Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश

CM Devendra Fadnavis on Central Funds: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय योजनांसाठी उपलब्ध निधीचा प्रभावी आणि वेळेत विनियोग करण्याचे निर्देश विभागप्रमुखांना दिले आहेत. यावर्षी केंद्रीय निधीच्या विनियोगाचे प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा जास्त ठेवण्याची खबरदारी घेण्याचे आदेशही त्यांनी दिले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 21, 2026 | 08:32 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • केंद्रीय योजनांच्या निधीचा पूर्ण वापर करा
  • मुख्यमंत्री फडणवीसांचे विभागप्रमुखांना स्पष्ट आदेश
  • केंद्रीय निधीच्या विनियोगास प्राधान्य

मुंबई : राज्यात केंद्रीय योजनांच्या अमंलबजावणीसाठी उपलब्ध होणाऱ्या निधीचा प्रभावी आणि वेळेत विनियोग करण्यास सर्व विभागांनी प्राधान्य द्यावे. केंद्रीय निधीच्या परिपूर्ण विनियोगास प्राधान्य देत यावर्षी विनियोगाचे प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा जास्त राहील याची खबरदारी विभागप्रमुखांनी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित केंद्रीय योजनांच्या निधीच्या उपलब्धतेसह त्याच्या विनियोगाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, निवासी आयुक्त (गुंतवणूक) महाराष्ट्र सदन सुशील गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अपर मुख्य सचिव,प्रधान सचिव,सचिव उपस्थित होते.

महाराष्ट्रात ‘महा सीएसआर प्राधिकरण’ स्थापन होणार? CSR निधीच्या प्रभावी वापरासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

केंद्रीय निधीच्या विनियोगास प्राधान्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राकडे राज्याच्या विविध योजनांसाठी उपलब्ध असलेल्या निधीला केंद्रीय योजनांच्या निधीची जोड देऊन त्याचा अधिक प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने विभागांनी नियोजन करावे. केंद्रीय निधीचा पूर्ण क्षमतेने वापर करत विकासकामांना अधिक गती देता येईल. पुढील वर्षी सुमारे 16 ते 17 हजार कोटी रुपयांचा केंद्रीय निधी खर्च करण्याची क्षमता असून, त्यातील मोठा हिस्सा भांडवली खर्चाचा आहे. त्यामुळे हा केंद्रीय निधी खर्च करण्यास विभागप्रमुखांनी प्राधान्य द्यावे. विहित मुदतीत योजनांच्या व्यापक अमंलबजावणीसाठी हा निधी विनियोगात आणल्या जाईल यासाठी विभागांनी त्याची जबाबदारी निश्चितपणे स्वीकारावी, असे मुख्यमंत्री यांनी सूचित केले.

तसेच केंद्रीय क्षेत्रातील योजनांचा किती निधी कोणत्या विभागाकडे उपलब्ध आहे, त्यापैकी किती निधी खर्च झाला आहे आणि किती निधी शिल्लक आहे, याचा विभागनिहाय आढावा घेऊन निधीचा वेळेत विनियोग करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. लेखा प्रक्रियेतील अडचणींमुळे निधीचा विनियोग रखडत असल्यास त्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

विभागांनी ‘सेंस ऑफ अर्जन्सी’ने काम करण्याची गरज

केंद्र शासनाने एखाद्या योजनेसाठी नवीन लेखा प्रणाली किंवा तांत्रिक बदल निश्चित केल्यास त्याची अंमलबजावणी तातडीने करावी. कामांसाठी ‘कट ऑफ डेट’ची वाट न पाहता विभागांनी ‘सेंस ऑफ अर्जन्सी’ने काम करण्याची गरज आहे. निश्चित कालमर्यादेत कार्यवाही न झाल्यास संबंधित निधीबाबत कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

