली असून, शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच नुकसानभरपाईची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी आढावा बैठकीत सांगितले. मुंबई येथील विधान भवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, उद्योग मंत्री उदय सामंत, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार निलेश राणे, दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, भास्कर जाधव, महेंद्र दळवी, किरण सामंत, संबंधित मंत्री उपस्थित होते.

कोकणातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

दरम्यान, या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात दिलेले आश्वासनाची पूर्तता होणार आहे. कोकणातील शेतकऱ्यामध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांना न्याय मिळेल आणि त्यांच्या नुकसानीची भरपाई समाधानकारक पद्धतीने दिली जाईल. विशेष म्हणजे, ही नुकसानभरपाई याच आर्थिक वर्षात देण्याचा सरकारचा निर्धार असल्याने मुख्यमंत्रि फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ऐन पाडव्याला हापूस महाग; उत्पादनात मोठी घट झाल्याने दरात उसळी

ऐन पाडव्याला हापूस महाग

यंदाच्या हंगामात हवामानातील अनिश्चितता आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे हापूस आंबा उत्पादनात मोठी घट झाली असून, ऐन गुढीपाडव्याच्या तोंडावरच आंब्याचे दर गगनाला भिडले आहेत. कोकणातील उत्पादन ६० ते ७० टक्क्यांनी घटल्याचा अंदाज व्यक्त होत असून, बाजारात आवक कमी झाल्याने ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे.

हेदेखील वाचा : Alphonso Mango: आंबा, काजू बागायतदारांचा आक्रोश मोर्चा; मंत्री नितेश राणे काय म्हणाले?

पुणे मार्केटयार्डात सध्या हापूसची आवक अत्यल्प आहे. दररोज केवळ १५० ते २०० पेट्यांचीच नोंद होत असून, गेल्या वर्षी याच कालावधीत दोन ते तीन हजार पेट्यांची आवक होत होती. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली असली, तरी पुरवठा अपुरा पडत असल्याने दरात मोठी वाढ झाली आहे. सध्या बाजारात हापूसचा दर डझनमागे सुमारे १,५०० ते ३,५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

Web Title: Cm devendra fadnavis said will provide compensation to mango and cashew growers kokan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 02:02 PM

Topics:  

  • Alphonso Mango
  • CM Devendra Fadnavis
  • Sindhudurg

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
1

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
2

Maharashtra Drought : ‘10-12 दिवसांत निर्णय घ्या, नाहीतर महागात पडेल,’ दुष्काळ जाहीर करण्यासाठी रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…
3

Sindhudurga: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १९८ गावे संवेदनशील जाहीर; पाच तालुक्यांचा पश्चिम घाट…

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना
4

Eknath Shinde : ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, बांधावर जा, पंचनामे करा’, एकनाथ शिंदेंनी दिल्या मंत्र्यांना सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.