Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाइपलाइन गॅस व CNG वितरणासाठी केंद्र सरकारचा नवा आदेश: विना अडथळा खोदकाम करता येणार

गॅस पाइपलाइन टाकणे, देखभाल, विस्तार आणि संबंधित सुविधा उभारणीसाठी एक सुसंगत नियमावली लागू करण्यात आली आहे. अशी माहिती ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशन कोअर कमिटी सदस्य अली दारूवाला यांनी दिली.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 26, 2026 | 06:16 PM
थेट गॅस टँकरमधूनच गॅसचोरी; व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस

थेट गॅस टँकरमधूनच गॅसचोरी; व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरला जात होता गॅस

Follow Us
Follow Us:

LPG Crisis : पुणे : मध्यपूर्व भागामध्ये सुरु असलेल्या युद्धजन्यपरिस्थितीचा भारतावर परिणाम झाला आहे. देशामध्ये तेल आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला. व्यावसायिक गॅसचा तुटवडा (LPG Gas) निर्माण झाला आहे. याचा विपरित परिणाम हॉटेल, खानावळी आणि मेसवर झाला आहे. या गॅस तुटवड्यातून बाहेर येण्यासाठी केंद्र सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. यामध्ये तेल खरेदी देखील मोठ्या प्रमाणात केली जात आहे. दरम्यान, पुण्यातील इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशन कोअर कमिटीने देखील यावर निर्णय घेतला आहे. (Pune News)

केंद्र सरकारने देशभरात नैसर्गिक गॅस व पेट्रोलियम उत्पादनांच्या वितरणाला गती देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेत नवीन आदेश जारी केला आहे. 24 मार्च 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या आदेशानुसार गॅस पाइपलाइन टाकणे, देखभाल, विस्तार आणि संबंधित सुविधा उभारणीसाठी एक सुसंगत नियमावली लागू करण्यात आली आहे. अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशन कोअर कमिटी सदस्य अली दारूवाला यांनी दिली.

हे देखील वाचा : भाजपचे चाणक्य उतरणार मैदानात; ममता बॅनर्जींविरोधात दाखल करणार खळबळजनक चार्जशीट

अली दारूवाला यांनी सांगितले की, “केंद्र सरकारच्या या आदेशामुळे घरगुती ग्राहकांना पाइपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) पुरवठा वाढवण्यावर भर देण्यात आला असून, एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्याचा सरकारचा उद्देश आहे. ज्या भागांमध्ये नैसर्गिक गॅस पाइपलाइन उपलब्ध आहे, तेथे एलपीजी ऐवजी पीएनजी वापरास प्रोत्साहन दिले जाणार आहे.

सरकारने स्पष्ट केले आहे की, पाइपलाइन टाकताना विविध परवानग्या, जास्त शुल्क, जमीन उपलब्धतेतील अडचणी आणि रहिवासी संघटनांकडून होणारा विरोध यामुळे प्रकल्पांमध्ये विलंब होत होता. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी नवीन नियमांमध्ये परवानगी प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

या आदेशानुसार सार्वजनिक तसेच खासगी क्षेत्रातील संस्थांना ठराविक कालमर्यादेत पाइपलाइनसाठी परवानगी देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच, परवानगी वेळेत न दिल्यास ती ‘स्वतःच मंजूर’ झालेली मानली जाईल, अशी तरतूद करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : झिरवळांना अडकवण्यासाठी कुणी सापळा रचला; वडेट्टीवारांचा विधानसभेत लेटरबॉम्ब

महत्त्वाचे म्हणजे, निवासी भागांमध्ये पाइपलाइन टाकण्यास कोणीही अडथळा निर्माण करू शकणार नाही. जर नागरिकांनी पीएनजी कनेक्शन घेण्यास नकार दिला, तर ठराविक कालावधीनंतर त्या ठिकाणी एलपीजी पुरवठा बंद करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने इंधनाचे विविधीकरण आवश्यक असल्याचे केंद्र सरकारने नमूद केले आहे. जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या अडचणी, विशेषतः खाडी प्रदेशातील परिस्थिती लक्षात घेता, देशांतर्गत गॅस वितरण मजबूत करण्यावर भर दिला जात आहे.

या निर्णयामुळे देशातील सिटी गॅस वितरण प्रकल्पांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा असून, शहरी व ग्रामीण भागात स्वच्छ इंधनाचा वापर वाढण्यास मदत होणार असल्याचे ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशन कोअर कमिटी सदस्य अली दारूवाला यांनी स्पष्ट केले.

Web Title: Core committee of the india petrol dealers association ali daruwalla reacts on lpg gas shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • LPG Gas
  • LPG Gas Crisis
  • pune news

संबंधित बातम्या

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांचे नोंदवले जबाब
1

Ketan Agrawal Murder Case : सिया गोयलच्या भावाचीही पोलिसांकडून चौकशी; आत्तापर्यंत 8 जणांचे नोंदवले जबाब

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?
2

अभिमन्यू पवार अन् मेधा कुलकर्णी यांच्यात खुर्चीवरून वाद, खासदार कार्यक्रमातून निघून गेल्या; नेमकं काय घडलं?

पालखी सोहळ्यासाठी शासनाची जोरदार तयारी; मागील वर्षीपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळणार
3

पालखी सोहळ्यासाठी शासनाची जोरदार तयारी; मागील वर्षीपेक्षा जास्त चांगल्या सुविधा मिळणार

Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात…
4

Pune Water Issue : पुणेकरांवर येणार मोठं जलसंकट; धरणाच्या पाणी पातळीत घट, पाणीकपात…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.