रत्नागिरी परिमंडलात थकबाकी (फोटो- सोशल मीडिया)
१ हजार १८२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात केला खंडित
रत्नागिरी विभागात अशी आहे थकबाकी
कणकवली विभागात ३४ हजार थकबाकीदार
रत्नागिरी/सिंधुदुर्ग: विजेचा वापर केल्यानंतरही बिलांचा मासिक भरणा नियमित होत नसल्याने रत्नागिरी परिमंडल अंतर्गत प्रामुख्याने घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सेवा व इतर वर्गवारीतील १ लाख ६७ हजार ८२५ ग्राहकांकडे २५ कोटी ९१ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे. यामुळे गेल्या दोन महिन्यांत परिमंडल अंतर्गत १ हजार १८२ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे थकबाकीदार वीजग्राहकांनी बिलांचा भरणा देय दिनांकापूर्वी करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महावितरणचे अधिकृत वीजबिल भरणा केंद्र मार्च २०२६ अखेरपर्यंत शनिवारी, रविवारी व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत. या थकीत बिलांचा त्वरित भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Yavatmal News: यवतमाळमधील २१ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
वीजग्राहकांना www.mahadiscom.in या वेबसाईटवर व महावितरणच्या मोबाईल अॅपद्वारे केव्हाही व कुठूनही ऑनलाइन पध्दतीने विनामर्यादा वीजबिलाचा भरणा करता येतो. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. या व्यतिरिक्त महावितरणने ५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल असणा-या सर्व लघुदाब ग्राहकांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे देयक भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यासाठी आवश्यक माहितीचा तपशील संबंधित ग्राहकांच्या वीजबिलावर उपलब्ध आहे.
कणकवली विभागात ३४ हजार थकबाकीदार
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागात ३४ हजार ८५१ ग्राहकांकडे ०६ कोटी १२ लाख, कुडाळ विभागात ३८ हजार १०८ ग्राहकांकडे ०७ कोटी ०४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील ४७४ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे.
राज्यातील जनतेला वीज दरवाढीचा झटका बसणार? तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांच्या वाढीचा अंदाज…
रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी विभागात ४३ हजार ८४३ ग्राहकांकडे ०५ कोटी ८४ लाख, चिपळूण विभागात २४ हजार ६४८ ग्राहकांकडे ३ कोटी ३१ लाख, खेड विभागात २६ हजार ३७५ ग्राहकांकडे ०३ कोटी ६१ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे जिल्ह्यातील ७०८ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरुपात खंडीत केला आहे.






