Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबा, काजू नुकसानग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती घोषित करा; राजू शेट्टींची मागणी

भारतीय शेतीला हवामान बदलाच्या संकटातून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने एका 'राष्ट्रीय हवामान लवचिकता धोरणा'ची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 11, 2026 | 02:47 PM
आंबा, काजू नुकसानग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती घोषित करा; राजू शेट्टींची मागणी

आंबा, काजू नुकसानग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती घोषित करा; राजू शेट्टींची मागणी

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : राज्यांमधील आंबा आणि काजू बागांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने या संकटाला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिल्ली येथे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य कृष्ण वत्स यांच्याकडे केली.

आंबा आणि काजू लागवड हा महाराष्ट्र आणि कोकणच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा आहे. हवामानातील बदलांमुळे हजारो शेतकरी कुटुंबांचे भविष्य आता अंधारात आहे. भारतीय शेतीला हवामान बदलाच्या संकटातून वाचवण्यासाठी केंद्र सरकारने एका ‘राष्ट्रीय हवामान लवचिकता धोरणा’ची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. बागायतदारांचे झालेले हे नुकसान केवळ स्थानिक नसून हवामान बदलाशी संबंधित आहे. त्यामुळे या नुकसानीला राष्ट्रीय आपत्ती मानून (राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी) अंतर्गत तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे.

हेदेखील वाचा : World War 3 : ड्रॅगनच्या दारात भारताचे ‘यमदूत’ ! BrahMos आणि Akashच्या जोडीने फिलीपिन्स अभेद्य; चीनच्या नौदलाला पळता भुई थोडी

राज्यामध्ये जवळपास ४.५० ते ५.०० लाख टन आंबा उत्पादन होते. यापैकी २ ते २.२५ लाख टन आंबा रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्पादित होतो. यंदाच्या वर्षी जवळपास ९० टक्के आंब्याचे उत्पादन घटले असून, याबाबतचा अहवाल फलोत्पादन विभागाने सरकारला सादर केला आहे. दरवर्षी आंबा निर्यातीमधून ६०० कोटी तर आंबा पल्प निर्यातीमधून ६७० कोटी असे जवळपास १२७० कोटी रुपयांचे परकीय चलन मिळते. यामुळे यंदाच्या वर्षी आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना अनुक्रमे हेक्टरी ५ व ३ लाख रुपयांची मदत करण्याची गरज आहे.

यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे सदस्य कृष्ण वत्स यांनी याबाबत तातडीने संबंधित विभागाला सूचना देऊन तत्काळ केंद्रीय पथक घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पाठवून त्यांचा पाहणी अहवाल मागवून घेण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

हवामानातील अनिश्चितता आता दरवर्षीची बाब

हवामानातील अनिश्चितता आता दरवर्षीची बाब बनत चालली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन विभाग व शासनाने पारंपारिक मदती पलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञान, अचूक हवामान अंदाज प्रणाली आणि सक्षम विमा कवच पुरवावे, जेणेकरून शेतकरी या संकटातून कायमस्वरूपी बाहेर पडू शकेल यासाठीच्या उपाययोजना करण्याची मागणी शेट्टी यांनी केली.

Web Title: Declare mango and cashew crop losses as natural disaster raju shetti demands

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Natural Disaster
  • Raju Shetti

संबंधित बातम्या

थकीत ऊसबिल अन् रिकव्हरी चोरीवरुन राजू शेट्टी आक्रमक; साखर आयुक्तांकडे केल्या ‘या’ मोठ्या मागण्या
1

थकीत ऊसबिल अन् रिकव्हरी चोरीवरुन राजू शेट्टी आक्रमक; साखर आयुक्तांकडे केल्या ‘या’ मोठ्या मागण्या

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती
2

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची रक्कम आज किंवा उद्या खात्यात जमा होणार; बाबासाहेब पाटील यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.