Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Today 2026:पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली पतीची याचिका

Maharashtra Breaking News: आज सकाळपर्यंत उपलब्ध ताज्या अपडेट्सच्या आधारे महाराष्ट्र, देश आणि विदेशातील राजकारण, अर्थव्यवस्था, शेअर बाजार आणि क्रीडा क्षेत्रातील प्रमुख घडामोडी:

  • By anuradha sagar
Updated On: Aug 26, 2026 | 09:20 AM
LIVE
Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Maharashtra Breaking News LIVE Updates Today:

Follow Us
Follow Us:
  • 26 Aug 2026 09:20 AM (IST)

    26 Aug 2026 09:20 AM (IST)

    MLA Report Card 2026: प्रजा फाउंडेशनने मुंबईतील एकूण ३६ आमदारांचे प्रगतीपुस्तक

    MLA Report Card 2026: प्रजा फाउंडेशनचा मुंबईच्या आमदारांचा वार्षिक अहवाल (MLA Report Card 2026) जाहीर झाला असून, विधानसभेतील मुंबईच्या आमदारांच्या कामगिरीवर यामध्ये मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. अधिवेशनात आमदारांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या संख्येत आणि गुणवत्तेत लक्षणीय घट झाल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे.

    प्रश्नांच्या संख्येत ७२ टक्क्यांची मोठी घट

    अहवालानुसार आमदारांच्या प्रश्न विचारण्याच्या सक्रियतेत कमालीची घट झाली आहे:

    • हिवाळी अधिवेशन २०२४ ते पावसाळी अधिवेशन २०२५: मुंबईच्या आमदारांनी एकूण २,२१३ प्रश्न विचारले.

    • २००९ ते २०१० चा काळ: या काळात आमदारांनी ७,९५५ प्रश्न विचारले होते.

    • घट: पूर्वीच्या तुलनेत प्रश्नांच्या संख्येत तब्बल ७२ टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे.

    सत्ताधारी आमदार निष्क्रिय; विरोधी पक्ष अव्वल

    प्रजा फाउंडेशनच्या अहवालानुसार, मुंबईचे नागरी प्रश्न विधानसभेत मांडण्यात सत्ताधारी पक्षाचे आमदार अत्यंत निष्क्रिय ठरले आहेत.

    • विरोधी पक्षाचे वर्चस्व: सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या टॉप ३ आमदारांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत, तर चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार आहेत.

    • सत्ताधाऱ्यांना स्थान नाही: टॉप ५ कामगिरी करणाऱ्या आमदारांमध्ये सत्ताधारी पक्षाचा एकही आमदार समाविष्ट नाही.

  • 26 Aug 2026 09:15 AM (IST)

    26 Aug 2026 09:15 AM (IST)

    Maratha Reservation: मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनापूर्वी कुणबी वंशावळ समितीला वर्षभराची मुदतवाढ

    Manoj Jarange Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील २९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटीत पुन्हा आंदोलन सुरू करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या कुणबी वंशावळ जुळवणी समितीला १ जुलै २०२६ ते ३० जून २०२७ पर्यंत, म्हणजेच एका वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. अपूर्ण वंशावळ जुळवणी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश सरकारने दिले असून, यामुळे मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग अधिक सुकर होण्यास मदत होणार आहे.

  • 26 Aug 2026 09:11 AM (IST)

    26 Aug 2026 09:11 AM (IST)

    Rohit Pawar Rahul Gandhi रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? 

    Rohit Pawar Rahul Gandhi : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. रोहित पवारांनी दिल्लीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर आणि सातत्याने त्यांच्या समर्थनात भूमिका घेतल्याने अजित पवार गटातील नेत्यांनीही त्यांच्यावर काँग्रेस प्रवेशाचा आरोप केला होता.

    या राजकीय चर्चांवर स्वतः रोहित पवार यांनी स्पष्टीकरण देत काँग्रेस प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावले आहे. राज्यात सध्या अधिकृत विरोधी पक्षनेता उपलब्ध नसल्यामुळेच देशाच्या विरोधी पक्षनेत्यावर अवलंबून राहावे लागत असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधी यांच्या भेटीमागील राजकीय भूमिका स्पष्ट केली

  • 26 Aug 2026 09:01 AM (IST)

    26 Aug 2026 09:01 AM (IST)

    Karnataka High Court Judgment: पत्नी ही पतीची मालमत्ता नाही; कर्नाटक उच्च न्यायालय

    Karnataka High Court Judgment: पत्नी ही घरकामासाठी किंवा सासू-सासऱ्यांची सेवा करण्यासाठी ठेवलेली कर्मचारी किंवा पतीची खासगी मालमत्ता नाही. लग्न म्हणजे पत्नीची वैयक्तिक ओळख, स्वातंत्र्य किंवा तिच्या आवडीनिवडींवर नियंत्रण मिळवण्याचे लायसन्स नाही, अशा कडक शब्दांत कर्नाटक हायकोर्टाने एका पतीची याचिका फेटाळून लावली.

    न्यायालयाने स्पष्ट केले की, घरातील कामे करणे किंवा सासू-सासऱ्यांची सेवा करणे हे पत्नीचे ऐच्छिक काम आहे. आपल्या वृद्ध आई-वडिलांची काळजी घेण्याची प्राथमिक जबाबदारी ही त्यांच्या स्वतःच्या मुलांची आहे, सुनांची नाही. पत्नीवर तिच्या मनाविरुद्ध ताबा मिळवणे किंवा माहेरी जाण्यासाठी परवानगी सक्तीची करणे हे मानवी सन्मान आणि सामाजिक न्याय या संवैधानिक मूल्यांच्या विरोधात आहे, असे निरीक्षण यावेळी कोटाने नोंदविले.

Maharashtra to National And International Breaking News: 

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि मराठवाड्याच्या काही भागांत पाऊस पुन्हा जोर धरणार असून हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून पक्षांतराचे सत्र सुरू आहे. दुसरीकडे, मुंबईत कॅब आणि रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या नियमाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

देशात साखरेच्या वाढत्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण धोरणात्मक निर्णय घेतला आहे. अमेरिकेच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावामुळे भारतीय माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

 

 

Web Title: 26 august 2026 maharashtra to national international breaking sports crime economic news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 08:59 AM

Topics:  

  • India news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

Mumbai News: काँक्रिटच्या रस्त्यावर सरावाचे थर; मॅटची गरज वाढली! मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून झाले हद्दपार
1

Mumbai News: काँक्रिटच्या रस्त्यावर सरावाचे थर; मॅटची गरज वाढली! मातीचे मैदानच शहर आणि उपनगरातून झाले हद्दपार

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द
2

Government Decision : मुख्यमंत्र्यांचा मंत्र्यांनाच दणका; ‘त्या’ 314 नियुक्त्याच केल्या रद्द

Indian Post: खांद्यावर जबाबदारीचं ओझं अन चेहऱ्यावर गोड हास्य; टपाल सेवेत ५८.५ टक्के महिलांनी कोरलं आपलं नाव
3

Indian Post: खांद्यावर जबाबदारीचं ओझं अन चेहऱ्यावर गोड हास्य; टपाल सेवेत ५८.५ टक्के महिलांनी कोरलं आपलं नाव

दुचाकीवर तिघे बसल्यास दंड, मात्र पीएमपी बसमधील जीवघेण्या गर्दीकडे दुर्लक्ष; कारवाई कधी होणार?
4

दुचाकीवर तिघे बसल्यास दंड, मात्र पीएमपी बसमधील जीवघेण्या गर्दीकडे दुर्लक्ष; कारवाई कधी होणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.