Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रशांत कोरटकरबाबत काँग्रेसचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांकडे केली ‘ही’ मागणी

प्रशांत कोरटकरसोबत फडणविसांच्या कार्यालयातील प्रतिक पडवेकर होता का? याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा अशी मागणी अतुल लोंढे यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 28, 2025 | 04:54 PM
प्रशांत कोरटकरबाबत काँग्रेसचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांकडे केली 'ही' मागणी

प्रशांत कोरटकरबाबत काँग्रेसचा मोठा गौप्यस्फोट; फडणवीसांकडे केली 'ही' मागणी

Follow Us
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा तथाकथित पत्रकार प्रशांत कोरटकरला तेलंगणातील मंचरेला येथून अटक करण्यात आल्याचे सरकारने जाहीर केले आहे परंतु अटक केली त्यावेळी कोरटकर सोबत मुख्यमंत्री कार्यालतील कर्मचारी प्रतिक पडवेकर होता, त्यांना सोबत घेऊनच कोल्हापूर पोलीस आले, हे खरे आहे का? याचा खुलासा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

प्रशांत कोरटकरच्या अटकेसंदर्भात गौप्यस्फोट करत अतुल लोंढे म्हणाले की, आम्हाला जी माहिती मिळाली आहे त्यानुसार प्रशांत कोरटकरला तेलंगणात अटक करण्यात आली त्यावेळी प्रतिक पडवेकर हा प्रशांत कोरटकर सोबत होता. मग त्यांना का लपवून ठेवले आहे, त्याला का दाखवत नाहीत. महिनाभर प्रशांत कोरटकरला खरी मदत कोण करत होते, ते पुढे का येत नाही, हा महत्वाचा प्रश्न आहे. प्रशांत कोरटकरच्या अटकेसंदर्भात काही माहिती का लपवली जात आहे? हा प्रश्न पडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे खरे प्रेमी असाल तर गृहमंत्र्यांनी सर्व माहिती जाहीर करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणारा प्रशांत कोरटकर महिनाभर लपून बसला होता, त्याला कोणी साथ दिली, कोणाच्या आशिर्वादाने तो लपला होता याची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत आणि महाराष्ट्राच्या जनतेला ती जाणून घेण्याचा हक्क आहे असेही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.

प्रशांत कोरटकरच्या पोलीस कोठडीत वाढ

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करणारा, इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना अश्लिल शिवीगाळ करून त्यांना धमकावणारा तथाकथित पत्रकार आरोपी प्रशांत कोरटकरला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आज कोल्हापूरच्या सेशन कोर्टात याप्रकरणी सुनावणी पार पडली.

Web Title: Congress has made a big revelation about prashant koratkar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2025 | 04:49 PM

Topics:  

  • Arrested
  • Atul Londhe
  • BJP
  • Congress
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Prashant Koratkar

संबंधित बातम्या

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद
1

Mumbai News: गोवंडी-मानखुर्दला ‘विषारी हवे ‘पासून मिळणार दिलासा! बेकायदेशीर आरएमसी काँक्रिट प्लाण्ट होणार बंद

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात
2

Gondiya News: जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाची हत्या; मुंडीपारच्या खुनाचा उलगडा! दोघांसह २ विधिसंघर्षग्रस्त ताब्यात

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक
3

Pratap Sarnaik: शेतकऱ्यांना लवकरच मिळणार मदत; जीआर काढण्याची प्रक्रिया सुरू – प्रताप सरनाईक

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
4

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.