Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची मागणी

न्यायालयाच्या आदेशानुसार प्रलंबित मोबदल्याची रक्कम तातडीने अदा करून भविष्यात अशा प्रकारची नामुष्की पुणे महानगरपालिकेवर येणार नाही, यासाठी आवश्यक ती ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी रविंद्र साळेगावकर यांनी केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 05, 2026 | 03:01 PM
चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची मागणी

चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची मागणी

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील देवाची उरुळी आणि फुरसुंगी येथे कचरा डेपोसाठी संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. याप्रकरणी पुणे महापालिका आयुक्तांच्या ‘खुर्चीला’ दणका बसला आहे. न्यायालयाने आयुक्त कार्यालयातील खुर्ची जप्तीचे आदेश दिल्याने प्रशासनाला धक्का दिला आहे. याप्रकरणी आता भाजपचे नगरसेवक रविंद्र साळेगावकर यांनी मोबदल्याची रक्कम तातडीने अदा करण्याची आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. या मागणीचे निवेदन साळेगावकर यांनी पुणे महापालिका आयुक्तांना दिले आहे. यावेळी नगरसेवक सुनील पांडेही उपस्थित होते.

रविंद्र साळेगावकर निवेदनात म्हणाले, न्यायालयाने प्रलंबित मोबदल्याची रक्कम अदा न केल्यामुळे पुणे महानगरपालिकेविरुद्ध कठोर भूमिका घेत आयुक्त कार्यालयातील खुर्ची व इतर मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिल्याची बाब समोर आली आहे. ही घटना अत्यंत गंभीर असून पुणे महानगरपालिकेच्या प्रतिमेला धक्का देणारी आहे. सदर प्रकरण हे अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे समजते.

संबंधित मोबदल्याची रक्कम न्यायालयीन आदेशानुसार मान्य करण्यात आली असली तरी ती वेळेत अदा न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. ही रक्कम नेमकी कधी मंजूर करण्यात आली, कोणत्या टप्प्यावर ती प्रलंबित राहिली आणि कोणत्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे किंवा विलंबामुळे ही वेळ महानगरपालिकेवर आली, याची सविस्तर चौकशी होणे आवश्यक आहे.

आयुक्तांसारख्या सर्वोच्च प्रशासकीय अधिकाऱ्यांवर अशी वेळ येणे ही अत्यंत दुर्दैवी आणि प्रशासनासाठी अपमानास्पद बाब आहे. या परिस्थितीस आयुक्त वैयक्तिकरित्या जबाबदार नसून, संबंधित प्रकरणे वेळेत न्यायालयात मांडण्यात, न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करण्यात तसेच मोबदल्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या विधी विभागातील (Legal Department) तसेच संबंधित खात्यांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.

तरी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून, सदर मोबदल्याची रक्कम कधीपासून प्रलंबित आहे, ती कधी मंजूर करण्यात आली आणि कोणाच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली याचा स्पष्ट अहवाल तयार करून संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. तसेच न्यायालयाच्या आदेशानुसार प्रलंबित मोबदल्याची रक्कम तातडीने अदा करून भविष्यात अशा प्रकारची नामुष्की पुणे महानगरपालिकेवर येणार नाही, यासाठी आवश्यक ती ठोस उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी रविंद्र साळेगावकर यांनी केली आहे.

Mumbai Local मध्ये महिलांसाठी महत्त्वाचा निर्णय ! महिलांचा डबा ओळखणे होणार सोपे; ‘पिंक स्टॉपिंग पॉइंट’चा प्रस्ताव

Web Title: Conduct an inquiry and take action against negligent officials demands corporator ravindra salegaonkar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:01 PM

Topics:  

  • political news
  • pune news

संबंधित बातम्या

Rohit Patil Disqualified: दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे पद रद्द; जात प्रमाणपत्र ठरले अवैध
1

Rohit Patil Disqualified: दौंडचे नगरसेवक रोहित पाटील यांचे पद रद्द; जात प्रमाणपत्र ठरले अवैध

Table Tennis: पुण्याच्या खेळाडूंचा दबदबा! हरीश साळवी चॅम्पियन, प्रदीप गुप्ताचाही कडवा संघर्ष
2

Table Tennis: पुण्याच्या खेळाडूंचा दबदबा! हरीश साळवी चॅम्पियन, प्रदीप गुप्ताचाही कडवा संघर्ष

Pune News: मुसळधार पावसाने खचलेल्या करंजाळे रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज
3

Pune News: मुसळधार पावसाने खचलेल्या करंजाळे रस्त्याची युद्धपातळीवर दुरुस्ती; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सज्ज

कॅन्सरवर मात करून कॅन्सरमुक्त जीवन जगणारे समाजाचे खरे हिरो : डॉ. विश्वजीत कदम
4

कॅन्सरवर मात करून कॅन्सरमुक्त जीवन जगणारे समाजाचे खरे हिरो : डॉ. विश्वजीत कदम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.