• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Dhananjay Mahadik Has Responded To The Kolhapur Municipal Corporation Elections

जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार; महाडिकांनी स्पष्टच सांगितलं

निवडून येण्याची क्षमता असणार्‍या उमेदवारालाच पक्षाच्या वतीने संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 16, 2025 | 10:59 AM
जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ, कोल्हापूर महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार; महाडिकांनी स्पष्टच सांगितलं

सौजन्य - नवराष्ट्र टीम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ
  • महापालिका निवडणूक महायुती एकत्रच लढणार
  • धनंजय महाडिकांनी स्पष्टच सांगितलं
कोल्हापूर : कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने निवडणूक लढवण्याकरता मोठ्या प्रमाणात इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. गेल्या दोन दिवसात ३५० पेक्षा अधिक इच्छुकांच्या मुलाखती आपण घेतल्या आहेत. निवडून येण्याची क्षमता असणार्‍या उमेदवारालाच पक्षाच्या वतीने संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. उमेदवारी वरून पक्षांमध्ये कोणतीही बंडखोरी होणार नाही किंवा नाराजी राहणार नाही, असा विश्वासही खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे. त्याचबरोबर जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असेही खासदार महाडिक यांनी स्पष्ट केले.

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज मागितलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गेले दोन दिवस खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव यांनी घेतल्या. या मुलाखतीच्या दरम्यान खासदार महाडिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पक्षाकडे उमेदवारी अर्ज मागणार्‍यांची संख्या पाहून आपण भारावून गेलो आहे. त्यातून भाजपबद्दल जनतेमध्ये असणारा विश्वास व्यक्त होत आहे, असे खासदार महाडिक यांनी नमूद केले. निवडून येण्याची क्षमता असणार्‍या उमेदवारालाच संधी दिली जाईल. मात्र त्यातून अन्य उमेदवारांमध्ये कोणत्याही प्रकारची बंडखोरी किंवा नाराजी निर्माण होणार नाही, असा विश्वास आहे. पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी तसेच त्याच्या विजयासाठी सर्वजण झोकून देऊन काम करतील, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

सर्व उमेदवारांच्या मुलाखतींचा अहवाल राज्यस्तरीय कोअर कमिटीकडे पाठवला जाईल. त्यानंतर चार-पाच दिवसात उमेदवारी संबंधित चित्र स्पष्ट होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. काही अपवादात्मक ठिकाणी ताराराणी आघाडीकडून उमेदवार उभे राहण्याची शक्यता आहे. मावळत्या सभागृहातील कॉंग्रेसच्या पूर्वीच्या जागांवर महायुती दावा करणार आहे. कॉंंग्रेसच्या या जागांचे महायुतीमधील घटक पक्षांमध्ये समान वाटप होईल. महायुती मधील जागा वाटपाबद्दल उलट सुलट चर्चा सुरू असल्या तरी जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ राहील, असेही खासदार महाडिक यांनी नमुद केले.

कोल्हापूर महापालिकेत १५ वर्षे कॉंंग्रेस पक्षाची सत्ता होती. मात्र कोल्हापूर शहराचा विकास झाला नाही. उलट महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या माध्यमातून शहराच्या विकासाने गती घेतली. रखडलेले प्रकल्प मार्गी लागले, असेही खासदार महाडिक यांनी सांगितले. कोल्हापूर महापालिका निवडणूकीतील जागा वाटपांबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह प्रमुख नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे. नव्या जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालत, उमेदवारी देताना समतोल साधला जाईल. तसेच निवडणुकीत तरुण युवकांना मोठ्या प्रमाणावर उमेदवारी देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे २५ ते ३० टक्के जागावर युवा पिढीला संधी दिली जाईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. यावेळी महेश जाधव, विजय जाधव उपस्थित होते.

Web Title: Dhananjay mahadik has responded to the kolhapur municipal corporation elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 16, 2025 | 10:58 AM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • Dhananjay Mahadik
  • kolhapur

संबंधित बातम्या

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?
1

वडगाव नगरपंचायतीत राष्ट्रवादीचा वरचष्मा, भाजपने टाकला बहिष्कार; विशेष सभेत नेमकं काय घडलं?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
2

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता, मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया

महापौर पदासाठी हालचालींना वेग; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले
3

महापौर पदासाठी हालचालींना वेग; पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपमधील अंतर्गत राजकारण तापले

