मी CM पदाच्या शर्यतीत नाही, पण...; विधानसभा निवडणुकीच्या मतदानाआघी एकनाथ शिंदेंचं मोठं विधान
विधानसभा निवडणुकीत बहुतमत मिळालं तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. त्यातच मतदानाला अवघे ३ दिवस उरले असताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. पण हेही निश्चित आहे की, पुढील मुख्यमंत्री हा महायुतीमधूनच होणार. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिंदेंनी हे विधान केलं आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबत बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
पक्ष फोडीवरून शिंदे म्हणाले की ‘फोडा आणि राज्य करा’ हे काँग्रेसचं धोरण आहे. राहुल गांधी बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट कधी म्हणणार? याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, आपल्या पक्षाचं काँग्रेस होऊ देणार नाही. परंतु उद्धव ठाकरे स्वत:च्या स्वार्थासाठी आणि मुख्यमंत्रिपद मिळावे म्हणून काँग्रेससोबत गेले. खुर्चीसाठी ते त्यांच्याकडे गेले. त्यांना वाटलं की, त्यांच्याशिवाय सरकार बनणार नाही आणि टिकणार नाही. युती तोडून उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याची टीकाही एकनाथ शिंदे यांनी केली.
प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींनी एक है तो सेफ है ची घोषणा दिली होती. त्याचं समर्थनही शिंदेंनी केलं. दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त राहुल गांधींनी अभिवादन केलं. त्याचं शिंदेंनी कौतुक केलं. मात्र त्यांच्या मनात शिवसेनेविषयी आधी काय भावना होती. पंतप्रधान मोदींनी आव्हान देऊपर्यंत राहुल गांधींनी स्वत: कधी बाळासाहेबांविषयी विधान केलं नव्हतं. पण हिंमत असेल तर त्यांनी बाळासाहेबांना हिंदुहृदयसम्राट म्हणावे, असंही म्हटलं आहे.
निवडणुकीसंदर्भात बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना जंगलात जाऊन वन्यप्राण्यांचे फोटो काढण्यासाठी पाठवलं असतं. उद्धव यांच्याबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, भाजपने आपल्याला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री बनवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण त्यापूर्वीच ते मुख्यमंत्री झाले. २०१९ निवडणुकीचा निकाल लागला त्यानंतर उद्धव ठाकरेंनी संधीचा फायदा घेत महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतही त्यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. विधानसभा निवडणुकीत बहुतमत मिळालं तर महायुतीचा मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. त्यातच मतदानाला अवघे ३ दिवस उरले असताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. पण हेही निश्चित आहे की, पुढील मुख्यमंत्री हा महायुतीमधूनच होणार असल्याचं ते म्हणाले.