Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis : “समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद…”, देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

प्रशासनात आलेल्या तुकडीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करत नागरिक केंद्रित व जबाबदार प्रशासन व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 12, 2025 | 05:55 PM
"समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद...", देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

"समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद...", देवेंद्र फडणवीसांचे आवाहन

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय प्रशासकीय सेवेचा उपयोग करावा
  • राज्याच्या विकासगाथेला पुढे नेण्याची जबाबदारी
  • राज्यामध्ये ग्रामीण आणि नागरी विकास केंद्रित प्रशासन गरजेचे

मुंबई : समाजातील शेवटच्या घटकाचे कल्याण हे ध्येय ठेवत त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याची ताकद प्रशासनात आहे. त्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेचा उपयोग करावा. राज्याच्या विकासगाथेला पुढे नेण्याची जबाबदारी सार्थपणे सांभाळण्याची अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. प्रशासनात आलेल्या तुकडीने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा उपयोग करत नागरिक केंद्रित आणि जबाबदार प्रशासन व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.

२०२४ च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील आठ परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी वर्षा निवासस्थानी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्‍यांनी सांगितले की, महाराष्ट्र हे सर्वात जास्त नागरीकरण झालेले राज्य आहे. राज्यामध्ये ग्रामीण आणि नागरी विकास केंद्रित प्रशासन गरजेचे आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे नागरी प्रशासनात मोठ्या प्रमाणावर काम करण्याची संधी आहे. संतुलित आणि सर्वांगीण औद्योगिक विकासासाठी शासन १०० सुधारणा करीत आहे. या सुधारणांसाठी ‘ वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. महसूल सुधारणांसाठी सल्लागार नेमण्यापेक्षा प्रशासनातील दांडगा अनुभव असलेल्या अधिकाऱ्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा खूप चांगला परिणाम दिसून येत आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Chhatrapti Sambhajinagar: पैठण गोदावरीतून अवैध वाळूचा सर्रास उपसा; लाखोंचा महसूल बुडाला तरी पोलीस-महसूल विभाग ‘शांत’

शासनाने औद्योगिक प्रयोजनासाठी राज्यामध्ये अकृषक परवाना काढण्याची मोठी सुधारणा नुकतीच केली आहे. वेळखाऊ आणि क्लिष्ट प्रक्रिया दूर करीत राज्यात गतिमान प्रशासन देण्यावर शासनाचा भर आहे. महसूल विभाग अंतर्गत बरीच प्रक्रिया, सेवा ब्लॉक चेन पद्धतीवर आणण्यात येत आहे. त्यामुळे बऱ्याच प्रक्रिया जलद व अचूक होत आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संपूर्ण प्रशासकीय धोरणे, प्रक्रिया यांचे ‘ व्हिजिट’ करून ‘ रिइंजिनिअरिंग’ करण्यासाठी शासनाने १५० दिवसांचा कार्यक्रम आखला आहे. या माध्यमातून बऱ्याच सुधारणा करण्यात येत आहेत. राज्यात सार्वत्रिक औद्योगिक विकास होण्यासाठी गुंतवणूक वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. मुंबई, पुणे प्रमाणेच छत्रपती संभाजी नगर, नागपूर, नाशिक यासह राज्यात अन्य भागात नवीन औद्योगिक पट्टे निर्माण करण्यात येत आहे. विदर्भामध्ये नागपूर – अमरावती औद्योगिक विकासाचा पट्टा तयार होत आहे. अमरावतीमध्ये पीएम मित्रा पार्क तसेच वस्त्रोद्योग पार्कमुळे औद्योगिक विकासाची परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. त्याचा परिणाम म्हणून अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीत आज एकही भूखंड शिल्लक राहिलेला नाही. अमरावती विमानतळ नागरी वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. या ठिकाणी एअर इंडियाच्यावतीने आशिया खंडातील सर्वात मोठे ‘पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ उभारण्यात येत आहे.

दुर्गम, नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोलीची ओळख आता ‘स्टील सिटी‘ म्हणून होत आहे. या जिल्ह्यात तीन लाख कोटींचे सामंजस्य करार उद्योगांसाठी करण्यात आले आहेत. समृद्धी महामार्गाने राज्याची राजधानी व उपराजधानी जोडली आहे. त्यामुळे गतीने दळणवळण यंत्रणा निर्माण झाली आहे. मराठवाड्याच्या विकासासाठी शक्तीपीठ महामार्ग महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. टोयोटा किर्लोस्कर कंपनी छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रकल्प स्थापन करीत आहे. त्यामुळे या भागात विकासाची परिसंस्था अधिक बळकट होणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी परिविक्षाधीन अधिकाऱ्यांचा परिचय करून घेतला. त्यांचा आतापर्यंतचा प्रवास, मागील अनुभव, महाराष्ट्रात काम करत असताना जाणवलेल्या चांगल्या बाबी, सुधारणा करणे गरजेचे असलेल्या बाबी याविषयीही विस्तृत संवाद साधला.

Anjali Damania : हे म्हणजे आम्ही चोरीचा माल परत करतो..; अंजली दमानिया आणणार पार्थ अजित पवारांच्या नाकी नऊ?

Web Title: Devendra fadnavis on the power to bring about positive change in society lies in administration and appeal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 05:55 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra
  • Mumbai

संबंधित बातम्या

Lawyer Protection Act: वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार, हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक
1

Lawyer Protection Act: वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार, हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक

JJ Hospital: जेजे रुग्णालयातील आरोग्यसेवेला खीळ; MRI मशीन बंद पडल्याने प्रतीक्षा थेट ‘तीन महिन्यांवर’
2

JJ Hospital: जेजे रुग्णालयातील आरोग्यसेवेला खीळ; MRI मशीन बंद पडल्याने प्रतीक्षा थेट ‘तीन महिन्यांवर’

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो सावधान…! दोन दिवस पाणीपुरवठा बंद , जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती
3

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो सावधान…! दोन दिवस पाणीपुरवठा बंद , जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ महिलांसाठी बदल…
4

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ महिलांसाठी बदल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.