दिल्लीमध्ये झालेल्या दहशतवादी बॉम्बस्फोट हल्यानंतर संपूर्ण देश हादरुन गेला. लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात झालेल्या कार बॉम्बब्लास्टमध्ये मृतांचा आकडा अधिकाधिक वाढतच जात आहे. या हल्यामुळे आता देशातील किनारपट्टी भागात देखील सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाराष्ट्र-गोवा पत्रादेवी सीमेवर सुद्धा हाय अलर्ट देण्यात आला आहे. पत्रादेवी सीमेवर महाराष्ट्र येणाऱ्या आणि गोव्यात जाणाऱ्या वाहनांची पोलीस प्रशासनाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
रत्नागिरीतील प्रसिद्ध बंदर मिरकरवाडा येथील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. मिरकरवाडा बंदर हे व्यापारी केंद्र आहे. देशविदेशातून व्यापारी जहाजं येथे येत असताता. त्यामुळे हा परिसर तसा पाहायला गेला तर संवेदनशील ठिकाणात येतो. याचकारणाने बाहेरून येणाऱ्या बोटींची डॉग स्क्वॉड आणि बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीने कसून चौकशी केली जात आहे. बॉम्ब स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सागरी सुरक्षा अधिक वाढवण्यात आली आहे. ‘रत्नागिरी शहरात काल जसा अलर्ट आला त्यावेळपासूनच शहरातील तसेच कोस्टल चे लँडिंग पॉइंट संवेदनशील लँडिंग पॉइंट आहेत. याठिकाणी सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आलेली आहे.’ यानुसार, घातपात विरोधी तपासणी आणि खलाशांची नोंदणी यांसारख्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत, स्थानिक पोलीस प्रशासनाकड़ून सांगण्यात आलं आहे.
दिल्लीतील हल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशातील किनारपट्टी भागात देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना देखील याचा चांगलाच फटका बसणार आहे. कोकणात किंवा देशाच्या इतर किनारपट्टी भागात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांचा यामुळे हिरमोड होणार आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर पर्यटकांनी याकाळात खबरदारी घेणं गरजेचं आहे. नोव्हेंबर ते पुढील वर्षातील जानेवारी हा काळ कोकणाातील पर्यटन व्यवयाला चालना देणारा असतो मात्र आता झालेल्या या बॉम्बस्फोटाचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. मुंबई गोवा सागरी वाहतूक करणाऱ्या खलाशांची देखील कसून चौकशी केली जात आहे. फक्त सागरी मार्गच नाही तर महामार्गांवरील वाहनांची देखील तपासणी सुरु असून नाकाबंदी करण्यात येत आहे.
फक्त किनारपट्टी भागच नाही तर तीर्थक्षेत्र आणि इतर महत्वाच्या ठिकाणांची सुद्धा सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर येथे देखील पोलीस प्रशासनाकडून भाविकांच्या वाहनांची आणि भाविकांची कसून तपासणी करण्यात येत आहे. शनिशिंगणापूर येथे राज्यातूनच नाही तर देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. त्याचबरोबर शिर्डीच्या साई मंदिरातील सुरक्षा देखील वाढवण्यात आलेली आहे.
दिल्ली स्फोट प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. आंबेडकर म्हणाले की, या स्फोटामागे बाह्यशक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? याचा सखोल तपास झाला पाहिजे.. सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजे, अशी मागणी आंबेडकरांनी केलीय… दरम्यान, देशात ठीक-ठिकाणी झालेल्या स्पोटचा उल्लेख करत आंबेडकरांनी संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंये. बिहार निवडणुकीतील मतदानाच्यावेळी स्फोट झाल्याने वेळेगसंदर्भात संशय व्यक्त होत असल्यावरही त्यांनी चिंता प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.
Ans: दिल्लीतील हल्यानंतर आता महाराष्ट्रासह देशातील किनारपट्टी भागात देखील हाय अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना देखील याचा चांगलाच फटका बसणार आहे. कोकणात किंवा देशाच्या इतर किनारपट्टी भागात फिरायला जाणाऱ्या पर्यटकांचा यामुळे हिरमोड होणार आहे. मात्र सुरक्षेच्या दृष्टीकोनातून पाहायचं झालं तर पर्यटकांनी याकाळात खबरदारी घेणं गरजेचं आहे. नोव्हेंबर ते पुढील वर्षातील जानेवारी हा काळ कोकणाातील पर्यटन व्यवयाला चालना देणारा असतो मात्र आता झालेल्या या बॉम्बस्फोटाचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. मुंबई गोवा सागरी वाहतूक करणाऱ्या खलाशांची देखील कसून चौकशी केली जात आहे.
Ans: या बॉम्बस्फोटाचे तीव्र पडसाद देशभर उमटत आहेत. मुंबई गोवा सागरी वाहतूक करणाऱ्या खलाशांची देखील कसून चौकशी केली जात आहे. फक्त सागरी मार्गच नाही तर महामार्गांवरील वाहनांची देखील तपासणी सुरु असून नाकाबंदी करण्यात येत आहे.
Ans: दिल्ली स्फोट प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आंबेडकरांनी थेट सरकारच्या सुरक्षा यंत्रणेवर ताशेरे ओढले आहेत. आंबेडकर म्हणाले की, या स्फोटामागे बाह्यशक्ती किंवा अंतर्गत शक्तीचा हात आहे का? याचा सखोल तपास झाला पाहिजे.. सर्व गोष्टी पूर्णपणे उघड झाल्या पाहिजे, अशी मागणी आंबेडकरांनी केलीय... दरम्यान, देशात ठीक-ठिकाणी झालेल्या स्पोटचा उल्लेख करत आंबेडकरांनी संघाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंये. बिहार निवडणुकीतील मतदानाच्यावेळी स्फोट झाल्याने वेळेगसंदर्भात संशय व्यक्त होत असल्यावरही त्यांनी चिंता प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केली आहे.






