हृदयद्रावक ! कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत 10 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू; आई गंभीर (संग्रहित फोटो : अपघात)
रिसोड : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील कुंभमेळ्याला जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात झाला. ही घटना शनिवारी (दि. 25) सकाळी सहा वाजताच्या दरम्यान घडली. यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले.
हेदेखील वाचा : ‘रेड लाईट एरिया’ची तपासणी आता होणार तरी कधी? सैफ अलीवरील हल्ल्यानंतर नागरिकांचा सवाल
परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथील चौधरी परिवारातील तीन भाविक (एमएच 14/ जीएस- 9200) कारने कुंभमेळ्यासाठी निघाले होते. मात्र, वाटेत रिसोड सेनगाव मार्गावर शाही धाब्याजवळ कारचा अपघात झाला. कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला नालीवर जाऊन अडकली. मात्र, सुदैवाने यामध्ये कोणालाही इजा झाली नाही. यामध्ये कारचे मोठे नुकसान झाले आहे. रिसोड सेनगाव मार्गावर शाही धाब्याजवळ अपघाताची मालिका सुरूच आहे. एकापाठोपाठ एक या ठिकाणी दुर्घटना होतच आहे.
रिसोड सेनगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. अत्यंत संथगतीने सुरू असलेल्या या रस्त्या कामामुळे दुर्घटना होत आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे. काम सुरू असताना सेनगावकडून रिसोडकडे येणाऱ्या बाजूने रस्ता काम करत असताना वाहतूक सुरू करण्यापूर्वी रस्त्यावरील पडलेली चुरी माती व त्यावर असलेला रिकामा बारदाना हे हटविण्यात आलेला नाही.
मार्गावर टाकलेल्या डिव्हायडर जवळ रस्ता अरुंद झालेला आहे. यामुळे डिव्हायडर व रस्ता हा नवीन वाहनधारकांना दिसत नाही. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा सूचनाफलक लावलेला नाही. जेणेकरून वाहन चालकांना याचा अंदाज आला पाहिजे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रस्ता बनतोय धोकादायक
अत्यंत महत्त्वाचा वर्दळीचा असलेला हा रस्ता दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन उपाययोजना कराव्या. जेणेकरून अपघात टाळता येईल, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
हेदेखील वाचा : Walmik Karad News: वाल्मिक कराडच्या संपत्तीतून आणखी धक्कादायक धागेदोरे मिळतील; सुरेश धस यांचा गौप्यस्फोट