Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य सरकारकडून सर्वसामान्यांना दिलासा मिळणार; ऐन उन्हाळ्यात वीज दरात कपात होणार

नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी विविध स्लॅबनुसार वीज दरात घट करण्यात आली आहे. यामुळे घरगुती ग्राहकांचे मासिक वीज बिल कमी होण्याची शक्यता आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 27, 2026 | 12:35 PM
राज्यात १ एप्रिलपासून वीज होणार स्वस्त

राज्यात १ एप्रिलपासून वीज होणार स्वस्त

Follow Us
Follow Us:

मुंबई : उन्हाळ्याच्या तडाख्यात नागरिकांना दिलासा देणारा महत्त्वाचा निर्णय राज्य वीज नियामक आयोगाने घेतला आहे. महावितरण, अदाणी, बेस्ट आणि टाटा या वीज वितरण कंपन्यांच्या प्रस्तावानुसार घरगुती वीज दरात कपात करण्यात आली असून, नवीन दर १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. उकाड्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वसामान्य ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

विशेषतः कमी वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी बेस्ट प्रशासनाने स्वस्त दर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे लहान ग्राहकांना अधिक फायदा होणार आहे. नवीन आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी विविध स्लॅबनुसार वीज दरात घट करण्यात आली आहे. यामुळे घरगुती ग्राहकांचे मासिक वीज बिल कमी होण्याची शक्यता आहे. या दरकपातीमुळे वाढत्या तापमानात वीज वापर वाढत असतानाही ग्राहकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार असल्याचे मानले जात आहे.

मुख्यमंत्र्यांनी वचन पाळले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार स्थापन करताना भविष्यात वीज दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मुख्यमंत्र्यांनी रामनवमीच्या दिवशी ही भेट देऊन आपले वचन पूर्ण केले. ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभार सांभाळणाऱ्या फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना वीज दर कमी करण्याचे कडक निर्देश दिले होते. कोणत्याही परिस्थितीत वीज दरात वाढ करू नये. विशेषतः शेतकरी, ग्रामीण रहिवासी आणि मध्यमवर्गीयांना अनुदानित वीज पुरवली पाहिजे, असे आदेश त्यांनी दिले होते. राज्यात शेतीसाठी वापरली जाणारी वीज पूर्णपणे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून मिळवली पाहिजे. या दिशेने महाराष्ट्रात एक मोठी मोहीम सुरू आहे.

थकीत भरणाही कोट्यवधींचा

विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील १ लाख ६७ हजार ८२५ ग्राहकांकडे २५ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडल अंतर्गत १ हजार १८२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : रत्नागिरी परिमंडलात २५ कोटी ९१ लाखांची थकबाकी; दोन महिन्यांत १ हजार १८२ ग्राहकांचा…

Web Title: Common citizens to receive relief from maharashtra government electricity tariffs to be reduced

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2026 | 12:35 PM

Topics:  

  • Electricity Issue
  • Light Bill
  • Mumbai News

संबंधित बातम्या

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
1

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
2

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप
3

Mumbai News: प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी वास्तुविशारदांवर का? आक्षेप ‘वास्तुकला परिषदे’चा मुंबई पालिकेच्या निर्णयाला आक्षेप

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास
4

IIT Bombay Student Suicide : ‘वरच्या जातीचा मी, तू खालच्या जातीचा’; साहिलच्या वडिलांचा गंभीर आरोप, क्राइम ब्रांचकडे तपास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.