Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, राज्यात गँग अन्…; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल

ट्रिपल इंजिन सरकारने दिल्लीत जाऊन राज्यासाठी स्पेशल पॅकेज आणावे पण या तिघांमध्ये ती धमक नाही, असं हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 20, 2025 | 05:12 PM
राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, राज्यात गँग अन्...; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल

राज्यातील विदारक परिस्थितीला फडणवीस सरकारच जबाबदार, राज्यात गँग अन्...; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

पालघर : भारतीय जनता पक्षाचे सरकार लाडका उद्योगपती अदानीसाठी रेट कार्पेट टाकत आहे. मुंबईतील धारावी अदानीला विकली आहे, मुंबईतील महत्वाचे भुखंड अदानीच्याच घशात घातले आहेत. नवी मुंबई विमानतळही अदानीलाच दिलेले आहे आणि आता पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंतचा मोठा सागरी पट्टा सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अदानीच्या घशात टाकण्याचा घाट घातलेला आहे, असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

पालघर येथे पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शेतकऱ्यांचा विरोध असताना, आवश्यकता नसतानाही भाजपा सरकार नागपूर ते गोवा शक्तीपीठ मार्ग टाकत आहे. जेट्टीतून समुद्र किनाऱ्यापासून थेट सेंट्रल इंडियापर्यंत अदानी अंबानीला रेड कार्पेट टाकले जात आहे. गोव्यातील कोळसा व खनिजे यांचा व्यापार या दोन उद्योगपतींना सहज करता यावा आणि कोकणात सापडलेली मुबलक प्रमाणातील खनिजे अदानी, अंबानीला लुटता यावीत यासाठी हा शक्तीपीठ मार्ग बांधला जात आहे. कोकणी माणूस एकजूट करुन राहतो त्याला छेद देण्यासाठी व या लोकांना शांत बसवण्यासाठी सिंधुदुर्गातील वाचाळवीर मंत्री बेताल वक्तव्य करुन समाजात तेढ निर्मण करत आहेत. आता पालघरमध्येही असेच फासे टाकले जात आहेत, इथल्या जमिनी उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. हा आदिवासी भाग आहे पण जमीन अधिगृहणामध्ये त्यांना दिलेल्या संरक्षणाची पायमल्ली सुद्धा केली जात आहे.

देवेंद्र फडणवीस २०१४ ते १९ पाच वर्ष मुख्यमंत्री होते नंतर फोडाफोडी करून २.५ वर्षे ते उपमुख्यमंत्री राहिले आणि आता पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार आहे, आता मोठे बहुमत मिळाले आहे पण राज्यात विदारक परिस्थिती आहे आणि त्याला फडणवीस सरकारच जबाबदार आहे. भाजपाच्या राज्यात शेतमालाला भाव नाही, शेतकरी कर्जबाजारी आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, कायदा सुव्यवस्थेची वाट लागली आहे. महिला अत्याचार वाढत आहेत, नव्याने गँग पुढे येते आहेत. रेती गँग, कोयता गँग, आका, खोक्या गँगनी उच्छाद मांडला आहे. सत्ताधारी पक्षातील गुंड खंडणी वसुली करताना दिसत आहेत. राज्य सरकारकडे विकास कामासाठी पैसे नहीत, अर्थसंकल्पात मोठी महसूली तुट आहे. परिणामी उत्पन्न व खर्च यांचा मेळ बसत नाही. राज्य सरकामधील प्रमुख नेते नरेंद्र मोदींचे मोठे गुणगाण गात असतात, या ट्रिपल इंजिन सरकारने दिल्लीत जाऊन राज्यासाठी स्पेशल पॅकेज आणावे पण या तिघांमध्ये ती धमक नाही, असेही सपकाळ म्हणाले. विधानसभेला आघाडी होती त्यामुळे पालघरमध्ये काँग्रेसचे उमेदवार देता आले नाहीत पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची ताकद नक्कीच वाढेल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.

Web Title: Congress state president harshvardhan sapkal has criticized the mahayuti government nrdm 3

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • devendra fadanvis
  • Gautam Adani
  • Harshvardhan Sapkal
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
1

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…
2

राज्यात मुसळधार पाऊस सुरुच; पुणे, मुंबई, ठाण्यासह अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं, येत्या 24 तासांत…

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी
3

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्य निवडणूक आयुक्तांची घेतली भेट; केली ‘ही’ मोठी मागणी

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
4

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.