Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

करोडोंचा चुराडा, तरीही प्रतीक्षानगर पाण्यात! पावसाने उघडीप दिली तरी सांडपाण्याचा पूर; मनसेचा पालिकेला आंदोलनाचा इशारा

नालेसफाईच्या नावाखाली फक्त कागदी घोडे नाचवल्यामुळे नाले गाळाने तुडुंब भरले आहेत. रस्त्यांवर साचलेल्या घाण पाण्यामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डास, झुरळे आणि उंदरांचा सुळसुळाट वाढल्याने साथीच्या रोगांची भीती वाढली आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2026 | 09:05 AM
करोडोंचा चुराडा, तरीही प्रतीक्षानगर पाण्यात! पावसाने उघडीप दिली तरी सांडपाण्याचा पूर; मनसेचा पालिकेला आंदोलनाचा इशारा

करोडोंचा चुराडा, तरीही प्रतीक्षानगर पाण्यात! पावसाने उघडीप दिली तरी सांडपाण्याचा पूर; मनसेचा पालिकेला आंदोलनाचा इशारा

Follow Us
Follow Us:

पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असतानाही सायन येथील प्रतीक्षानगर परिसराला मात्र सांडपाण्याच्या कृत्रिम पुराचा सामना करावा लागतो आहे. मुंबई महापालिकेने करोडो रुपये खर्चुन केलेल्या कामांचे पितळ पहिल्याच पावसात उघडे पडले असून, नाल्यातील घाण पाणी रस्त्यांवर तुंबल्याने स्थानिक नागरिक, रुग्ण आणि शाळकरी मुलांचे प्रचंड हाल होत आहेत. या ढिसाळ कारभाराविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला असून पालिकेला थेट तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.(फोटो सौजन्य – AI)

Dadar Dindi Sohala 2026: दादरमध्ये सद्गुरू दादा महाराज मोरे माऊलींच्या उपस्थितीत दिंडी सोहळा संपन्न; वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह!

प्रभाग क्र. १७३ मधील प्रतीक्षानगर भागात गेल्या सहा महिन्यांपासून रस्ता बंद ठेवून पालिकेने करोडो रुपये खर्च करत नवी ड्रेनेज लाईन टाकली होती. पारिजात सोसायटी, कर्मवीर भाऊराव शाळा, मनोहर बाजार ते बहुमजली इमारत क्र. १९ व २०, तसेच नंदनवन सोसायटी (टी-५ ते टी-१९) या पट्टयात परिस्थिती अत्यंत विदारक बनली आहे. नालेसफाईच्या नावाखाली फक्त कागदी घोडे नाचवल्यामुळे नाले गाळाने तुडुंब भरले आहेत. रस्त्यांवर साचलेल्या घाण पाण्यामुळे संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डास, झुरळे आणि उंदरांचा सुळसुळाट वाढल्याने साथीच्या रोगांची भीती वाढली आहे.

मनसे सायन कोळीवाडा विधानसभा प्रभाग क्र. १७३ चे शाखाध्यक्ष लवू नर यांनी पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत या गंभीर स्थितीवर संताप व्यक्त केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही पालिका ढिम्म असल्याचा आरोप करत मनसेने प्रशासनासमोर प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. साचलेल्या घाण पाण्याचा तत्काळ निचरा करण्यासाठी परिसरात तत्काळ अतिरिक्त हाय-कॅपॅसिटी पंप बसवावेत. नव्याने टाकण्यात आलेल्या ड्रेनेज लाईन व नाल्यांमधील गाळाची तातडीने पाहणी करून सफाई करावी. विद्यार्थी व स्थानिकांचे हाल थांबवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करावे. प्रशासनाने तात्काळ हालचाल करून हा प्रश्न मार्गी लावला नाही, तर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या पालिकेविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा मनसेने दिला आहे.

मुंबईची ग्लोबल झेप! ‘वर्क फ्रॉम एनिव्हेअर’मध्ये लंडन-मियामीला टाकलं मागे

कंत्राटदार-अधिकाऱ्यांचे लागेबांधे?

सोबतच सावित्रीबाई फुले नगर ते प्रतीक्षानगर बस डेपो दरम्यान सांडपाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र सर्व्हिस लाईनही उभारली.एवढा प्रचंड खर्च आणि वेळ वाया घालवूनही प्रत्यक्षात मात्र पाणी वाहून जाण्याऐवजी नाल्यातील गाळ आणि सांडपाणी थेट रस्त्यांवर आणि सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर तुंबले आहे.त्यामुळे पालिकेच्या या कामातील गुणवत्ता, कंत्राटदारांचे लागेबांधे आणि अधिकाऱ्यांचे नियोजन यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Crores squandered yet pratiksha nagar remains waterlogged sewage floods the area despite a break in the rain

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Mumbai News
  • Mumbai Water
  • Water supply

संबंधित बातम्या

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ
1

मुंबईत रक्ताचा तुटवडा? केईएम रुग्णालयात रक्त आणि पीआरबीसीसाठी नातेवाइकांची धावपळ

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?
2

दिवाळीत ‘लालपरी’ थांबणार? एसटी कर्मचाऱ्यांचा ६ नोव्हेंबरपासून राज्यव्यापी संपाचा इशारा, परिवहन मंत्री काय म्हणाले?

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा
3

Mumbai News: प्रकाशातील अदृश्य बदल आता टिपणार ग्राफीन! आयआयटी मुंबईच्या संशोधनातून अचूक मापनाची नवी दिशा

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
4

गोणीत बांधून समुद्रात फेकलेला मृतदेह कोणाचा? तपासात धक्कादायक खुलासा; सहा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.