सैफ अली खान हल्ला प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया (फोटो- टीम नवराष्ट्र)
मुंबई : राज्यामध्ये सध्या अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यामुळे वातावरण तापले आहे. बॉलीवुडचा प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेता सैफ अली खानवर त्याच्याच घरात जीवघेणा हल्ला करण्यात आला. रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्तीने घरात घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच यामध्ये सैफी अली खानवर धारदार शस्त्राने सहा वार करण्यात आले. दरम्यान आता या हल्ला प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काल मध्यरात्री अभिनेता सैफ अली खान हल्ला करण्यात आला. सध्या त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचार सुरू याआहेत. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र या हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. तर सैफ अली खान यांच्यावर झालेला हल्ला हा पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीने सैफ अली खान यांना त्याच्या मुलाचे नाव तैमुर ठेवल्यावरुन टार्गेट केले जात होते. ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे किंवा कसे? या दिशेने ही तपास होणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
दरम्यान, अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अभिनेत्याच्या हल्ल्यासंबंधित पोलिसांनी याबाबत आम्हाला माहिती दिली आहे, हा हल्ला कोणत्या प्रकारचा आहे, पोलिसांनी हल्ल्याच्या बाबतीत सर्व माहिती दिली आहे. मुंबईत राहणे सुरक्षित नाही अशा प्रकारची वक्तव्ये करणे हे चुकीचे आहे. या हल्ल्यामगे कशाप्रकारकहा हेतू असू शकतो हे देखील पोलिसांनी सांगितले आहे. यामध्ये संपूर्ण कारवाई सुरू आहे.”
सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं धक्कादायक कारण समोर
मुंबई पोलिसांनी सांगितले की, एका अज्ञात व्यक्तीने अभिनेता सैफ अली खानच्या घरात प्रवेश केला आणि मोलकरणीशी वाद घातला. जेव्हा अभिनेत्याने मध्यस्थी करून त्या अज्ञात व्यक्तीला शांत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने सैफ अली खानवर हल्ला करून त्याला जखमी केले. सैफसोबतच मोलकरणीवरही एका अज्ञात व्यक्तीने हल्ला केला आहे. या हल्ल्यात त्याच्या हाताला दुखापत झाली. त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना मोलकरणीच्या भूमिकेबद्दल संशय आहे. त्या मोलकरणीने चोराला आत येण्यास मदत केली का? वैद्यकीय उपचारानंतर मोलकरणीचा जबाब नोंदवण्यात आला.
हेही वाचा: चोरी की आणखी काही…सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं धक्कादायक कारण समोर, पोलिसांना मोलकरणीच्या भूमिकेवर संशय?
महिला मदतनीसानेच आरोपीला दिली घरात एन्ट्री
पोलिसांच्या माहितीनुसार महिला कर्मचाऱ्याला भेटण्यास अज्ञात व्यक्ती घरात आल्याचं सांगण्यात येत आहे. सैफ अली खानच्या घरात असणाऱ्या महिला मदतनीसानेच आरोपीला घरात एन्ट्री दिली. तसेच या अज्ञात व्यक्तीने सदर महिला मदतनीसावर हल्ला केला. या वादात सैफ अली खान पडल्याने अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर देखील प्राणघातक हल्ला केला.