देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार? (फोटो- ट्विटर/सोशल मिडिया)
Devendra Fadnavis: राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी अपडेट समोर आली आहे. गुरूवारी (28 नोव्हेंबर) दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या बैठकीनंतर आज महाराष्ट्रात महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक होणार होती. अमित शाहांनी दिलेल्या सुचना आणि आदेशानुसार महाराष्ट्रात सत्तास्थापनेसंंबंधी पुढील निर्णय घेतले जाणार होते. पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, महायुतीची ही बैठक पुढील दोन दिवसांसाठी पुढे ढकल्ण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे.
काल दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. जर असे काही ठरले असेल आणि त्याप्रमाणे फडणवीस यांच्या नावाची घोषणा झाल्यास ते राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. तसेच ‘मी पुन्हा येईन..’ ही प्रतिज्ञा खरी ठरणार आहे. २०१९ च्या निवडणुकीआधी देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा येईन अशी घोषणा दिली होती.
देवेंद्र फडणवीस ठरले सर्वात तरुण मुख्यमंत्री
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस हे प्रदेशाध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वात भाजपने मोठे यश प्राप्त केले. दिग्गज नेत्यांना डावलून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावर बसवले. त्यांनी पूर्ण ५ वर्षे मुख्यमंत्री म्हणून कार्य केले. २०१९ मध्ये देखील शिवसेना भाजप युतीला बहुमत मिळाले. मात्र त्यानंतर शिवसेना कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस सोबत गेल्याने फडणवीस यांना मुख्यमंत्री होता आले नाही.
२०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या साथीने भाजपने राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन केले. मात्र या सरकारमध्ये फडणवीस हे असणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र पक्षाच्या आदेशानुसार त्यांनी या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. आता पुन्हा एकदा महायुतीचे सरकार राज्यात आले आहे. मुख्यमंत्रीपदाचे नाव जाहीर झालेले नाही. मात्र भाजपचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट असून, देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते आहे.
हेही वाचा: Maharashtra Chief Minister: कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? RSS कडून ‘या’ नावाला पसंती; भाजप मोठ्या निर्णयाच्या तयारीत
मी पुन्हा येईन ही प्रतिज्ञा खरी ठरणार
२०१९ मध्ये आणि २०२२ मध्ये देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. यंदाच्या निवडणुकीत भाजप राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपचा होणार हे आता स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री कोण होणार यासाठी काल दिल्ली महत्वाची बैठक पार पाडली. या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते आहे. जर असे झाले आणि फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले तर ‘मी पुन्हा येईन ही प्रतिज्ञा खरी ठरणार आहे. तसेच देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत. तसेच ते राज्याचे ३१ वे मुख्यमंत्री असतील. त्यामुळे आता फक्त त्यांच्या नावाची औपचारिक घोषणा होण्याची बाकी असल्याचे म्हटले जात आहे.