संग्रहित फोटो
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus) स्थानकात लोकलला छोटासा अपघात झाला आहे. पनवेल लोकल (Panvel Local Accident) फ्लॅटफॉर्मवरुन निघाल्यानंतर पुढे जाण्याऐवजी मागे गेल्याने अपघात झाला. यामुळे पनवेल लोकलचा एक डब्बा रुळावरून (Car Slip From Track) घसरल्याची माहिती मिळत आहे.
सीएसएमटी (CSMT) स्थानकात केवळ २ प्लॅटफॉर्म हे हार्बर मार्गासाठी (Harbour Line) आहेत. त्यातल्या एका प्लॅटफॉर्मवर अपघात झाल्याने एकच प्लॅटफॉर्म वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर लोकल गाड्यांच्या खोळंबा (Local Stop) होऊन वाहतूक विस्कळीत झाली आहे.
Important for Harbor line commuters!@drmmumbaicr pic.twitter.com/z4B5sg1gML
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) July 26, 2022
रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजून ३९ मिनिटांनी सीएसएमटीवरुन पनवेलला जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर होती. तिला ग्रीन सिग्नल दिल्यानंतर लोकल पुढे जाण्याऐवजी मागे आली आणि बफरला धडकली. यामध्ये कोणलाही दुखापत झालेली नाही. यामध्ये लोकलचा मागून चौथा कोच रुळावरुन घसरला आहे. सर्व प्रकारच्या यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांनी कोच पुन्हा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.