Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharashiv Politics: भाजप प्रवेशासाठी निघालेल्या ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा यू-टर्न; ठाण्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Dharashiv Politics: बुधवारी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व नगरसेवकांनी अधिकृतपणे शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. कळंब नगर परिषदेतील १० नगरसेवकांपाठोपाठ धाराशिव शहरातील नगरसेवक फोडण्याचा भाजपचा प्लॅन या ऐनवेळच्या पक्षांतरामुळे उधळला गेला.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 27, 2026 | 12:59 PM
Dharashiv Politics, Eknath Shinde, Omraje Nimbalkar, BJP vs Shinde Sena,

Dharashiv Politics, Eknath Shinde, Omraje Nimbalkar, BJP vs Shinde Sena,

Follow Us
Follow Us:
  • धाराशिवमध्ये ठाकरे गटाच्या नगरसेवकांचे नाट्यमय पक्षांतर.
  • भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी निघालेल्या नगरसेवकांचा पुण्यातून यू-टर्न.
  • खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या माध्यमातून नगरसेवक थेट ठाण्यात दाखल.
Dharashiv Politics:  धाराशिवच्या राजकारणातून एक मोठी खळबळजनक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाचे काही नगरसेवक पक्षांतर करणार होते. या नगरसेवकांना आपल्या पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदे गटात मोठी चढाओढ सुरू होती. हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने मुंबईच्या दिशेने निघालेही होते. पण अचानक हे नगरसेवक थेट ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने निघालेले हे नगरसेवक अचानक शिंदेंच्या गोटात दाखल झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार हे नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. पण भाजत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या नेतृत्वात नगरसेवकांचा हा गट मुंबईच्या दिशेने रवानाही झाला. पण पुण्यात पोहोचल्यानंतर मात्र या नगरसेवकांनी अचानक यू-टर्न घेतला. हे सर्व नगरसेवक पुन्हा धाराशिवला पोहोचले आणि ओमराजे निंबाळकर यांच्या मार्फत त्यांना थेट ठाण्यात नेण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा या नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या शिंदे गटात प्रवेश केला. या नगरसेवकांच्या पळवापळवीमुळे धाराशिवच्या राजकारणात या घडामोडीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Pune BJP-NCP Clash: पुणे महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीत ‘लेटर वॉर’चा भडका; सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना

‘ऑपरेशन लोटसला ‘ऑपरेशन टायगर’चा ब्रेक?

धाराशिवच्या कळंब नगर परिषदेतील ठाकरे गटाचे १० नगसेवकांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर धाराशिव शहरातील नगरसेवकांनाही भाजपमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू होती. नगरसेवकांच्या या पळवापळवीला ऑपरेशन लोटस बोलल जात होतं. पण धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजपचे हे प्रयत्न उद्ध्वस्त करत ऑपरेशन टायगरच्या राबवल्याची चर्चा धाराशिवच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असलेल्या नगरसेवकांनी थेट शिंदेंच्या शिवसेनेत शिंदे गटानेच भाजपचा प्लॅनिंगला सुरूंग लावल्याचे बोलले जात आहे.

आणखी नगरसेवक कोणाच्या गोटात जाणार?

धाराशिवच्या स्थानिक राजकारणात उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे आणखी दोन नगरसेवक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्याचबरोबर भाजपच्या गोटात गेलेल्या एका नगरसेवकाच्या प्रवेशाबाबतही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी कोणते नगरसेवक कोणत्या पक्षाची वाट धरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरसेवकांच्या या पक्षांतरामुळे धाराशिवचे राजकारण चांगलेच तापले आहे. आगामी स्थानिक राजकीय समीकरणांवर या पक्षांतरांचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

FMGE Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन; जाणून घ्या नेमक्या काय आहेत उमेदवारांच्या

नगरसेवकांच्या पक्षांतरामागे आर्थिक व्यवहाराची चर्चा

दरम्यान, नगरसेवकांच्या पक्षांतरामागे मोठ्या आर्थिक व्यवहारांची चर्चाही सुरू झाली आहे. नगरसेवकांची फोडाफोड करण्यासाठी कोट्यवधी रुपयांची बोली लावली जात असल्याची कुजबुज नागरिकांमध्ये असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या कथित आर्थिक व्यवहारांबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, हे स्पष्ट होणे बाकी आहे. आता आणखी नगरसेवक पक्षांतर करतात का, कोणत्या गटाला त्याचा फायदा होतो आणि धाराशिवच्या स्थानिक राजकारणातील सत्तासमीकरण कसे बदलते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

 

 

 

 

Web Title: Dharashiv politics uddhav thackeray corporators join eknath shinde shiv sena bjp shock

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 12:58 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई
1

Maharashtra Breaking News Today 2026: औषध निरीक्षक भरती पेपरफुटी प्रकरणी अधिकारी आणि आरोपींवर धडक कारवाई

Dharashiv Farmers :  21 हजार शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खात्यात कर्जमाफीचे 183.85 कोटी जमा
2

Dharashiv Farmers :  21 हजार शेतकऱ्यांसाठी खूशखबर! खात्यात कर्जमाफीचे 183.85 कोटी जमा

Dharashiv News: धाराशिव उद्योग-गुंतवणुकीसाठी सज्ज; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा
3

Dharashiv News: धाराशिव उद्योग-गुंतवणुकीसाठी सज्ज; ७,५३४ कोटींच्या गुंतवणुकीतून ७,५०० रोजगारांची अपेक्षा

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय
4

Pune Election Department: पुण्यातील २२ लाख मतदारांवर टांगती तलवार! जिल्हा निवडणूक शाखेचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.