Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुती तुटली…! ‘दोघांच्या भांडणामुळे धाराशिव शहराचे झाले वाटोळे, जनता तिसऱ्या पर्यायाचा शोधात’, सुधीर पाटलांचा आरोप

Dharashiv News: भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या राजकीय आणि वैयक्तिक भांडणातून शहर विकासाचा जवळपास तीनशे ते साडेतीनशे कोटींचा निधी वापस गेला.  

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 24, 2025 | 04:32 PM
महायुती तुटली...! 'दोघांच्या भांडणामुळे धाराशिव शहराचे झाले वाटोळे, जनता तिसऱ्या पर्यायाचा शोधात', सुधीर पाटलांचा आरोप

महायुती तुटली...! 'दोघांच्या भांडणामुळे धाराशिव शहराचे झाले वाटोळे, जनता तिसऱ्या पर्यायाचा शोधात', सुधीर पाटलांचा आरोप

Follow Us
Follow Us:
  • दोघांच्या भांडणामुळे धाराशिव शहराचे झाले वाटोळे
  • जनता तिसऱ्या पर्यायाचा शोधात
  • सुधीर पाटीलांचा आरोप
शीतलकुमार शिंदे, धाराशिव : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला चार वर्षानंतर मुहूर्त लागला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. नगरपालिकेसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार असून निवडणुकीच्या रिंगणात धाराशिव जिल्ह्यातील नेत्यांची दुसरी पिढी राजकारणात उतरली आहे. याचदरम्यान राजकारणात महत्त्वाची बातमी समोर येते. दोघांच्या भांडणात धाराशिव शहराचे वाटोळे झाले असल्याने शहरातील जनता तिसऱ्या पर्यायाचा मागे उभा राहणार असल्याचे चित्र आहे, असे मत शिवसेनेचे (शिंदे) सुधीर पाटील यांनी मांडले आहे. भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या राजकीय आणि वैयक्तिक भांडणातून शहर विकासाचा जवळपास तीनशे ते साडेतीनशे कोटींचा निधी वापस गेल्याचा आरोपही त्यांनी या दोघांवर केला आहे.

Pandharpur Election: दारू-मटणाच्या राजकारणात हरवत चाललेले पंढरपूरचे भवितव्य

महायुतीत शिवसेनेला किरकोळ लेखून अपमानास्पद जागा दिल्याने आम्ही २१ जागांवर स्वतंत्रपणे लढत आहोत. मी स्वतः दहा आणि जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी अकरा जागा निवडून आणण्याची जबाबदारी घेतली असून कुठल्याही परिस्थितीत या जागा निवडून आणण्यासाठी आम्ही तण मन धनाने प्रयत्न करून या जागा निवडून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

महायुतीतील घटक पक्ष म्हणून भाजपा सोबत आम्ही शेवटपर्यंत राहण्याचा प्रयत्न केला. मात्र इलेक्टिव्ह मेरिटचे कारण पुढे करत आमची किरकोळ जागांवर बोळवण करण्याची नीती भाजपाने आखली होती. या बैठकीस फक्त पाच मिनिटांचा वेळ आम्हाला देण्यात आला होता. ही अपमानास्पद वागणूक सहन न झाल्याने आम्ही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान उपमुख्यमंत्री शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक संपर्क प्रमुख आमदार राजन साळवी यांनीही आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला असून शिवसेना काय आहे. हे येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देऊ. असा इशारा सुधीर पाटील यांनी दिला आहे.

तसेच भाजप शिवसेनेत धाराशिवमध्येही तणाव पाहायला मिळत आहेत. युती फीस्कटल्यानंतर आता शिवसेना आक्रमक पवित्र्यात आली आहे. आम्हाला अंधारात ठेवायचं आणि यूती तोडायची हे भाजपचे प्लॅनिंग होतं. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना आपण काहीही करू शकतो. आपलीच ताकद जास्त असल्याचं वाटतं. मात्र ही निवडणूक कोणाची ताकद किती आहे दाखवण्याचे आहे. शिवसेना ताकद दाखवणार असा आव्हान जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिले. निवडणुकीच्या अनुषंगाने पदाधिकाऱ्यांची शिवसेनेची बैठक घेत त्यांनी निवडणूक रणनीती आखली. लाडक्या बहिणी योजनेचे जनक एकनाथ शिंदे आहेत. त्यामूळे लाडक्या बहिणी आमच्या सोबत आहेत एकनाथ शिंदे यांचा मोठा चेहरा आमच्याकडे त्या जोरावर आम्ही निवडणूक जिंकणारच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष पदाला कोणाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय वरिष्ठ घेणार असल्यास ते म्हणाले.

Local Body Election 2025 : लियाकत शाह यांच्या राजकीय हालचाली संशयास्पद! चिपळूणच्या राजकारणात घडतंय तरी काय?

Web Title: Dharashiv city has become chaotic people are looking for a third option alleges sudhir patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2025 | 04:32 PM

Topics:  

  • BJP
  • Dharashiv
  • shivsena

संबंधित बातम्या

Seva Sankalp Campaign :  शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन
1

Seva Sankalp Campaign : शासकीय काम करताना निव्वळ नोकरी नको, अंतःकरणापासून जनसेवा करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मार्गदर्शन

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
2

महायुतीत बिघाडीची चिन्हे? फडणवीस म्हणाले एक अन् शिंदेंनी केले भलतेच! पुणे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ
3

Pune Politics: सतेज पाटलांची भाची डॉ. स्मिता जाधव भाजपच्या रिंगणात, महाविकास आघाडीत खळबळ

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण
4

‘एकनाथ शिंदे आमचे बॉस पण सेनेत प्रवेश नाही’ एमआयएमच्या युनूस शेख यांचं अजब वक्तव्य, ठाण्याच्या राजकारणात चर्चाना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.