संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे येणार जेलबाहेर येणार आहे (फोटो - सोशल मीडिया)
संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी वाल्मिक कराडसह इतर आरोपी हे जेलमध्ये आहेत. त्याचबरोबर एक आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे. या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला जिल्हा न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. जयराम चाटे याचा भाऊ श्रीराम काटे यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पुढील धार्मिक विधींसाठी जयराम चाटे हा जेलबाहेर येणार आहे.
हे देखील वाचा : गेम होणार अन् बिहारमध्ये ‘चाणक्य’ भाकरी फिरवणार? नितीश कुमार राज्यसभेवर जाताच…; BJP चा ‘हा’ नेता…
आरोपी जयराम चाटे भावाच्या बाराव्याच्या विधीकरिता त्याला त्याच्या गावी जाण्याची परवानगी कोर्टाने दिली. मात्र, ही परवानगी देताना काही नियम आणि अटी दिल्या आहेत, ज्याचे पालन आरोपीला करावे लागणार आहे. जयराम चाटे याला पोलिस बंदोबस्तमध्ये घेऊन गेले जाणार आहे. त्यानंतर काही तासात त्याला पुन्हा तुरूंगात आणले जाईल. 13 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत पोलिस बंदोबस्तात उपस्थित राहण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे. मकोका विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून हा निर्णय दिला.
हे देखील वाचा : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हे मोक्का अतंर्गत जेलमध्ये आहेत. तब्बल 14 महिन्यानंतर आरोपी जयराम चाटे हा जेलमधून बाहेर येणार आहे. पोलीस बंदोबस्तात तो धार्मिक विधीस उपस्थित राहणार आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जयराम चाटेला पोलीस बंदोबस्ताचे शुल्क स्वतः भरावे लागणार आहे. तसेच न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे काटेकोरपणे पालन करणे त्याच्यासाठी बंधनकारक असणार आहे.






