Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीपुरवठा योजना बंद केल्याने ठेकेदार त्रस्त! कोट्यवधींचा निधी प्राप्त; शासनाकडून निधी असूनही देयके नाहीत

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जलपुरवठा विभागाने कामे अपूर्ण असताना सुद्धा पाणी पुरवठा बंद केल्यामुळे ठेकेदार अडचणींमध्ये पडले आहेत. ठेकेदारांकडून प्रत्येक कामामागे सुमारे ३० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 01, 2026 | 01:54 PM
पाणीपुरवठा योजना बंद केल्याने ठेकेदार त्रस्त! कोट्यवधींचा निधी प्राप्त; शासनाकडून निधी असूनही देयके नाहीत

पाणीपुरवठा योजना बंद केल्याने ठेकेदार त्रस्त! कोट्यवधींचा निधी प्राप्त; शासनाकडून निधी असूनही देयके नाहीत

Follow Us
Follow Us:

केंद्र व राज्य सरकारची महत्त्वाकांक्षी ‘हर घर नल’ योजना जिल्हा परिषदेच्या ग्रामीण जलपुरवठा विभागाने अनेक कामे अपूर्ण असतानाही पूर्ण झाल्याचा अहवाल देत बंद केल्याचा आरोप ठेकेदारांनी केला आहे. प्रत्यक्षात या योजनेंतर्गत केलेल्या कामांची अनेक ठेकेदारांची बिले अद्याप थकीत आहेत. त्यामुळे कामे करूनही देयके न मिळाल्याने ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, थकीत देयके अदा करण्यासाठी ठेकेदारांकडून प्रत्येक कामामागे सुमारे ३० हजार रुपयांची मागणी केली जात असल्याचा आरोपही काही ठेकेदारांनी केला असून, त्यामुळे त्यांच्यात संतापाचे वातावरण आहे.(फोटो सौजन्य – AI)

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ‘हर घर नल’ योजनेची घोषणा २०१९ मध्ये करण्यात आली होती. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या योजनेचे काम २०२३ पर्यंत होते. पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले या योजनेंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक व्यक्तीला दररोज ५५ लिटर गुणवत्तापूर्ण पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची तरतूद होती. ग्रामीण भागातील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहोचविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश होता. जिल्ह्यात काही ठिकाणी ही योजना पूर्ण झाली असून, काही ठिकाणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, अनेक गावांमध्ये कामे अद्याप अर्धवट अवस्थेत असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे.

तत्कालीन अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे योजना पूर्ण झाल्याचा अहवाल शासनाला सादर करण्यात आल्याचा आरोपही ठेकेदारांनी केला आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात सुमारे ५०० कामे करण्यात आली आहेत. यापैकी अनेक कामे करणाऱ्या ठेकेदारांना अद्याप त्यांच्या कामाचे देयक मिळालेले नाही. गत १७ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद ग्रामीण जलपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारांची बैठक घेतल्याचे सांगण्यात येते. संबंधित ठेकेदारांना व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे बैठकीसाठी बोलावण्यात आले होते. ठेकेदारांच्या म्हणण्यानुसार, प्रत्येक कामाचे देयक अदा करण्यासाठी प्रति काम सुमारे ३० हजार रुपयांची मागणी केली जात आहे. यामुळे बंद करण्यात आलेल्या योजनेतील ठेकेदारांची देयके अदा करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांची रक्कम जमा करण्याची अपेक्षा असल्याचा आरोप त्यांनी केला.

शासनाकडून या योजनेसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याची तयारी असल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. मात्र, ग्रामीण जलपुरवठा विभागाकडून निधी वितरण करता येणार नसल्याचे सांगण्यात आल्याने ठेकेदारांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. योजना पूर्ण झाल्याचा अहवाल सादर करून ती बंद करण्यात आली असून, त्यामुळे शासनाची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही ठेकेदारांनी केला आहे.

हर घर नल योजनेंतर्गत शासनाकडून प्राप्त आता निधी संबंधित ठेकेदारांच्या कामाची तपासणी केल्यानंतर वितरित करण्यात येईल, पाठविण्यात आला आहे, तो जुन्या योजनेचा आहे. शासनाला योजना बंद झाल्याचा जो अहवाल आता याच्याशी संबंधित योजना क्रमांक २ सुरू झाली आहे. तसेच १७ ऑगस्ट रोजी बंद करण्यात आलेल्या योजनेतील ठेकेदारांच्या थकीत रकमेबाबत चर्चा करण्यासाठी व्हॉट्सअॅप संदेशाद्वारे ठेकेदारांना बैठकीसाठी बोलावण्यात आल्याचेही त्यांनी नाकारले, अशी महती स्नेहा धावडे, प्रभारी कार्यकारी अभियंता यांनी दिली आहे.

अमरावती घटनेने आरोग्य यंत्रणा अलर्ट! रुग्णालयातील उपारणांची तपासणी; अग्नीशमन यंत्र हाताळण्याचे प्रशिक्षण

अनेक ठेकेदारांनी ही कामे पूर्ण करण्यासाठी बँकांकडून कर्ज घेतले आहे. मात्र, कामांची देयके वेळेत न मिळाल्याने कर्जाचे हप्ते आणि व्याज भरणेही कठीण झाले असून, ठेकेदार आर्थिक संकटात सापडल्याचे त्यांनी सांगितले. लातूर येथे या योजनेचे देयक रखडल्याने एका ठेकेदाराने आत्महत्या केल्याचा संदर्भ देत, अशा घटना टाळण्यासाठी शासनाने तातडीने थकीत देयके अदा करावीत, अशी मागणी ठेकेदारांनी केली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Contractors left in financial trouble water supply scheme shut despite crores in funding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Amaravati
  • Water supply
  • Water Supply Issue

संबंधित बातम्या

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित
1

जिल्हा परिषदेच्या २८३ शाळा क्रीडांगणाविना! क्रीडा विकासाला ब्रेक; अंजनगाव सुर्जीत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा प्रस्ताव प्रलंबित

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल
2

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा
3

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध
4

Amravati News: चालकअभावी रुग्णाला पाठविले खासगी वाहनाने! ‘डफरीन’ प्रशासनाचा अजब कारभार; दोन रुग्णवाहिका आहे उपलब्ध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.