फोटो सौजन्य: Gemini
याबाबत बँकेचे अधिकारी प्रवीण अजू कोळी (रा. माहेश्वरी हॉलजवळ, विश्रामबाग, सांगली) यांनी फिर्याद दिली आहे. राहुल विलास वास्कर (रा. सांगली) असे गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन कॅशियर-कम-एजंटाचे नाव आहे. हा प्रकार दि. ६ ते ८ नोव्हेंबर २०१९ दरम्यान घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून बँकेच्या अंतर्गत तपासणीत हा अपहार उघडकीस आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी त्या काळात कवठेएकंद येथील शाखेत कॅशियर व एजंट म्हणून कार्यरत होता. शासनाच्या वतीने २०१२-२०१३ या कालावधीत एका शेतकरी खातेदाराच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम जमा झाली होती. मात्र आरोपीने आपल्या पदाचा गैरवापर करत संबंधित खात्याच्या नावात फेरफार करून त्या खात्याला संदीप यशवंत गुरव असे नाव दिले. त्यानंतर त्या खात्यातील २ लाख ५८ हजार २१७ रुपये ही रक्कम संदीप गुरव यांच्या सेव्हिंग खात्यावर ट्रान्स्फर करण्यात आली.
त्यानंतर बँकेची बनावट स्लिप तयार करून त्यावर संदीप गुरव यांच्या नावाने बनावट सही करण्यात आली. या बनावट कागदपत्रांच्या आधारे संबंधित रक्कम रोख स्वरूपात काढून घेत आरोपीने तिचा अपहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, बँकेच्या तपासणीत ही गंभीर आर्थिक अनियमितता समोर आल्यानंतर प्रकरण पोलिसांत दाखल करण्यात आले. या घटनेमुळे बँकेच्या व्यवहारांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






