मुंबई : खासदार संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक सदरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामध्ये संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी या लोकसभा निवडणुकीत अफाट पैशांचा वापर केला होता. त्याचबरोबर प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी वापरल्याचे म्हटले होते. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांना 3 दिवसांत माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जा, फौजदारी दिवाणी खटला दाखल करणार असे म्हटले आहे.
बिनशर्त माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाई
त्याचबरोबर अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडून न यावा, याकरिता कोट्यवधी रुपये वाटल्याचा दावा केला होता. त्याचबरोबर या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांसाठी सुद्धा पैशांचा अमाप वापर केल्याचे म्हटले होते. प्रत्येक मतदारसंघात 25 ते 30 कोटी वापरल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांना लिगल नोटीस पाठवत बिनशर्त माफी मागा, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावा, असे म्हटले आहे.
संजय राऊतांकडून कायदेशीर नोटीसची खिल्ली……
50 खोके एकदम ओके।
इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे।
गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक legal notice भेजी है.very intresting and one of the funny political document.
अब आयेगा मजा!!
जय महाराष्ट्र!
@mieknathshinde
@AUThackeray
@ECISVEEP pic.twitter.com/9CkFigfith— Sanjay Raut (@rautsanjay61) May 29, 2024
संजय राऊतांनी कायदेशीर नोटीसची उडवली खिल्ली
खासदार संजय राऊत यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. ही नोटीस राऊतांनी सोशल मीडियावर शेअर करत त्याची खिल्ली उडवली आहे. हे एक मजेशीर राजकीय पत्र असल्याचं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
या पूर्वीदेखील संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करीत, नितीन गडकरी निवडून न येण्यासाठी योग्य ती व्यवस्था करीत पैशांचा वापर केला असल्याचे म्हटले होते. असे नागपूरमधील आरएसएसचे स्वयंसेवकच खासगीत म्हणत असल्याचा धक्कादायक खुलासा देखील केला होता. यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार करीत गांजा पिऊन सामनाचे अग्रलेख लिहतात, असे म्हटले होते.