Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा

मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी २८ जुलै रोजी धाराशिवच्या रस्त्यांवर शक्तिप्रदर्शन करत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जोरदार एल्गार पुकारला.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 28, 2026 | 05:57 PM
धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा

धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा

Follow Us
Follow Us:

धाराशिव/शितलकुमार शिंदे : मुसळधार पावसाची तमा न बाळगता हजारो आंबेडकरी अनुयायांनी मंगळवारी २८ जुलै रोजी धाराशिवच्या रस्त्यांवर शक्तिप्रदर्शन करत आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात जोरदार एल्गार पुकारला. दुपारी २ वाजता जिजाऊ चौकातून निघालेला मोर्चा छत्रपती संभाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. सुरुवातीपासूनच कोसळणाऱ्या मुसळधार पावसातही महिलांसह हजारो आंदोलकांचा उत्साह किंचितही कमी झाला नाही. घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. पावसाचा जोर कायम असतानाही आंदोलक जागेवर ठाम उभे राहिले. आरक्षण उपवर्गीकरण कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका करत आरक्षणाला धक्का देण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही, असा इशारा दिला. यावेळी प्रमुख वक्ते रिपब्लिकन सरनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर थेट हल्लाबोल चढवला. “संविधानामुळेच चहावाला पंतप्रधान झाला, रिक्षावाला मुख्यमंत्री झाला. आज त्याच संविधानाने दिलेल्या आरक्षणावर घाला घालण्याचे धाडस होत आहे. सरकारने आंबेडकरी समाजाच्या संयमाचा अंत पाहू नये,” असा सज्जड इशारा त्यांनी दिला.

मुख्यमंत्री विधानसभेत आरक्षणाबाबत चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करत आनंदराज आंबेडकर म्हणाले, “मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा विपर्यास करत आहेत. विधानसभेत जनतेची दिशाभूल केली जात आहे. ही अत्यंत शरमेची आणि दुर्दैवी बाब आहे.” उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले, “2004 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती हा एकसंध (Homogeneous) वर्ग असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सात न्यायमूर्तींच्या घटनापीठानेही तीच भूमिका कायम ठेवली. मग सरकार कोणत्या आधारावर उपवर्गीकरणाचा आग्रह धरत आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केंद्रातील आणि राज्यातील नेतृत्वावर टीका करत आनंदराज आंबेडकर म्हणाले, “नरेंद्र आणि देवेंद्र यांना एवढीच हौस असेल तर सवर्णांमध्ये उपवर्गीकरण करून दाखवा. मनुवादी व्यवस्थेतील लोकांनीच सर्वाधिक संधी बळकावल्या आहेत; मात्र सरकारची नजर आरक्षणावर आहे.” आंबेडकरी समाजाच्या एकजुटीचा उल्लेख करत त्यांनी सरकारला इशारा दिला. “आंबेडकरी समाजाशी गाठ आहे. आम्ही जेव्हा एकत्र उभे राहतो, तेव्हा आमच्यासमोर उभे राहण्याची कुणाची हिंमत होत नाही.”

हे सुद्धा वाचा : ‘विद्यार्थ्यांवरील अमानुष लाठीचार्ज विसरणार नाही; गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे’; लोकसभेत Gaurav Gogoi यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

भीमा-कोरेगावच्या ऐतिहासिक लढ्याचा संदर्भ देत त्यांनी सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान दिले. “भीमा-कोरेगावचा इतिहास घडवणारी हीच जमात आहे. तेव्हा आम्ही पाचशे होतो; आज करोडोंच्या संख्येने आहोत. त्यामुळे सरकारने आमच्या नादी लागू नये. आरक्षणावर डल्ला मारण्याचा प्रयत्न महागात पडेल,” असा इशारा त्यांनी दिला. महापुरुषांच्या स्मारकांबाबतही त्यांनी राज्यकर्त्यांवर टीका करत, त्यासाठी आवश्यक संवेदनशीलता आणि इच्छाशक्ती नसल्याचा आरोप केला. पावसाच्या साक्षीने पार पडलेल्या या मोर्चाने धाराशिवमध्ये आंबेडकरी समाजाची संघटनशक्ती आणि आंदोलनाची तीव्रता पुन्हा एकदा अधोरेखित केली. यावेळी राजा ओहाळ, धनंजय शिंगाडे, कैलास शिंदे, नितीन शेरखाने, संजय बनसोडे, डी. जी. हौसलमल, पृथ्वीराज चिलवंत आदींसह अन्य कार्यकर्त्यांनीही भाषणे केली.

Web Title: Anandraj ambedkar has issued a warning to the government from dharashiv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Dharashiv News
  • maharashtra

संबंधित बातम्या

आता MPSC चाही पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला खेळ थांबवा, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा
1

आता MPSC चाही पेपर फुटला, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरु असलेला खेळ थांबवा, नाहीतर…; काँग्रेसचा इशारा

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास
2

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही
3

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक
4

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.