गेल्या दोन तीन वर्षात खर्च करण्यात आलेल्या निधीचे अवलोकन करुन सर्व विभागांनी गांभीर्याने विचार करून आपल्या विभागातील त्रुटी दूर कराव्यात. तसेच निधी विभागांकडून खर्च झालेला असून तो लेखांकनात प्रतिबिंबित होत नसल्यास त्याची कारणे स्पष्ट करावीत आणि निधी खर्च झालेला नसेल तर तो वेळेत कसा खर्च करता येईल, याचे नियोजन करावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्य सचिवांनी तिमाही आढावा घ्यावा

केंद्रीय निधीच्या विनियोगाचा नियमित आढावा घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर प्रभावी यंत्रणा उभारावी. दर तीन महिन्यांनी निधीच्या वापराचा आढावा घेऊन त्यासंबंधीचे निर्देशक निश्चित करावेत, अशी सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.केंद्रीय योजनांच्या निधीचा अधिकाधिक आणि परिणामकारक वापर करून विकासकामांना गती देणे हा या आढाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांनी केंद्रीय निधीच्या विनियोगाची विभागनिहाय सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. तसेच राज्यात गेल्या तीन चार वर्षात केंद्रीय निधीच्या वापरात विविध विभागांनी केलेल्या कामगिरीबाबत वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास चंद्र रस्तोगी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली. या दोन्ही सादरीकरणाचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला.

कृषी, ग्रामीण विकास आणि महिला-बाल विकास विभागांचीही उल्लेखनीय कामगिरी

केंद्र पुरस्कृत योजनांच्या (सीएसएस) 2025-26 या आर्थिक वर्षातील निधी विनियोगात महाराष्ट्रातील विविध विभागांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विभागनिहाय कामगिरीचा आढावा घेतला असता शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 96 टक्के निधीचा विनियोग करून आघाडी घेतली आहे. या विभागाची अर्थसंकल्पाच्या तुलनेत निधी उपयोगिता 99.9 टक्के इतकी आहे. तसेच सहकार व पणन, वस्त्रौउद्योग विभाग 99 टक्के, गृह विभाग 99 टक्के, मृद व जलसंधारण 98 टक्के तर कृषी व संलग्न विभागाने 94 टक्के, तर ग्रामविकास विभागाने 86 टक्के निधीचा विनियोग केला आहे. ग्रामीण विकास विभागासाठी 10,283 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद असून 9,874 कोटी रुपये वितरित झाले आणि त्यापैकी 8,537 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

महिला व बाल विकास विभागाचीही प्रभावी कामगिरी झाली असून वितरित निधीच्या तुलनेत 83 टक्के निधीचा विनियोग झाला आहे. नियोजन विभागाने 111 टक्के निधी उपयोगिता नोंदवली असून, मनरेगा योजनेत वितरित निधीच्या तुलनेत 100 टक्के निधीचा विनियोग करण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने 75 टक्के निधीचा विनियोग केला असून अर्थसंकल्पाच्या तुलनेत त्याची उपयोगिता 101 टक्के आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशनमध्ये 111 टक्के निधी उपयोगिता नोंदविण्यात आली आहे. मोठ्या निधीच्या योजनांमध्येही काही विभागांची कामगिरी विशेष ठरली आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी वितरित निधीच्या तुलनेत 82 टक्के, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात 71 टक्के, तर मनरेगामध्ये 100 टक्के निधीचा विनियोग झाला आहे.

Zepto Illegal Vehicles: ‘४८ तासांत कारवाई करा, अन्यथा आंदोलन’; झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवरून युवासेनेचा इशारा

Web Title: Devendra fadnavis central funds utilization maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Central Governement
  • CM Devedra Fadnavis
  • Government Fund

संबंधित बातम्या

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
1

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस
2

MPSC Student Protest : मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली आंदोलनाची दखल; आयोगाच्या अध्यक्ष-सदस्यांवर कारवाईसाठी मोठी शिफारस

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप
3

काँग्रेस कार्यालयात घुसून आदिवासी विद्यार्थ्यांची धरपकड, ‘पोलिसांनी गुन्हेगारांसारखी वागणूक दिली’; NSUIचा गंभीर आरोप

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा
4

अटक केलेल्या विद्यार्थ्यांना तत्काळ सोडा, अन्यथा वर्षा बंगल्याला…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.