Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pratap Sarnaik : अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात! शेतकऱ्यांसाठी १०१ देशी गाई म्हणजे नवसंजीवनी, पालकमंत्री सरनाईक

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत, त्यांच्या स्वखर्चातून आणलेल्या १०१ उत्तम प्रतीच्या देशी गीर गाईंचे वितरण रविवारी १४ नोव्हेंबर रोजी सद्गुरू सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 17, 2025 | 06:38 PM
शेतकऱ्यांसाठी १०१ देशी गाई म्हणजे नवसंजीवनी

शेतकऱ्यांसाठी १०१ देशी गाई म्हणजे नवसंजीवनी

Follow Us
Follow Us:
  • अतिवृष्टीच्या जखमांवर मायेचा हात
  • शेतकऱ्यांसाठी १०१ देशी गाई म्हणजे नवसंजीवनी
  • शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा प्रकाश
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांची शेती, उभी पिके आणि गोठ्यातील पशुधन अक्षरशः वाहून नेले. कष्टाच्या जीवावर उभे असलेले संसार एका क्षणात उद्ध्वस्त झाले. अशा वेळी केवळ मदतीचा शब्द नाही, तर कृतीतून आधार देणारे नेतृत्व म्हणून परिवहन मंत्री व पालकमंत्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी संवेदनशीलतेचा जिवंत आदर्श घालून दिला आहे. अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा आशेचा प्रकाश झळकवला आहे.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना समजून घेत, त्यांच्या स्वखर्चातून आणलेल्या १०१ उत्तम प्रतीच्या देशी गीर गाईंचे वितरण रविवारी १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता सद्गुरू सदानंद महाराज यांच्या शुभहस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे (ऑनलाईन) पार पडले. हा उपक्रम म्हणजे केवळ मदत नाही, तर संकटात कोसळलेल्या शेतकरी कुटुंबांना पुन्हा उभे करण्याचा निर्धार ठरला आहे.

Nanded News : भाजपा-शिवसेना युतीचे संकेत; खासदार अशोक चव्हाण यांची सूचक प्रतिक्रिया

दुधाळ गीर गाईंची निवड

यावेळी मंत्री सरनाईक म्हणाले की, अवकाळी पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यातील अनेक शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाले. शेतीबरोबरच कुटुंबाच्या उपजीविकेचा मुख्य आधार असलेली दूधदुभती जनावरे गमावल्यामुळे त्यांचे जीवनचक्रच थांबले. ही व्यथा स्थानिक पत्रकारांनी माझ्यापर्यंत पोहोचवताच, क्षणाचाही विलंब न करता मदतीचा निर्णय घेतला. संपूर्ण देशभरातून उत्तम प्रतीच्या देशी गाईंचा शोध घेतल्यानंतर गुजरातमधील गीर प्रजातीची गाय शेतकऱ्यांसाठी निवडली. प्रत्येकी सुमारे ७५ ते ८० हजार रुपये किंमतीच्या या गाई महाराष्ट्रातील स्थानिक गाईंपेक्षा दुप्पट दूध देतात.

संकटाच्या काळात लोकप्रतिनिधी आणि शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी

सध्या देशी दुधाला चांगला दर मिळत असल्याने, या माध्यमातून शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळेल आणि त्यांच्या कुटुंबाला भक्कम आर्थिक आधार प्राप्त होईल. विशेषतः कळंब, भूम आणि परंडा तालुक्यांमध्ये अतिवृष्टीचा फटका अधिक बसल्याने, या भागातील पशुधन गमावलेल्या शेतकरी कुटुंबांना स्वावलंबनाचा नवा मार्ग मिळावा, या उदात्त हेतूने हे गाईंचे वितरण करण्यात आले. हा उपक्रम म्हणजे केवळ जनावरांचे वाटप नाही, तर संकटाच्या काळातही शासन आणि लोकप्रतिनिधी आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, याची साक्ष देणारी मायेची हमी आहे. दूधाळ गाईंसोबतच शेतकऱ्यांच्या जीवनात आत्मविश्वास, स्वाभिमान आणि नव्या आशेचे दूध पुन्हा वाहू लागले आहे.

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द

Web Title: 101 indigenous cows for farmers means new life says guardian minister pratap sarnaik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • Dharashiv
  • Farmers
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी
1

Purandar Airport : पुरंदर विमानतळाबाबत खासदार संजय राऊतांचे गंभीर सवाल; अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान
2

Mira Bhayandar Politics: ‘दहा कोटींच्या उत्पन्नाचा पुरावा द्या, नाहीतर राजीनामा द्या!’ नरेंद्र मेहतांचे प्रताप सरनाईकांना आव्हान

Mira Bhayandar : गणेशोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यात बंद AC; प्रताप सरनाईक संतापले, ‘पालिकेला 100 रुपयांची मनीऑर्डर पाठवतो’
3

Mira Bhayandar : गणेशोत्सवाच्या पुरस्कार सोहळ्यात बंद AC; प्रताप सरनाईक संतापले, ‘पालिकेला 100 रुपयांची मनीऑर्डर पाठवतो’

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी
4

Farmers Crisis: पावसाने दिली हुलकावणी; सोयाबीन उत्पादक शेतकरी संकटात, तातडीच्या मदतीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.