Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: ‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Satara Politics: म्हसवड नगरपरिषदेच्या प्रशासकीय राजवटीत झालेली विकासकामे निकृष्ट दर्जाची असून, शहरासाठी मंजूर वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 31, 2026 | 12:10 PM
‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

‘पालिका प्रशासनावर बोलल्यावर सत्ताधाऱ्यांना मिरच्या का झोंबतात?’ किशोर सोनवणेंचा सवाल

Follow Us
Follow Us:
  • ‘प्रशासनाला पाठीशी का घालता?’
  • किशोर सोनवणेंचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
  • मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
म्हसवड : म्हसवड नगरपरिषदेमध्ये प्रशासकीय राजवटीत झालेल्या विकासकामे ही अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली असुन शहरासाठी मंजुर झालेल्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामात तर फार मोठा भ्रष्टाचार झाला आहे, याची चौकशी होवुन मुख्याधिकार्यांवर गुन्हा दाखल करावा यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालिकेसमोर १० व २० ऑगष्ट रोजी उपोषण केले होते, त्या उपोषणाची आग सत्ताधार्यांच्या बुडाला लागल्यानेच त्यांनी माझ्यावर आरोप करुन प्रशासनाला पाठीशी घालत आहेत, मात्र चुकीच्या कामाबाबत प्रशासनाला जाब विचारल्यावर सत्ताधार्यांना मिरच्या का झोबंल्यात असा उलट प्रश्न राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष किशोर सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित करीत सत्ताधारी व पालिका प्रशासनावर कडाडुन हल्ला करीत पलटवार केला. (Satara Politics)

Ganeshotsav 2026: श्री मिरवणूक मार्गावर २० स्पीड ब्रेकरचे विघ्न; ‘विटंबना झाल्यास जागेवरच प्रतिष्ठापना’ करण्याचा इशारा

पालिकेत प्रशासकीय काळात मंजुर झालेल्या पाणी पुरवठा योजनेच्या कामात प्रचंड गोंधळ झालेला असुन या योजनेसाठी आमचे नेते स्व. अजितदादा यांनी विशेष निधी उपलब्ध करुन दिलेला आहे, आता या योजनेसाठी पुढील ३० वर्ष पुन्हा निधी मिळणार नसल्याने ही योजना सक्षम व्हावी ही सामान्य म्हसवडकर जनतेची अपेक्षा होती मात्र योजनेचे काम अत्यंत ढिसाळ झाले असल्याने त्याविरोधात आम्ही आंदोलन केले तर सत्ताधारी गट हा आमच्यावर खंडणीचे आरोप करीत आहे, वास्तविक याच सत्ताधारी गटाने दीड वर्षापुर्वी सदर योजनेचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असे म्हणत या कामाची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकार्यांकडे निवेदन दिले होते, आता हेच सत्ताधारी मुख्याधिकार्यांवर आम्ही आरोप केल्यावर त्यांची सुपारी घेतल्याप्रमाणे बाजु मांडत आहेत. आता हे काम चांगले झाल्याचा त्यांना कसा साक्षात्कार झाला हे न उलघटणारे कोड आहे.

वास्तविक आम्ही म्हसवडकरांच्या प्रश्नावर बोलणार तो आमचा हक्क व अधिकार आहे असे सांगत किशोर सोनवणे यांनी हाती कागदी पुरावे घेत शहरातील रस्ते, गटार, शौछालय आदींची सध्या काय अवस्था आहे हे दाखवत प्रशासनावर कडाडुन हल्ला केला. ते पुढे बोलताना म्हणाले की माणगंगा नदीतुन सुरु असलेल्या वाळु उपसा कोणाकडुन सुरु आहे याची चौकशी मुख्याधिकारी करतील काय, अतिक्रमणाला अभय कोणाचे आहे असे प्रश्न उपस्थित करीत आमचे नेते प्रभाकर देशमुख यांच्यावर जे बालबुध्दीने बोलतायेत त्यांनी हे लक्षात ठेवावे की आमचे नेते प्रभाकर देशमुख यांना एकदा नव्हे तर दोनवेळा देशाच्या पंतप्रधानांनी गौरवलेले आहे.

पुढे बोलताना सोनवणे म्हणाले की म्हसवडकरांच्या समस्येसाठी यापुढे ही आम्ही आवाज उठवणार तर वेळप्रसंगी आंदोलने ही करणार तर खा. धैर्यशिल मोहिते पाटील यांच्या मार्फत केंद्रीय जल आयोगामार्फत या योजनेच्या कामाची चौकशी लावणार असल्याचे सांगितले. यावेळी युवा नेते तेजसिंह राजेमाने, अरविंद पिसे, परेश व्होरा, कांता ढाले आदी उपस्थित होते.

Mumbai News: मुंबईकरांच्या कटिंगला साखरेचा कडू घोट; तलफ कशी भागणार? वाढत्या महागाई खिशावर भार

Web Title: Kishor sonawane hits back at ruling party over mhaswad municipal administration alleged corruption

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 12:10 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Satara
  • Water supply

संबंधित बातम्या

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान
1

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान

Maharashtra Breaking News Today 2026: महिला आशिया कप २०२६: भारताचा विजयाने श्रीगणेशा
2

Maharashtra Breaking News Today 2026: महिला आशिया कप २०२६: भारताचा विजयाने श्रीगणेशा

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध
3

‘जात पडताळणी समिती रद्द केली तर…’; छगन भुजबळ यांचा जरांगेंच्या मागणीला विरोध

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण
4

Ashok Chavan News: नांदेड भाजपच्या कोअर कमिटीपासून अशोक चव्हाणांना दूर का ठेवले? समर्थकांमध्ये नाराजी अन् चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.