Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट अन् आगार व्यवस्थापक निलंबित! नेमकं कारण काय?

Pratap Sarnaik News: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. या भेटी दरम्यान सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिकांनी केलेल्या तक्रारीवरून पाहणी करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 28, 2025 | 06:12 PM
सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट अन् आगार व्यवस्थापक निलंबित! नेमकं कारण काय?

सोलापूर बसस्थानकाला परिवहन मंत्र्यांची अचानक भेट अन् आगार व्यवस्थापक निलंबित! नेमकं कारण काय?

Follow Us
Close
Follow Us:

  • सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट
  • सोलापूर आगाराचे ‘आगार व्यवस्थापक ‘ यांना निलंबित
  • अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले

Pratap Sarnaik News in Marathi : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट दिली. तसेच आज (२८ नोव्हेंबर) प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली. या भेटी दरम्यान शौचालय, पाणपोई सारख्या सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या प्रकरणी सोलापूर आगाराचे ‘आगार व्यवस्थापक ‘ यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

आज दुपारी मध्यवर्ती बसस्थानकावरील शौचालयाची पाहणी केली असता, तेथील अस्वच्छता आणि दुर्गंधीयुक्त परिसर पाहून संबंधित अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरले. शौचालयाचे व्यवस्थापन बघणाऱ्या खाजगी संस्थेकडून शौचालयाची डागडुजी करण्यात आली नव्हती, अनेक ठिकाणी फरशा उखडल्या होत्या. तसेच स्वच्छता देखील ठेवण्यात आली नव्हती. तसेच जवळच असलेल्या पाणपोई परिसरात देखील अत्यंत अस्वच्छता असल्याचे त्यांना आढळून आले. पाणपोईच्या ५ नळा पैकी केवळ एकच नळ सुरू होता. या बाबतीत उपस्थित आगार व्यवस्थापक व वाहतूक नियंत्रक यांना समाधान कारक उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे संबंधित आगार व्यवस्थापक यांच्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्री महोदयांनी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना तात्काळ दिले.

पाटणमध्ये घंटागाड्या अडवल्या; शहरातील भटके कुत्रे आणि कचऱ्याचा प्रश्न झालाय गंभीर

विशेष म्हणजे मागील आठवड्यात उपरोक्त त्रुटी दूर करून प्रवाशांना चांगल्या सुविधा निर्माण करून देण्याचे निर्देश आपल्या आकस्मिक पाहणी दौऱ्यात मंत्री  प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले होते. याबाबत पुढील दौऱ्याच्या वेळी पुनश्च: तपासणी करण्यात येणार असून त्यानंतर देखील प्रवासी सुविधा मध्ये हलगर्जीपणा आढळून आल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या वर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा सज्जड दम देखील भरला होता. परंतु सोलापूर बस स्थानकावरील या गैरसोयीबद्दल कोणताही बदल स्थानिक प्रशासनाकडून करण्यात न आल्यामुळे अत्यंत नाईलाजाने संबंधित आगार व्यवस्थापकांना निलंबित करण्याचे निर्देश मंत्र्यांना द्यावे लागले आहेत. तथापि, राज्यातील एसटीच्या २५१ आगार प्रमुखांनी या घटनेकडे अत्यंत गंभीरपणे पहावे आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांच्या बाबतीमध्ये विशेषत: बसस्थानकावरील महिला प्रसाधनगृहाच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची हलगर्जी यापुढे खपवून घेतली जाणार नाही.असे स्पष्ट निर्देश यावेळी मंत्री सरनाईक यांनी दिली आहेत.

Dr. Babasaheb Ambedkar: भीमसैनिकांची प्रतीक्षा लवकरच संपणार! डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारकाचे काम प्रगती पथावर

Web Title: Depot manager suspended over unhygienic toilets at solapur bus station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2025 | 06:12 PM

Topics:  

  • msrtc
  • pratap sarnaik
  • st bus

संबंधित बातम्या

ST Bus: शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू, प्रताप सरनाईक यांची माहिती
1

ST Bus: शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू, प्रताप सरनाईक यांची माहिती

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा
2

Pune News: पीएमपीʼला आळंदी बसआगारासाठी एसटी महामंडळाकडून ४ एकर जागा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
3

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बससेवा होणार अधिक जबाबदार, मिळणार तात्काळ मदत
4

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! आता बससेवा होणार अधिक जबाबदार, मिळणार तात्काळ मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.