Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Passed Away : दुर्घटनास्थळी माळरानावर सर्वत्र कागदपत्रांचा खच; ‘कामाचा माणूस’ गेल्याची लोकभावना

Ajit Pawar Passed Away : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात एका माळरानावर झाला. या माळरानावर कागदपत्रांचा खच पडल्याचे दिसून येत आहे. विमान जळून खाक झाल्यानंतर देखील कागदपत्रे नीट राहिली आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 28, 2026 | 05:13 PM
dcm Ajit Pawar plane crash Documents scattered all over ground baramati news update

dcm Ajit Pawar plane crash Documents scattered all over ground baramati news update

Follow Us
Follow Us:

Ajit Pawar Passed Away : बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे अपघाती निधन झाले आहे. बारामतीमध्ये सभेसाठी येत असताना अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांसह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच राजकीय वर्तुळातून श्रद्धांजली वाहिली जात आहे. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात एका माळरानावर झाला. या माळरानावर कागदपत्रांचा खच पडल्याचे दिसून येत आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईवरुन बारामतीला येत होते. अजित पवार यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देखील सहभाग घेतला होता. यानंतर सभांसाठी ते बारामतीमध्ये येणार होते. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांच्या या सभा व बैठका होणार होत्या. यामुळे आपली सर्व कामे उरकून अजित पवार हे सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी मुंबईतून निघाले. बारामतीत लँडिंगवेळी, 8 वाजून 46 मिनिटांनी त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या अपघातामुळे अवघा महाराष्ट्र सुन्न झाला आहे. विमानाचा अपघात इतका भीषण होता की, त्यामध्ये अजित पवारांसह सर्वांचा मृत्यू झाला आहे.

हे देखील वाचा : “माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला! उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला शोक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात हा बारामती विमानतळाच्या दोन ते तीन किलोमीटर आधी झाला आहे. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. एका माळरानावर विमान कोसळले असून आजूबाजूला ऊस शेती आणि माळरान आहे. या अपघातावेळी भीषण स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. यामध्ये विमान पूर्णपणे जळून खाक झाले. या विमानाचा जळून कोळसा झाला. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे विमानातील कागदपत्रं सहिसलामत राहिली आहेत. माळरानावर सर्वत्र कागदपत्रे आणि फाईलचा खच पडलेला दिसून आला.

हे देखील वाचा : महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचं मोठं नुकसान…; राज ठाकरेंनी व्यक्त केल्या भावूक आठवणी

सोशल मीडियावर अपघाताच्या झालेल्या ठिकाणचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. अजित पवार हे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत समाजपयोगी कामे करत असल्याचे दिसून आले आहे. दुर्घटनास्थळी मोठ्या प्रमाणात कागदपत्रे पडली आहेत. यामुळे समाजाच्या कामाचा माणूस गेला अशी लोकभावना समोर येत आहे. अजित पवार यांच्याकडे समाजाच्या तळागळातील माणसे कामासाठी येत असतं. आणि सर्वांची कामे मोठ्या तप्तरतेने करणे हे अजित पवारांचे वैशिष्ट होते. त्यामुळे लोकनेता हरपल्याची भावना जनमाणसातून येत आहे.

Web Title: Dcm ajit pawar plane crash documents scattered all over ground baramati news update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 05:13 PM

Topics:  

  • ajit pawar
  • ajit pawar plane crash
  • baramati news

संबंधित बातम्या

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत
1

Hingoli Politics: हिंगोलीत राष्ट्रवादीला धक्का; नगरसेविका रुबीना वाजीद अपात्र घोषीत

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी  सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना  पालिकेकडे हस्तांतरित
2

Baramati News: बारामतीच्या पाणीपुरवठ्यासाठी सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये! ‘या’ दोन मोठ्या योजना पालिकेकडे हस्तांतरित

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक
3

Baramati News : बारामती नगर परिषदेचा निर्णय; 3.5 एकर जागेत उभारणार अजितदादा पवार स्मारक

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!
4

कोण आहेत सुप्रिया सुळे यांचे जावई Sarang Lakhani ? कोट्यवधींच्या बिझनेस ग्रुपचे वारस; इतकी आहे नेटवर्थ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.