कोळशाने लावली अर्थव्यवस्थेला आग! दरात प्रति किलो दुपटीने वाढ; गॅस एजन्सीबाहेर अजूनही रांगा
मुंबई महानगर प्रदेशात एलपीजीच्या तुटवड्यामुळे कोळशाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. कारण हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि कुटुंबे पर्यायी इंधनाच्या शोधात आहेत. दरम्यान, शहरातील अनेक भागांमध्ये किरकोळ कोळशाच्या दरात जवळपास ५० टक्केने वाढ झाली आहे, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, जो कोळसा पूर्वी ३०-४० रुपये प्रति किलोग्रॅम दराने विकला जात होता, तो आता खार, वर्सोवा आणि भायखळा यांसारख्या भागांमध्ये ५० ते ६० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला आहे. तथापि, काही छोटे विक्रेते ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी जुन्या साठ्यावर अवलंबून कमी दरात विक्री करत आहेत. डोंगरीतील एका विक्रेत्याने सांगितले की, तो अजूनही ३०-३५ रुपये प्रति किलोग्रॅम दराने कोळसा विकत आहे.स्वयंपाकासाठी कोळशावर अवलंबून असलेल्या छोट्या खानावळींवर याचा मोठा परिणाम होत आहे.(फोटो सौजन्य – istock)
अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान; पुणे-कोल्हापूर मार्गालाही तडाखा
अंधेरीतील एका रेस्टॉरंट मालकाने स्पष्ट केले की, प्रस्थापित व्यवसायांना पुरवठादारांसोबतच्या दीर्घकालीन संबंधाचा फायदा होत आहे. तर नवीन आस्थापनांना जास्त किंमत मोजावी लागत आहे. मोठी हॉटेल्स आणि प्रस्थापित रेस्टॉरंट्सवर सध्या या दरवाढीचा कमी परिणाम झाला आहे. चौधरी कोल डेपोचे अब्दुल कुद्दुस चौधरी यांनी स्पष्ट केले की, दीर्घकालीन करारामुळे मोठ्या खरेदीदारांसाठी किमती अचानक वाढवता येत नाहीत.
दक्षिण मुंबईतील एका कबाब विक्रेत्याने सांगितले की, त्याचा खरेदी खर्च दुप्पटीहून अधिक झाला आहे. जो कोळसा पूर्वी ४०-५० रुपये प्रति किलो होता, तो आता १०० रुपयांच्या वर पोहोचला आहे. मोहम्मद अली रोडजवळील झीनत सीख कबाब कॉर्नर’चे मालक तुफैल खान यांच्या मते, कोळशाची किमत ४० रुपयांवरून ७०-८० रुपये प्रति किलो झाली आहे.
मुंबईकरांना दिलासा! पालिका रुग्णालयांत लवकरच सुरू होणार MRI सेवा, आरोग्य व्यवस्थेला मिळणार मोठी ताकद
मालाडचे रहिवासी फुलबाबू झा यांनी सांगितले गॅससोबत कोळशाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
की, त्यांनी २० दिवसांपूर्वी कस्टमर केअरला फोन करून एचपी सिलेंडर बुक केला होता, पण २० दिवसांपेक्षा जास्त काळ लोटूनही सिलेंडर मिळालेला नाहीं. ते चारकोप येथील गॅस एजन्सीमध्ये गेले आणि सिलेंडर घेण्यासाठी अनेक तास रांगेत थांबले, त्यांच्या मित्राने सांगितले की, त्याचा नंबर येण्यापूर्वी तो दोन दिवस रांगेत होता आणि अखेरीस त्याला सिलेंडर मिळाला. झा यांनी पुढे सांगितले की, दोन-तीन दिवस रांगेत थांबूनही अनेकांना त्यांचे सिलेंडर मिळत नाहीत.






