Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: राज्यातील सर्व मंत्र्यांचे वाहनताफे अर्ध्यावर येणार? फडणवीसांनी बोलावली तातडीची बैठक

Maharashtra Politics: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला. या निर्णयामागे भारताच्या परकीय चलन साठ्यावर वाढत असलेला दबाव हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे,

  • By anuradha sagar
Updated On: May 13, 2026 | 02:08 PM
Ministerial Convoy Reduction

Ministerial Convoy Reduction

Follow Us
Follow Us:
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १२ मंत्र्यांचा नियोजित जपान दौरा रद्द
  • राज्यातील सर्व मंत्र्यांचे अधिकृत ताफे (कॉन्व्हॉय) निम्म्यावर आणण्याबाबत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाणार आहे.
  • प्रवीण दरेकर यांनी स्वतः इलेक्ट्रिक कार वापरण्याचा निर्णय
  • मंत्र्यांच्या सुरक्षेला बाधा न आणता वाहन संख्या मर्यादित ठेवण्यावर सरकारचा भर
 

Maharashtra Politics: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन-तीन दिवसांपूर्वी जनतेला इंधनाची बचत करण्याचे, विमान प्रवास टाळण्याचे, सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर वाढण्याचे, वर्षभर सोने खरेदी न करण्याचे आवाहन केले. त्यानंतर संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करण्याचे देशाला आव्हान केल्यानंतर, पंतप्रधान मोदी यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारी खर्चामध्ये कपात करण्याच्या उद्देशाने, त्यांनी आपल्या अधिकृत ताफ्याचा (कॉन्व्हॉयचा) आकार निम्म्यावर आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटू लागल्याचे दिसत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्यातील १२ मंत्र्यांचा जपान दौरा रद्द केला. या निर्णयामागे भारताच्या परकीय चलन साठ्यावर वाढत असलेला दबाव हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे, अशातच आज मुख्यमंत्री फडणवीसांनी आज मंत्र्यांची बैठक बोलवली आहे. राज्यातील सर्व मंत्र्यांचे ताफे अर्ध्यावर ( Ministerial Convoy Reduction )करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

Third Mumbai: तिसऱ्या मुंबईमुळे पर्यावरणाला मोठा धोका, MMRDA विरोधात थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

आज सकाळी मंत्रिमंडळाची एक बैठक झाल्यानंतर दुपारीदेखील एक बैठक होणार आहे. या बैठकीला पोलिस महासंचालक, मुख्य सचिव हेदेखील उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे. दोन्ही बैठकीनंतर एकत्रित निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. मंत्र्यांच्या सुरक्षेशी तडजोड न करता ताफ्यातील वाहनसंख्येवर मर्यादा आणली जाऊ शकते. आजच्या दुपारच्या बैठकीनंतर एकत्रितपणे यावर निर्णय घेतला जाणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचा दौरा रद्द केल्यानंतर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रीया देताना सांगितले की, पंतप्रधानांनी देशहितासाठी चांगला निर्णय घेत जनतेला प्रतिसाद देण्याचे आवाहन केलं आहे. प्रामुख्यांने ती आमचीही नैतिक जबाबदारी ठरते. मीसुद्धी इलेक्ट्रीक कारमधून प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अध्यक्षांनी सांगितल्यानंतर जपानचा दौराही रद्द केला आहे.

पंतप्रधान मोदींच्या इंधन बचतीच्या आवाहनानंतर राज्यातील मंत्र्यांकडून प्रत्यक्ष कृती सुरू झाल्याचे दिसून येत आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू करत इंधन बचतीचा संदेश दिला आहे. पंतप्रधानांनी देशवासियांना इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार उदय सामंत यांनी प्रत्यक्ष कृतीतून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

Sunil Tatkare Sharad Pawar Meeting:   शरद पवारांच्या भेटीचे कारण काय; तटकरेंनी स्पष्टच सांगितलं!

तर मंत्री अतूल सावे यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी त्यांनी मंत्रालयात पायी जात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला. इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक ऊर्जा, दुग्धविकास आणि दिव्यांग सक्षमीकरण मंत्री असलेल्या अतुल सावे यांच्यासोबत त्यांच्या विभागातील वरिष्ठ अधिकारीही पायी मंत्रालयात दाखल झाले.

दुसरीकडे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंनी देखील इलेक्ट्रिक बोटींच्या वापराचे आवाहन केले आहे. “माझ्याकडे बंदर खाते असल्याने मी मच्छीमार बांधवांना आणि नागरिकांना डिझेल बोटींपेक्षा इलेक्ट्रिक बोटींचा वापर करण्याचे आवाहन करणार आहे. यासाठी लागणारी मदत आणि कर्ज मिळवून देण्यासाठी सरकार तयार आहे,” असे नितेश राणे यांनी सांगितले. तसेच, “माझ्या ताफ्यातील गाड्यांची संख्या ७ ते ८ वरून आता ३ वर आणली आहे. तसेच माझी डिझेलवरील प्रशासकीय गाडी बदलून आता इलेक्ट्रिक गाडी घेणार आहे. आपण सर्वांनी सकारात्मक बदल स्वीकारले, तर देश लवकरच महासत्ता बनेल आणि मोदी सरकारचा हेतूही साध्य होईल,” असेही नितेश राणेंनी स्पष्ट केले.

 

Web Title: Devendra fadnavis convened an urgent meeting to reduce the convoys of cabinet ministers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Maharashtra Cabinet
  • narendra modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण
1

Rahul Gandhi: ‘…RSS ला पाठिंबा देईन, मी त्यांचे रक्षण करेन’, राहुल गांधींच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश
2

Sukhbir Singh Badal : नांदेडमध्ये सुखबीर सिंह बादल यांच्यावर हल्ला; आरोपीला अटक, फडणवीसांकडून चौकशीचे आदेश

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ
3

kalyan News: अवघ्या एका तासात 7/12 वर दुसऱ्या व्यक्तीचे नाव; कल्याण तहसीलदार कार्यालयातील प्रकाराने खळबळ

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
4

‘कुणबी प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही, बावनकुळेंना टार्गेट करणं योग्य नाही,’ मनोज जरांगेंच्या आरोपांवर फडणवीसांचं प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.