Matheran Politics: माथेरानमध्ये भाजपचे संतोष शेलार उपनगराध्यक्षपदी बिनविरोध! स्वीकृत नगरसेवक म्हणून खेडकर आणि सकपाळ यांची वर्णी
4

Matheran Politics: माथेरानमध्ये भाजपचे संतोष शेलार उपनगराध्यक्षपदी बिनविरोध! स्वीकृत नगरसेवक म्हणून खेडकर आणि सकपाळ यांची वर्णी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

जिल्हा परिषद निवडणुकांसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Jan 24, 2026 | 05:15 PM
Mumbai News: शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट अ‍ॅक्शन! मुंबईत ४१ बॅनर्सवर कारवाई, ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

Mumbai News: शहर विद्रूप करणाऱ्यांवर थेट अ‍ॅक्शन! मुंबईत ४१ बॅनर्सवर कारवाई, ३ पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल

Jan 24, 2026 | 05:10 PM
China-Taiwan: आशियात युद्धाचा भडका! चीनने तैवानला 6 युद्धनौकांनी घेरले; 18 विमानांची ‘रेड लाईन’मध्ये घुसखोरी, लष्कर हाय अलर्टवर

China-Taiwan: आशियात युद्धाचा भडका! चीनने तैवानला 6 युद्धनौकांनी घेरले; 18 विमानांची ‘रेड लाईन’मध्ये घुसखोरी, लष्कर हाय अलर्टवर

Jan 24, 2026 | 04:51 PM
खबरदार! अमेरिकेवर येणार भयानक संकट; Air India ने रद्द केली सर्व उड्डाणे, नेमके प्रकरण काय?

खबरदार! अमेरिकेवर येणार भयानक संकट; Air India ने रद्द केली सर्व उड्डाणे, नेमके प्रकरण काय?

Jan 24, 2026 | 04:49 PM
Tech Layoffs: टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांचा नोकऱ्या जाणार, टेक क्षेत्रात भीतीचे सावट

Tech Layoffs: टेन्शन वाढवणारी बातमी! ‘या’ कंपनीतील हजारो कर्मचाऱ्यांचा नोकऱ्या जाणार, टेक क्षेत्रात भीतीचे सावट

Jan 24, 2026 | 04:44 PM
Panvel Municipal Election 2026: पनवेलचे नेतृत्व आता विस्तारणार: विकसित वसाहतींमधील प्रतिनिधींना संधी देण्याची मागणी

Panvel Municipal Election 2026: पनवेलचे नेतृत्व आता विस्तारणार: विकसित वसाहतींमधील प्रतिनिधींना संधी देण्याची मागणी

Jan 24, 2026 | 04:44 PM
IND VS NZ 2nd T20l : ‘मी रोहित शर्माच्या पावलावर पाऊल…’, भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचे मोठे विधान 

IND VS NZ 2nd T20l : ‘मी रोहित शर्माच्या पावलावर पाऊल…’, भारताचा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्माचे मोठे विधान 

Jan 24, 2026 | 04:42 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Mira Bhayandar : मराठी अस्मितेचा मुद्दा पेटला, मनसे-मराठी एकीकरण समिती एकत्र, भाजप-शिवसेनेची पाठराखण

Jan 24, 2026 | 04:00 PM
Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Amravati News : भातकुली तालुक्यातील निम्न पेढी सिंचन प्रकल्पाच्या कामावर गंभीर प्रश्न उपस्थित

Jan 24, 2026 | 03:51 PM
Ahilyanagar Drugs :  ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Ahilyanagar Drugs : ड्रग्ज प्रकरणात अटक झालेल्या पोलिसामागे कोण? डॉ. सुजय विखे पाटील यांचा थेट सवाल

Jan 24, 2026 | 03:42 PM
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र आणि औषध विक्री, 3 डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल

Jan 24, 2026 | 03:38 PM
MUMBAI : छगन भुजबळ निर्दोष; आता ईडीने प्रायश्चित्त घ्यावे -संजय राऊत

MUMBAI : छगन भुजबळ निर्दोष; आता ईडीने प्रायश्चित्त घ्यावे -संजय राऊत

Jan 24, 2026 | 03:05 PM
Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Wardha News : पथदिव्याचा विद्युत पुरवठा खंडीत करून गावे अंधारात ढकलल्याने सरपंच संघटना आक्रमक

Jan 23, 2026 | 07:25 PM
Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Akola News : रुग्णसेवेतून सामाजिक कार्य, मतदारांनी पराग गवईंना घातली नगरसेवकपदाची माळ

Jan 23, 2026 | 07:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.