नागपूर : अग्निपथ विरोधात काँग्रेस राज्यात आणि देशभरात चांगलेच आक्रमक झाले असून ठिकाणी आंदोलनाला सुरुवात झाली आहे . नागपुरात आज पाच ठिकाणी केलं. नागपूरच्या मेडिकल चौकात झालेल्या आंदोलनात कार्यकर्ते अग्निपथ विरोधात चांगलेच आक्रमक झाले असल्याचं चित्र पाहायला मिळालं.
[read_also content=”मुंबईत एनसीबीकडून २८६ किलोचा उच्च प्रतीचा गांजा जप्त https://www.navarashtra.com/crime/ncb-seizes-286-kg-of-high-quality-cannabis-in-mumbai-nrps-297642.html”]
या आंदोलनाचे नेतृत्व आमदार विकास ठाकरे यांनी केलं. ज्याप्रमाणे देशात शेतकऱ्यांसाठी केलेले काळे कायदे केंद्र सरकारला वापस घ्यावे लागले त्याप्रमाणे हे अग्निपथ योजनासुद्धा केंद्राला वापस घण्यासाठी भाग पाडू असे यावेळी ते म्हणाले. यासाठी देशभरात आंदोलन केले जाईल असं यावेळी आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले.
[read_also content=”अंध, दिव्यांगांच्या उन्नतीसाठी डोळस व्यक्तींनी पुढे यावं : श्रीनिवास पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/blind-crippled-people-should-come-forward-for-the-upliftment-of-the-disabled-says-srinivas-patil-nrka-297652.html”]






