Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भंगार चोरी प्रकरणात अधिकाऱ्याची उपायुक्तांनी केली चौकशी, पंधरा दिवसात अहवाल; कारवाईची टांगती तलवार कायम

महापालिकेच्या गोडाऊनमधील जप्त भंगार साहित्याच्या कथित अपहारप्रकरणी अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांची सोमवारी चौकशी समितीच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सखोल चौकशी केली.

  • By विवेक
Updated On: Jun 01, 2026 | 09:12 PM
Solapur Municipal Corporation Deputy Commissioner, scrap theft case in Solapur Municipal Corporation, Solapur Municipal Corporation,

Solapur Municipal Corporation Deputy Commissioner, scrap theft case in Solapur Municipal Corporation, Solapur Municipal Corporation,

Follow Us
Follow Us:

सोलापूर, शहर प्रतिनिधी : महापालिकेच्या गोडाऊनमधील जप्त भंगार साहित्याच्या कथित अपहारप्रकरणी अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांची सोमवारी चौकशी समितीच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सखोल चौकशी केली. या प्रकरणाचा अहवाल १५ दिवसांत महापालिका आयुक्तांना सादर केला जाणार असून, त्यानंतर संबंधितांवर प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेले भंगार साहित्य कोणतीही अधिकृत परवानगी न घेता गोडाऊनमधून बाहेर काढून विक्रीसाठी नेले जात असल्याचा आरोप आहे. या प्रकाराचा पर्दाफाश शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे यांनी केला होता. त्यांनी संबंधितांना रंगेहात पकडल्याने या प्रकरणाने मोठे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

या घटनेनंतर सदर बाजार पोलिस ठाण्यात अतिक्रमण विभागाचे प्रमुख जगन्नाथ बनसोडे, दीपक कुंभार, वाहनचालक तसेच इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्तांनी स्वतंत्र चौकशी समितीची नियुक्ती केली होती.

मेट्रो ९ मार्गावर ७ नवीन पादचारी पूल उभारणार; मीरा-भाईंदरकरांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाचा लाभ

सोमवारी झालेल्या चौकशीत बनसोडे यांच्यासह दीपक कुंभार यांचीही सविस्तर विचारपूस करण्यात आली. चौकशीदरम्यान जप्त साहित्याची नोंद, गोडाऊनमधून साहित्य बाहेर काढण्याची प्रक्रिया, परवानग्या आणि संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विशेष म्हणजे, महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतरही बनसोडे यांना सहा महिन्यांसाठी अतिक्रमण विभागाचा पदभार देण्यात आला होता. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत यापूर्वीही विविध तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले जाते. अखेर भंगार साहित्य कथितरीत्या बाहेर नेत असताना उघडकीस आलेल्या प्रकारामुळे त्यांच्यावरील संशय अधिक गडद झाला आहे.

आता चौकशी समितीचा अहवाल आयुक्तांकडे सादर झाल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर, पदमुक्ती अथवा अन्य कठोर प्रशासकीय कारवाई होणार का, याकडे महापालिका वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

२८ जूनला राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिम, सोलापुरात १.०६ लाख बालकांना पोलिओचे दोन थेंब

Web Title: Deputy commissioner questions officer in scrap theft case in solapur municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 09:12 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur Municipal Corporation
  • Solapur News

संबंधित बातम्या

सोलापूरच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाला हिरवा कंदील; ३ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार
1

सोलापूरच्या बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाला हिरवा कंदील; ३ ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण होणार

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर
2

वाखरीत भक्तीचा महासागर, माऊलींच्या गोल रिंगणात लाखो वारकरी तल्लीन; ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमला परिसर

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका
3

जंतरमंतर प्रकरणी टेंभुर्णीत भव्य निषेध मोर्चा; वंचित बहुजन आघाडी व वडार परिवर्तन सेनेची केंद्र सरकारवर टीका

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम!
4

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.