Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इराण–इस्त्रायल युद्धाचे महाराष्ट्रात पडसाद! कमर्शियल गॅसचा तुटवडा असल्याने हॉटेल व्यवसाय संकटात

इराण–इस्त्रायल युद्धाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले असून पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात हॉटेल व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 08, 2026 | 02:43 PM
Commercial gas shortage due to Iran-Israel war affects Satara hotel industry

Commercial gas shortage due to Iran-Israel war affects Satara hotel industry

Follow Us
Follow Us:
  • इराण–इस्त्रायल युद्धाचा महाराष्ट्रामध्ये परिणाम
  • कमर्शियल गॅसचा तुटवडा जाणवत आहे
  • याचा हॉटेल इंडस्ट्रीवर मोठा परिणाम
Satara News :  उंब्रज : मध्यपूर्वेत सुरू असलेल्या इराण–इस्त्रायल युद्धाचे (Iran Israel War) पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले असून पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्ह्यात हॉटेल व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर अचानक मर्यादा आल्याने हॉटेल व रेस्टॉरंट चालकांसमोर मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. (Satara News)

सातारा जिल्हा हा महाबळेश्वर, पाचगणी, कास पठार, सज्जनगड, कोयना धरण आणि वासोटा किल्ला यांसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळांमुळे वर्षभर पर्यटकांनी गजबजलेला असतो. या पर्यटनावर हजारो कुटुंबांचा हॉटेल, ढाबे, रेस्टॉरंट आणि खानावळ व्यवसाय अवलंबून आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक हॉटेल्समध्ये स्वयंपाकघर चालवणे कठीण झाले आहे.

हे देखील वाचा : UAE मध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी धोक्याची घंटा! दूतावासाकडून कडक नियमावली जाहीर

हॉटेल व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, गॅस एजन्सीकडून पुरेशा प्रमाणात कमर्शियल सिलेंडर मिळत नाहीत. काही ठिकाणी सिलेंडर मिळण्यास विलंब होत आहे, तर अनेक विक्रेते “शासन निर्देश असल्याने कमर्शियल सिलेंडर देऊ शकत नाही” असे सांगत आहेत. परिणामी काही हॉटेल मालकांना बाजारातून जादा दराने सिलेंडर घ्यावे लागत असून व्यवसायाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

पर्यटन हंगामात सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होतात. विशेषतः महाबळेश्वर व पाचगणी परिसरात हॉटेल आणि रेस्टॉरंटची मोठी संख्या आहे. मात्र सिलेंडर टंचाईमुळे अनेक हॉटेल्सना नाश्ता आणि जेवणाच्या सेवा मर्यादित कराव्या लागल्या असून काही ठिकाणी स्वयंपाकघर तात्पुरते बंद करण्याची वेळ आली आहे.

या परिस्थितीमुळे हॉटेल व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासन आणि तेल कंपन्यांनी तातडीने हस्तक्षेप करून कमर्शियल गॅसचा नियमित पुरवठा सुरू करावा, अशी मागणी व्यावसायिकांकडून केली जात आहे. अन्यथा हजारो कामगारांच्या रोजगारावर गदा येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, गॅस एजन्सींकडूनही पुरेसा साठा उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे. जर लवकर तोडगा निघाला नाही तर पर्यटनावर आधारित सातारा जिल्ह्याच्या स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यटन हंगामाच्या तोंडावरच निर्माण झालेल्या या संकटामुळे सातारा जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हे देखील वाचा : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मोठी अपडेट; एक आरोपी येणार जेलबाहेर, कारण काय?

या परिस्थितीवर उंब्रजमधील हॉटेल पंचमीचे पद्माकर शेट्टी म्हणाले की, “कमर्शियल सिलेंडर मिळणे बंद झाले आहे. उंब्रज (ता. कराड) येथे विविध कंपन्यांचे सिलेंडर विक्रेते शासन आदेशानुसार कमर्शियल गॅस विक्रीवर निर्बंध असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे हॉटेल व्यवसाय मोठ्या अडचणीत आला आहे. अन्न शिजवायचे कसे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की कामगारांचा पगार देणेही कठीण झाले असून संपूर्ण व्यवसाय अडचणीत सापडला आहे, अशी व्यथा त्यांनी मांडली.

“शासन निर्देश असल्याने वितरण बंद”
शिरगाव मधील शिरगावकर HP गॅस एजन्सीचे धीरज पाटील म्हणाले की, “कमर्शियल गॅस पुरवठा करणाऱ्या कंपनीकडून आदेश आल्याने आम्ही कोणत्याही व्यावसायिक कनेक्शनधारकाला कमर्शियल सिलेंडर देऊ शकत नाही. नियम व आदेश डावलून पुरवठा केल्यास आम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे नवीन आदेश येईपर्यंत कमर्शियल सिलेंडर विक्री बंद ठेवण्यात आली आहे.”

Web Title: Commercial gas shortage due to iran israel war affects satara hotel industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Commercial Gas
  • Iran Israel Conflict
  • Satara News

संबंधित बातम्या

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!
1

Wai Encroachment Drive: वाई शहरात नगरपरिषदेचा धडक दणका; अनधिकृत फ्लेक्स, टपऱ्या अन् गटारांवरील अतिक्रमणांवर हातोडा!

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
2

Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध
3

Satara News: शेती अन् पर्यावरण धोक्यात! बावधनसह १० गावांतील शेतकरी, महिला रस्त्यावर; प्रकल्पाला एकजुटीने विरोध

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट
4

Satara News: साताऱ्यातील शेनवडी जि. प. शाळा झाली ‘डिजिटल’! कदम दांपत्याकडून १ लाख १६ लाखांचा स्मार्ट पॅनल बोर्ड भेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.